रविवार, मे २२, २०१६

मालेगाव स्फोट- तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा

मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रद्न्यासिंग आणि तिच्या काही सहकार्याना एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने क्लीन चीट दिल्याने आश्चर्य वाटले नाही. 

मालेगाव स्फोटांचा तपास करताना सुरुवातीला नेहमीप्रमाणे मुस्लीम व्यक्तीना अटक करण्यात आली. परंतु तत्कालीन एटीएस प्रमुख श. हेमंत करकरे याना या तपासात हिंदुत्ववादी संस्थांच्या सहभागाचे पुरावे मिळाले. त्याआधारे त्यानी तपास करुन साध्वी प्रद्न्यासिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह उजव्या गटाच्या काही व्यक्तीना अटक केली. तपासादरम्यान अनेक गोष्टी उघड होत गेल्या. उजव्या गटानी घातपाती कारवायांचे नियोजन करण्यासाठी ज्या बैठका घेतल्या त्यांचे चित्रीकरण असलेले लॅपटॉपही जप्त करण्यात आले. तसेच देशभर या संघटनांच्या शस्त्र चालवणे, स्फोटके तयार करणे यासंदर्भात कार्यशाळाही पार पडल्याचे निष्पन्न झाले. कर्नल पुरोहितने तर भारतीय लष्कराचेच आरडीएक्स चोरले होते. श. करकरेंच्या या तपास आणि भक्कम आरोपत्रामुळे आरोपीना साधा जामीनही मिळाला नाही. परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्याना करकरेनी अटक केल्यानंतर भाजप, शिवसेनेसह सर्व उजव्या पक्ष, संघटनानी करकरेना दुषणे दिली. एका नेत्याने तर करकरेंच्या कुटुंबाची धिंड काढण्याची भाषा केली. करकरेना मारण्याच्या धमक्याही काहीनी दिल्या. तरीही करकरे आपल्या तपासावर ठाम राहिले. करकरेंच्या मृत्युनंतर मात्र मालेगाव स्फोटांचा तपास रेंगाळला. नंतर भाजप सत्तेवर आल्यावर आरोपींच्या सुटकेची आशा बोलून दाखवली जावू लागली. अनेक भाजप नेते अजूनही उघडपणे साध्वीचे समर्थन करतात. काही दिवसांपूर्वीच या खटल्यातील एक सरकारी वकील रोहिणी सालीयन यानी आरोप केला कि आरोपींवरील आरोप सौम्य करण्यासाठी एनआयए दबाव आणत आहे. सालियन यांचा आरोप खोडून काढताना एनआयएने जे उत्तर दिले ते ऐकुन सालियन यांच्याच आरोपात तथ्य असल्याचे जाणवले. एनआयएकडे असलेल्या इतर खटल्यात सरकारी वकील म्हणून सालियन याना नेमत नसल्याने त्या असे आरोप करत आहेत, इतका हास्यास्पद बचाव एनआयएने केला. यानंतर एनआयएने दुसर्या सरकारी वकीलाना अंधारात ठेवून पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याने या वकिलाने खटला सोडण्याची धमकी दिली आणि नंतर मागेही घेतली. यानंतर जेव्हा एनआयएचे आरोपपत्र दाखल झाले तेव्हा साध्वी आणि इतर काही जणाना क्लीन चीट देण्यात आली, तसेच कर्नल पुरोहित आणि काहीजणांवरील आरोप सौम्य करण्यात आले. आणि हे सर्व होवूनही ज्यानी आधी या खटल्याचा तपास केला होता ती महाराष्ट्र एटीएस का मौन बाळगून आहे हा प्रश्नच आहे. सीबीआय, आयबी, एनआयए यासारख्या तपास यंत्रणांच्या कामात सरकारी हस्तक्षेप होत असल्याची ओरड काही नवी नाही. त्यामुळे या सर्व विसंगती दूर करायच्या असतील तर सर्वोच्च न्यायलयाच्या देखरेखीखाली या खटल्याचा पुन्हा तपास व्हावा

11 टिप्पणी(ण्या):

Amit म्हणाले...

You are saying "करकरेंच्या मृत्युनंतर मात्र मालेगाव स्फोटांचा तपास रेंगाळला. नंतर भाजप सत्तेवर आल्यावर आरोपींच्या सुटकेची आशा बोलून दाखवली जावू लागली." Do you realize that there is a gap of almost 5.5 years between these two timelines? Who was in power in Delhi and Mumbai during these years? Why nothing progressed in these years in these cases? Please think on it. If there were proofs, court would have definitely sentenced the accused. But it did not happen because the proofs were doctored. And hence even ATS was not going ahead with the cases. Read what ATS lawyer in Supreme Court had said. He clearly says that there is no proof against the accused which can stand trial.

अनामित म्हणाले...

hya baitadal hindu virodhi lihanyasathi pasie bhetat mhanun nehamhi pachakto asach kahitari.

hindu dharmala shivya dilya shivya hya lokana jevan pan nahi pachat

अनामित म्हणाले...

vada pav khanar ka re?

अनामित म्हणाले...

हिंदुनी जर दहशतवादी कृत्ये केली असतील तर त्याला समर्थनीय नाहीतच....... पण कस आहे ना आपल्या तो बाब्या ... अशी बहुतेकांची इच्छा असते... आणि धर्म हि अशी गोष्ट आहे कि तिथे शिकलेलेही(सुशिक्षित नव्हे....!!! ) स्वताची विचारशक्ती गहाण ठेवतात.... काय रे अनामित.....

अनामित म्हणाले...

Aajkal hindu dharma kasa vait aahe aahe ani maza dharma kasa changla aahe ase blog lihanre tinpat lekhak gallogalli bhuchatrasarkhe ugavale aahet.
Ha pan tyatla ekach.

अनामित म्हणाले...

Kombdi wade khanar ka?

प्रकाश पोळ म्हणाले...

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने एनआयएच्या विशेष न्यायालयात केलेला जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. या निकालामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
साध्वी हिच्याविरोधात पुरावे नसल्याचा ‘एनआयए’ने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याआधारे ती जामिनास पात्र असल्याचा दावा तिच्या जामीन अर्जात करण्यात आला आहे. शिवाय बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला, ती तिच्या नावे नोंद असली तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंगरा याच्या ताब्यात होती. त्यामुळे त्याच्या कृत्यांचे खापर तिच्या माथी मारता येऊ शकत नाही, असा दावाही अर्जात करण्यात आला होता. पण निसार अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने प्रज्ञासिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. ‘जमात-ए-उलेमा महाराष्ट्र’ या संस्थेच्या माध्यामातून त्याने ही मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञासिंहचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/special-nia-court-rejects-bail-to-sadhvi-pragya-in-2008-malegaon-blast-case-1257992/#sthash.jM7dkSKo.dpuf

प्रकाश पोळ म्हणाले...

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यासह दोन आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयानेही त्यांचे अर्ज दाखल करून घेत त्यावर ‘एनआयए’ला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

साध्वीसह सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण टक्कलकी अशा तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. साध्वी हिच्याविरोधात पुरावे नसल्याचा ‘एनआयए’ने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याआधारे ती जामिनास पात्र असल्याचा दावा तिच्या जामीन अर्जात करण्यात आला आहे. शिवाय बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला, ती तिच्या नावे नोंद असली तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंगरा याच्या ताब्यात होती. त्यामुळे त्याच्या कृत्यांचे खापर तिच्या माथी मारता येऊ शकत नाही, असा दावाही अर्जात करण्यात आला आहे.

जबाब गहाळ करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी याप्रकरणातील महत्त्वाच्या सात साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती ‘एनआयए’ न्यायालयातून गहाळ होण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अंकुर पाटील, इमरान खान, अमजद खान आणि देवेंद्र कुमार मिश्रा यांनी केली.
- See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/sadhvi-pragya-appeal-in-court-for-bail-applications-1244547/#sthash.2iTQ6fy6.dpuf

प्रकाश पोळ म्हणाले...

मुंबई : राष्‍ट्रीय जांच एजेंसी (एनआईए) की विशेष अदालत ने मालेगांव ब्लास्ट (2008) की आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर की जमानत अर्जी खारिज कर दी है। साध्वी की जमानत अर्जी पर सुनवाई पिछले सप्ताह ही पूरी हुई थी, जिसके बाद अदालत ने आज की तारीख मुकर्रर की थी। जांच एजेंसी ने पिछले महीने प्रज्ञा सिंह को क्लीन चिट दी थी। राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआईए) ने उनकी जमानत याचिका का विरोध नहीं किया था।

विशेष न्यायाधीश एसडी तेकाले ने बंद कमरे में हुई सुनवाई में याचिका खारिज की। अपने आवेदन में प्रज्ञा ने कहा था कि उनके खिलाफ कोई सबूत नहीं हैं। उन्होंने कहा था कि विस्फोट में प्रयुक्त मोटरसाइकिल की मालिक वह थी लेकिन एक गवाह के अनुसार यह फरार आरोपी रामचंद्र कलसांगरा के पास थी।

उन्होंने याचिका में कहा कि कुछ गवाहों के बयान उन्हें फंसाने के लिए प्रयुक्त हुए थे लेकिन बाद में वे पलट गये और उन्होंने महाराष्ट्र आतंकवाद रोधी दस्ते द्वारा यातनाएं देने की शिकायत की थी। इससे पहले केन्द्रीय एजेंसी ने सबूतों के अभाव का हवाला देते हुए 13 मई को दायर अपने आरोप पत्र में प्रज्ञा और पांच अन्य के खिलाफ सभी आरोप हटा लिये थे। ब्लास्ट में घायल निसार अहमद सैयद बिलाल ने हस्तक्षेप याचिका दायर करके उनकी याचिका का विरेाध किया था।

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर पिछले आठ साल से जेल में हैं। मामले की जांच कर रही एनआईए ने इसी साल दायर अपनी सप्लीमेंट्री चार्जशीट में साध्वी सहित 6 आरोपियों को क्लीन चिट दी है। उसके बाद साध्वी के वकील ने जमानत की अर्जी दी थी। साल 2008 में हुए मालेगांव ब्लास्ट में सात लोगों की मौत हुई थी और 100 के करीब घायल हुए थे।

तत्कालीन जांच एजेंसी एटीएस ने जांच में पाया था कि बम लगाने के लिए जिस बाइक का इस्तेमाल किया गया था वो साध्वी के नाम पर थी। हालांकि साध्वी का कहना है कि धमाके के दो साल पहले से ही वह बाइक रामचंद्र कलसांगरा इस्तेमाल कर रहा था। रामचंद्र कलसांगरा फरार आरोपी है। साध्वी की गिरफ्तारी के बाद मामले में एक-एक कर 13 लोगों की गिरफ्तारी हुई जिसमें सेना के कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित सहित पूर्व मेजर रमेश उपाध्याय और दयानंद पांडे जैसे साधु संत भी हैं। एटीएस ने मामले में एक आरोपी राकेश धावड़े पर परभणी और जालना बम धमाकों में चार्जशीट दिखाकर मकोका लगाया था।

लेकिन एनआईए का कहना है कि राकेश धावड़े को पहले 2008 के मालेगांव बम धमाके में गिरफ्तार किया गया। फिर मकोका लगाने के इरादे से उसे परभणी और जालना बम धमाकों में आरोपी बनाकर चार्जशीट दायर की गई। एनआईए का तर्क है कि मामले पर मकोका नहीं बनता है और मकोका हटता है तो साध्वी के खिलाफ मुकदमा चलाने लायक पर्याप्त सबूत नहीं है।
ज़ी मीडिया ब्‍यूरो

प्रकाश पोळ म्हणाले...


प्रज्ञा सिंहला आरोपमुक्त करण्याच्या ‘एनआयए’च्या प्रयत्नांना लगाम!
Loksatta · 8d

२००८ मधील मालेगाव स्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर हिचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेला तपास चुकीचा असल्याचा दावा करीत तिच्या आरोपमुक्तीसाठी धडपडणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) हा मोठा तडाखा आहे. एवढेच नव्हे तर स्फोटाच्या कटाशी तिचा काही संबंध नव्हता, हा ‘एनआयए’चा दावा धुडकावत तिच्यावरील आरोप प्रथमदर्शनी खरे वाटत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकाश पोळ म्हणाले...

बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा ‘एनआयए’ दिल्यानंतर प्रज्ञा सिंहने जामिनासाठी अर्ज केला होता. ‘एनआयए’ने तिला जामीन देण्यास विरोध नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे तिच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. मात्र, या स्फोटात जीव गमावलेल्यांच्या आप्तांनी या जामिनाला विरोध केला होता. विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्या. एस. डी. टेकाळे यांनी हा अर्ज फेटाळताना प्रज्ञासह सहा आरोपींना पुराव्याअभावी आरोपमुक्त करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/special-court-questions-nia-clean-chit-to-sadhvi-pragya-1258369/#sthash.n9N3l634.dpuf

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes