ब्लॉगची प्रेरणा

आज पर्यंत अनेक व्यक्तीनी मला प्रेरणा दिली आहे. यात सर्वात महत्वाचा उल्लेख करावा लागेल तो माझ्या वडिलांचा, दिवंगत लालासाहेब पोळ यांचा. त्यांनीच
लालासाहेब पोळ


मला घडवलं. माझ्यावर पुरोगामी संस्कार केले. मला वाचनाची गोडी लावली. माझ्यासाठी खूप पुस्तकं आणली. मला वाचण्यास आणि लिहिण्यास नेहमी प्रेरणा दिली. ते माझे पहिले गुरु होते. माझ्या प्रत्येक विचार आणि कृतीच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले. भरपूर वेळा आमच्यामध्ये तासनतास वादविवाद झडायचे. त्यांच्या माझ्यासोबत वैचारिक वाद करण्यामुळे माझे विचार बर्यापैकी संतुलित राहण्यास मदत झाली. सह्याद्री बाणावर प्रसिद्ध होणार्या लेखांचे पुस्तक तयार करावे असे त्यांच्या मनात होते. ते माझ्या या वाटचालीत सावलीसारखे माझ्या पाठीशी राहिले. परंतु दुर्दैवाने ५ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. माझ्यासाठी सर्वकाही असणारे माझे वडील गेले हा धक्का खरेतर पचवणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. परंतु 'रडायचं नाही, लढायचं' ही त्यांचीच शिकवण कामी आली. ते आज शरीराने माझ्याजवळ नसले तरी मनाने, विचाराने नेहमीच माझ्या मनात, हृदयात राहतील. हा ब्लॉग म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes