शुक्रवार, डिसेंबर १४, २०१८

कोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका. या तालुक्यातील जुवे एक बेट. स्वतंत्र ग्रामपंचायत. जैतापूरपासून साधारण २-३ किमी. क्षेत्रफळ ४२ हेक्टर. लोकसंख्या अवघी ७८. पण घरं १०० च्या वर. बहुतांशी लोक मुंबईला स्थायिक. चारही बाजूने समुद्राने वेढलेलं हे गाव. गावात भंडारी आणि कुणबी समाजाची प्रामुख्याने वस्ती. मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय. गावात जायला भूमार्ग नाही. समुद्रातून होडीने जायचे. जमिनीपासून साधारण ४०० मीटर आत. गावात एक प्राथमिक शाळा. पहिली ते चौथी. विद्यार्थी फक्त २. इयत्ता तिसरीतील. शिक्षक एक. पाचवीपासून पुढे जैतापूरला जावे लागते. ७ विद्यार्थी जैतापूरच्या हायस्कुलला जातात. रोज होडीतून प्रवास करून जायचे. गावातील लोकांनाही इतर ठिकाणी जाण्यासाठी होडीतून प्रवास करून जावे लागते. 

रविवार, सप्टेंबर ०२, २०१८

सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य ?

दैनिक लोकसत्ता, २७ ऑगस्ट २०१८
दिनांक २४ ऑगस्ट रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा केल्यामुळे वाद निर्माण झाला. महाविद्यालय प्रशासनाच्या या कृतीचा पुरोगामी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सदरचा प्रकार गंभीर असून त्यामुळे भारतीय संविधानाचे उल्लंघन होत असल्याने त्याची चर्चा क्रमप्राप्त ठरते.

मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

मराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला?

'मातृभाषेविषयी प्रामाणिक भूमिका' आणि 'मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच' ही पत्रं दि. २१ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये वाचली. अनेकदा मराठीच्या प्रमाणिकरणाचा किंवा शुद्धतेचा अतिरेकी आग्रह धरला जातो. मायमराठी जगली पाहिजे, वाढली पाहिजे ही प्रत्येक मराठी भाषिकांची प्रामाणिक इच्छा असेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा म्हणूनही प्रयत्न चालू आहेत. परंतु मराठीचे संवर्धन करण्यासाठी आपण ती भाषाच शुद्ध उच्चार, प्रमाणीकरण,  व्याकरण अशा कुंपणानी बंद करणार असू तर तिची अवस्था साचलेल्या डबक्याप्रमाणे होऊन जाईल. भाषा ही नेहमी प्रवाही असते व ती तशीच असली पाहिजे. ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि सध्या वापरात असलेली मराठी यामध्ये खूप फरक आहे.

बुधवार, एप्रिल २५, २०१८

मराठी बिग बॉसमधील कलाकारांची विकृत मानसिकता

सध्या मराठी बिग बॉस हा कलर्स वाहिनीवरील रिऍलिटी शो खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमात काही स्पर्धकांना ठराविक दिवस एका घरामध्ये बंद करून ठेवलेले असते. त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात आणि त्यातून नामांकन व मतदानाच्या प्रक्रियेने एकेका स्पर्धकाला बाद ठरवले जाते. त्या घरातील स्पर्धकांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. मात्र घरात काय चालुय हे बाहेर सर्व जग पाहू शकते. 

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes