रविवार, मार्च २०, २०१६

"भारतमाता की जय" मागचे राजकारण

दोन दिवसापूर्वी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यानी "गळ्यावर सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणनार नाही" असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. त्याचेच पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळात उमटले. एमआयएमचे आमदार आमदार वारीस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्यासमोर सत्ताधारी आमदारानी गोंधळ घालत "भारत माता की जय" म्हणन्याची सक्ती केली. त्याला या दोघानी नकार दिल्याने वाद झाला आणि त्या वादात पठाण याना निलंबित केले.

या सर्व घटनाक्रमाकडे उथळ दृष्टीकोणातून पाहिले असता वास्तव परिस्थितीचे खरे आकलन होणे अवघड आहे. त्यामुळे खरी परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्या डोळ्यावरील धर्म आणि देशप्रेमाची झापडे काढावी लागतील. भाजपची सत्ता आल्यानंतर संघ परिवारातील व्यक्तीनी नियोजनबद्ध पद्धतीने आपला  सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे रेटायला चालू केले. याला त्यानी धर्माचीही जोड दिली. देशभक्तीची व्याख्या आणि देशभक्त कोण हेही त्यानी ठरवून टाकले. त्यामूळे त्यांच्या संकुचित राष्ट्रवादात न बसणार्या सर्व व्यक्ती देशद्रोही आहेत असा डांगोरा पिटायला चालू केले. थोडीशी वेगळी, प्रवाहाविरुद्ध जाणारी भूमिका कुणी घेतली तर त्याचे भांडवल करुन त्याच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारणे चालू झाले. यात त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि मुस्लिम हे राहिले आहेत. रोहित वेमुल्ला, कन्हैय्याकुमार आणि आता ओवेसी, पठाण, जलील हे त्यांच्या कारस्थानाला बळी पडले आहेत. किंवा असेही म्हणता येईल कि ओवेसी याना त्यांचे राजकारण पुढे रेटायला आयताच एक मुद्दा मिळाला.

सध्याचा मुद्दा पाहिला तर असे दिसते की संघ परिवाराला काहीही करुन या देशातील मुस्लिमाना देशद्रोही साबीत करायचे आहे. या देशातील मुस्लिमानी भारताबद्दल पूर्ण इमान राखले असताना नेहमी नेहमी त्यांच्या देशनिष्ठेची परीक्षा का पाहिली जाते ? मागे वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणण्यावरुन गदारोळ झाला होता तेव्हाही मुस्लिम राष्ट्रद्रोही आहेत असाच प्रचार सर्रास चालू होता. राष्ट्रगीत म्हणने आणि भारताच्या विजयाच्या घोषणा देणे इतकाच संघालेखी राष्ट्रवाद आहे का ? राष्ट्रवादाच्या त्यांच्या संकुचित भुमिकेत सर्वानी जगावे असा अट्टहास ते का करतात ? वारीस पठाण यांची प्रतिक्रिया पाहिली तर ते या प्रकरणी निर्दोष आहेत हे लक्षात येईल. ते म्हणतात, "राष्ट्रगीत आणि देशाबद्दल आम्हाला प्रेम आहेच, परंतु त्याची सक्ती कशासाठी ?" आता इथे वादाचे दोन मुद्दे आहेत. पहिला म्हणजे, भारतमाता ही धार्मिक दृष्टीकोण असलेली संकल्पना असल्याने ती मान्य करायला ओवेसी आणि पठाण, जलील यांचा विरोध आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, आरएसएस आणि समविचारी संघटना, त्यांचे अनुयायी हे देशप्रेमाची संकुचित व्याख्या ठरवून त्याची सक्ती इतरांवर करत आहेत. आणि या सक्तीमागचा त्यांचा दृष्टीकोण चांगला नाही. या दोन मुद्द्यांकडे नीट लक्ष दिले तर हा वाद का उकरुन काढला आहे हे लक्षात येईल.  

देशातील मुस्लिम, दलित, आदिवासी यांच्याकडे बर्याचदा संशयाच्या भूमिकेतून पाहिले जाते. जणू काय सर्व मुस्लिम हे दहशतवादी आणि दलित-आदिवासी हे नक्षलवादी आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या देशभक्तीची परीक्षा घेतली जाते. या तथाकथित देशभक्ताना जेव्हा वाटेल तेव्हा मुस्लिम-आदिवासी-दलितानी आपल्या देशभक्तीची प्रचिती द्यावी लागते. आणि आपली प्रसारमाध्यमेही राष्ट्रगीत म्हणतानाचे मुस्लिमांचे फोटो प्रसिद्ध करुन मुस्लिम देशभक्त असल्याचे सर्टिफिकेट देतात. शेवटी आपणाला हे ध्यानात घ्यावे लागेल की राष्ट्रभक्ती ही चांगली गोष्ट असली तरी त्याची सक्ती चुकीची आहे. आणि त्यामाध्यमातून मुस्लिमांभोवती जे संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे त्याचे दुरगामी आणि गंभीर परिणाम आपल्या समाजव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

ओवेसी काय म्हणतात याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. त्यांचे संकुचित राजकारण आणि त्यांच्या विविध भुमिकांबद्दल मतभेद असले तरी भारत देशाबद्दल त्यांचे मत वाईट नाही एवढे आपण नक्की सांगू शकतो. अर्थात म्हणून त्यांचे संकुचित राजकारण आपणाला पटते असा त्याचा अर्थ नाही. ओवेसींच्या अनेक भूमिका वादग्रस्त आहेत हे नक्की. म्हणून आंधळेपणाने ओवेसीना झोडपावे असेही नाही. त्यांच्या मुद्द्यांचा योग्य  प्रतिवाद झाला पाहिजे. त्यासाठी घटनात्मक मार्ग आहेत. चर्चेने प्रश्न सुटू शकतात. एखाद्या मुद्द्यावर उलटसुलट चर्चा झालीच पाहिजे. त्यामाध्यमातूनच समाज प्रगल्भ होत पुढे जात असतो. पण वैचारिक मार्ग सोडून हमरीतुमरीवर येणे ही कोणती संस्कृती ? महाराष्ट्र विधानसभेत काही आमदारानी ज्या पद्धतीने वर्तन केले ते पहाता महाराष्ट्रात लोकशाहीचे कसे धिंडवडे निघताहेत हे लक्षात येते. आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील याना घेरुन ज्या शिविगाळ करणे, मारहाण करण्यासाठी अंगावर धावून जाणे, घाणेरड्या पद्धतीने घोष्णाबाजी करुन हिंस्त्र वर्तन करणे हे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आणि घटनेची शपथ घेणार्या आमदाराना शोभत नाही. पठाण आणि जलील हे दोघे त्यावेळी गप्प राहिले म्हणून पुढचा अनर्थ टळला. ओवेसी काय किंवा त्यांचे आमदार पठाण आणि जलील काय, हे भारताचा जयघोष करण्यास का नकार देतात हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. यावर ओवेसी म्हणतात कि आम्ही भारत देश की जय म्हणतो परंतु भारतमाता की जय म्हणनार नाही. का ? तर भारतमाता या संकल्पनेला धार्मिक रंग आहे. 

साधारण १८८२-८३ पासून बॅनर्जी यांचे भारतमाता हे नाटक आणि बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ कादंबरीपासून भारतमाता ही संकल्पना रुढ झाली. काही जणानी अनेक हातांची हिंदू देवतेच्या स्वरुपातील भारतमाता रेखाटली. याचे मूळ बंगालातील काली पूजा आणि एकूणच हिंदू परंपरेत सापडते. यातून क्रांतिकारक आणि स्वातंत्रलढ्यातील शिलेदाराना प्रेरणा मिळत होती. भारताचे वर्णन कुणी कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. हिंदू धर्माभिमान्याना भारताला देवीची उपमा द्यावीशी वाटली तर ते गैर नाही. मात्र त्यानी ही संकल्पना स्वत:पुरतीच ठेवावी. स्वत:च्या धर्माशी संबंधित असणार्या संकल्पना इतर धर्मीयानी स्वीकाराव्या हा अट्टहास का ? ओवेसींचा विरोध नेमका याला आहे. आज आरएसएसने भारतमाता या संकल्पनेच्या माध्यमातून राजकारण चालवले आहे. त्यांच्या चौकटीत न बसणारे सारे त्यांच्यालेखी देशद्रोही आहेत. आणि  हे सिद्ध करण्यासाठीच ते रोज नवीन मुद्दे उकरुन काढत आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन धर्मांधांच्या चालीला बळी न पडता देशाचे अखंडत्व अबाधित ठेवणे खरे भारतीय म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

11 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

tache kay aahe prakash, ki kavil zalelya mansala sagle jag pivle diste. tuzya sarkhya lokanche likhan donhi samajat ek mekabaddal vish pasryache kam karte

प्रकाश पोळ म्हणाले...

कोण विष पेरतय ते दिसंतच आहे

Ajinkya Shendage म्हणाले...

Ek no prakash.... tuza kaam akhanda chslu thew...������ all the best...

Aniket म्हणाले...

👍👍👍👍👍👍

Aniket म्हणाले...

👍👍👍👍👍👍

अनामित म्हणाले...

Mhanje tumhala owaisi ani tyachya amdarachya bolnyat kashich vavage vatat nahi ka? Bharat Mata ki jay ghoshana denyat kay chuk ahe? ka tar mata ha shabd ahe mhanun? Mata ya shabdabaddal evadha dwesh ka? Ya lokancha JanGanMan la virodh, Vande Mataram la virodh, Udya he Sanvidhanla hi virodh karatil teva tumhi kay karnar ahat. Ek khar satya ahe ki Muslim samaj jithe jithe ahet tithe Hinsa karatha he satya ahe, ani tumhi Hindudwesh ani sanghdwesh karatat mhanun tumhi MIM la saath det ahat, udya saghane vande mataram la virodh kels tar tumhi tyalahi virodh karal, Evadha Hindu dwesh bara nahi, Hindu dharm tumhala dharmvar tika karanyache swatantrya deto, Ekhada Nastik mala tumhi mala Muslim dharmta dadhva

प्रकाश पोळ म्हणाले...

शीख धर्म कोणत्याही महिलेची पूजा करु शकत नाही. म्हणून आम्ही भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणनार नाही अशी भूमिका शीख समाजाने घेतली आहे. ओवेसींच्या भूमिकेवर आकाश पाताळ एक करणारे यावर काही बोलतील का ? लष्करात सर्वाधिक संख्येने असणार्या शीखानाही आता देशद्रोही ठरवणार का ?

अनामित म्हणाले...

Arey shahanya , tuzya " खरी परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्या डोळ्यावरील धर्म आणि देशप्रेमाची झापडे काढावी लागतील" ya vakyanantarach dharma , jaat , sanskruti etc etc chach jhapad distay re . Tumhi sankuchit ani phukatkhau manovruttiche lok sudhar nar nahi . Tumhala kitihi aplasa maanla na tarihi jaat dakhawnarach . Chaludya .

अनामित म्हणाले...

are hya prakshla vada pav khalu ghala kunitari.

park म्हणाले...

Akhir kehna kya chahte ho tum?

PRASADSINGH DALAVI म्हणाले...

Pol saheb hi ji bhaktmandali ahe he asech vagat rahnar, vaicharik takat ladhaychi himmat nahi ya lokanmadhye, yana uttar denyat dekhil vel waya ghalau naka, fakt tumache kam chalu theva.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes