शनिवार, डिसेंबर १०, २०१६

सामाजिक-राजकीय साठमारीत भटक्या जमाती आणि ओबीसींचे मरण

एमपीएससीने नुकतीच पीएसआय पदाची ७५० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. परंतु या जाहिरातीत भजक, भजड आणि ओबीसी या मागास प्रवर्गाना एकही जागा दिलेली नाही. वास्तविक पाहता भजक - ३.५%, भजड- २% आणि ओबीसी १९% इतक्या जागा मिळणे अपेक्षित असताना या प्रवर्गांवर शासनाने घोर अन्याय केला आहे. 


२०१६ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या (६२ जागा)  जाहिरातीतही भजक आणि भजड या वर्गाना एकही जागा नव्हती तर ओबीसीला फक्त २ जागा होत्या. तसेच सहायक कक्ष अधिकारी पदाच्या (४३ जागा) जाहीरातीतही भजक ला एकही जागा नव्हती. म्हणजे या वर्षातील एमपीएससीच्या महत्वाच्या तीन परीक्षेत या प्रवर्गाना जागाच नाहीत अशी परिस्थिती आहे. विविध सरकारी विभागातील जागा भरताना त्या-त्या प्रवर्गाना जितके आरक्षण आहे तितक्या जागा खरेतर मिळाल्या पाहिजेत. काही मागास प्रवर्गांचा अनुशेष लक्षात घेता जागांची ही विभागणी अगदी काटेकोर करणे शक्य नाही हे मान्य आहे. मात्र भजक, भजड आणि ओबीसी अशा मोठ्या लोकसंख्येच्या प्रवर्गाना (अंदाजे ५५%) एकही जागा न देण्यामागील कारण काय ? दुसरी गोष्ट अशी कि मागास प्रवर्गातील उमेदवारांची निवड खुल्या प्रवर्गातून होवू शकते. परंतु समांतर आरक्षणामूळे मागास प्रवर्गातील मुलींची निवड खुल्या प्रवर्गातील मुलिमधून होवू शकत नाही तर त्याना खुल्या प्रवर्गातील मुलांसोबत स्पर्धा करावी लागेल. 

एमपीएससीच्या सर्वच परिक्षांत मुले आणि मुलींच्या कट ऑफ मध्ये खूप फरक असतो. त्यात मागास प्रवर्गातील मूली आणि खुल्या प्रवर्गातील मुले यांच्या कट ऑफमधील फरक तर खूपच जास्त असतो. अशा परिस्थितीत मागास प्रवर्गातील मुलींची खुल्या वर्गातून निवड होण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे सरकारने जागांची विभागणी कोणत्या तत्वावर केली हे जाहीर करावे. विविध विभागातील मागास प्रवर्गांचा शिल्लक अनुशेष लक्षात घेतला तर त्याना अधिक जागा मिळणे अपेक्षित असताना एकही जागा न देणे हा सरळसरळ पक्षपात आहे. हा गेल्या काही दिवसातील सामाजिक राजकिय असंतोषाचा परिपाक आहे का अशीही शंका येते. समाजातील एका घटकाला न्याय देताना आधीच वंचित असलेल्या इतर घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे परंतु तशी ती घेतलेली नाही. सामाजिक-राजकीय साठमारीत भटक्या जमाती आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे मात्र मरण ओढवले आहे.

5 टिप्पणी(ण्या):

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

मागास प्रवर्गातील उमेदवारांची निवड खुल्या प्रवर्गातून होवू शकते > माझं मत असं आहे की असं होऊ नये.ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या टक्केवारीनुसार त्यांची पदे निवडावीत पण खुल्या वर्गात स्थान मिळू नये हा खुल्या वर्गाला तोटा आहे.बाकी कोणत्याही पदाच्या जागा निघताना प्रत्येक समाजघटकाचा विचार व्हावा हे उचित आहे

अनामित म्हणाले...

tu nemka dokyvar padla ki dusra kashyavr,
tuzi jat kay sutat nahi 4g chya gamanyat pan.
wake up baby.

Unknown म्हणाले...

Tu patilki sodnarys ka my?

Raj Chaure म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
अनामित म्हणाले...

bavetline88.com adalah salah satu game Casino Online teraman serta terpercaya

bavetline88.com adalah game Casino online yang sangat simple dan user friendly.
Sangat mudah digunakan di smartphone anda maupun orang awam, Ayo segera bergabung dan

dafrtarkan diri anda sabagai member di bavetline88.com raih kesempatan hadiah ratusan

juta rupiah kesempatan terbatas....!!!

http://bavetline88.com/

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes