सोमवार, फेब्रुवारी २९, २०१६

भाजपचा राष्ट्रवाद- किती खरा, किती खोटा ?

सध्या देशभर जे काही चालले आहे त्यावरुन निश्चितपणे असे म्हणता येईल कि भारताची वाटचाल अतिरेकी धर्मांधता, अतिरेकी राष्ट्रवाद आणि असहिष्णुतेकडे चालली आहे. अर्थात हे माझे आणि पुरोगामी, डाव्या, विवेकी लोकांचे मत आहे. भक्तानी ते स्वीकारलेच पाहिजे अशी सक्ती अजिबात नाही. 

भाजप हा पक्ष उजव्या विचारांचा कट्टर पुरस्कर्ता आहे हे सर्वानाच माहित आहे. धर्माच्या आधारावर देशाची रचना करावी अशी भाजपची भूमिका आहे. हिंदूत्वाचे राजकारण करुन भाजपने देशात आणि अनेक राज्यात सत्ता मिळवली. भाजपने विशिष्ट प्रकारची भूमिका स्विकारणे आणि त्याचा पाठपुरावा करणे यात गैर काय आहे, असा प्रश्न एखादा विचारेल. यात गैर काहीही नाही. परंतु भाजप खरेच त्यांच्या भूमिकांवर ठाम रहात आला आहे का कि केवळ समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठी अशी भूमिका घेतो यावर मात्र चर्चा व्हायला हवी. तशी चर्चा अनेक मुद्यांच्याबाबत करता येईल. मात्र तुर्तास आपण सध्या गाजत असलेले जेएनयु प्रकरण आणि भाजपचा कथित राष्ट्रवाद यावर चर्चा करु.

देशात २०१४ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आणि सत्ताबदलाची चर्चा चालू झाली. कॉंग्रेसच्या भ्रष्ट आणि संथ राजवटीला कंटाळलेल्या जनतेला मोदींच्या रुपाने एक आक्रमक नेता भेटला. मोदीनी भारतीय जनमानस ओळखून जनतेला स्वच्छ आणि पारदर्शक शासनाची हमी दिली. भाजपने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली. कारण जनतेला तीच भूमिका हवी होती. परंतु याच्या जोडीला भाजपचे नेहमीचे मुद्दे होतेच. उदा. राममंदिर, कलम ३७०,  पाकिस्तानसोबतचे संबंध इ. लोकसभा निवडणूकीत हिंदू मतांचे ध्रूवीकरण करण्यासाठे जाणीवपूर्वक वातावरण तयार केले गेले. जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष बाब बनून गेलेले कलम ३७० वर भाजप आणि मोदींचा जास्त भर होता. कलम ३७० हे संपूर्ण भारतीयांसाठी कसे अपनास्पद आहे याचा डांगोरा पिटण्यात भाजप नेते मश्गुल होते. कलम ३७० बद्दल विरोधी भूमिका बाळगणे चूक नाही. कुणाला ते कलम रद्द व्हावे असे वाटत असेल तर तशी मांडणी ते करु शकतात. असे असताना भाजपचे नक्की चुकले काय याचा विचार आपणाला करावा लागेल. 

लोकसभा निवडणूकीच्या आधी भाजपची घोषणा होती, "भारत मे दो प्रधान, दो विधान और दो निशाण नही चलेंगे." मग या भूमिकेत जम्मू काश्मीरच्या निवडणूकीत कसा बदल झाला. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर भाजपने या राज्यात आक्रमक भूमिक घेत दंड थोपटले. पण आपली नेहमीची भूमिका गुंडाळून ठेवत वेगळीच भूमिका घेतली. जे कलम ३७० रद्द करण्यासाठी भाजप आग्रही होता त्या कलमाबद्दल काश्मीरच्या निवडणूकीत अवाक्षरही काढले नाही. भाजपने जम्मूत आणि पीडीपीने काश्मीरमध्ये यश मिळवले. पण सत्ता स्थापण करण्याइतपत संख्याबळ कुणाकडेही नव्हते. तेव्हा ममग भाजपने पीडीपी या पक्षासोबत युती केली. आता या पीडीपीची भूमिका आणि भाजपची भूमिका एकमेकांच्या अगदी विरोधी. तरीही केवळ सत्तेसाठी भाजप पीडीपीच्या गळ्यात पडला. 

आता जेएनयूच्या मुद्द्याकडे येवू. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यानी देशविरोधी, पाकसमर्थक घोषणा दिल्या, अफजल गुरुचे समर्थन केले असा आरोप सरकारने लावला आहे. त्याबद्दल ते एकही पुरावा देवू शकले नाहीत ही गोष्ट वेगळी. परंतु वादासाठी असे मानू कि तशा घोषणा दिल्या गेल्या. मग घोषणा देणारे आणि दहशतवादी अफजल गुरुचे समर्थन करणारे विद्यार्थी देशद्रोही ठरतात. या देशद्रोही विद्यार्थ्याना पाठिंबा देणारे सारेच देशद्रोही ठरतात. आता परत पीडीपीची भूमिका विचारात घ्या. पीडीपी हा पक्ष अफजल गुरुचा समर्थक आहे. अफजल गुरुला फाशी देवू नये अशी भूमिका त्यानी मांडली होती. आजही पीडीपीची भूमिका बर्याच वेळा फुटीरतावादी आणि पाकिस्तानधार्जिनी असते. याचा अर्थ भारतीय घटनेनुसार निवडणूका लढवून सत्तेवर येणारा पीडीपी पक्षही देशद्रोही ठरतो. मग पीडीपीसोबत सत्तेत वाटेकरी असणारा भाजप देशद्रोही ठरतो. पण भाजप असे मानत नाही. यांचा राष्ट्रवाद, देशभक्ती आणि धर्मप्रेम सोयीस्कर असते. जे नियम इतराना लागू होतात ते भाजपला लागू होत नाहीत अशी त्यांची भूमिका असावी. तसे नसते तर अफजल गुरुचे कथित समर्थन करणारे विद्यार्थी आणि अफजल गुरुचे समर्थन करणारा पीडीपी याना भाजपने समान न्याय लावला असता. परंतु काश्मीरमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भाजपने आपला राष्ट्रवाद गुंडाळून ठेवला आणि दिल्लीत मात्र डाव्याना संपविण्याची आयती संधी चालून आल्यामूळे भाजपने राष्ट्रवादाचा येल्गार पुकारला आहे. त्यामुळे सहाजिकच आम्ही राष्ट्रवादी आणि आम्हाला विरोध करणारे राष्ट्रविरोधी अशी सोपी मांडणी भाजप करत आहे. 

परंतु खरेच भाजप राष्ट्रवादी आहे कि राष्ट्रवादाचे राजकारण करुन विरोधी मत दडपण्याचे कार्य करीत आहे याचा विचार व्हायला हवा. भाजप खरोखर राष्ट्रवादी असता तर देशद्रोही नथुराम गोडसेचे समर्थन आणि उदात्तीकरण त्यानी केले नसते. परंतु एका बाजूने गांधीजींचे गुणगाण गायचे आणि दुसर्या बाजूने नथुरामला हिरो बनवायचे यातून भाजपला कोणता राष्ट्रवाद दाखवून द्यायचा आहे ? भाजपचा सारासार अभ्यास केला तर कोणत्याही सुबुद्ध आणि विवेकी माणसाला भाजपच्या राष्ट्रवादातील ढोंग लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

11 टिप्पणी(ण्या):

परसु माळी म्हणाले...

वतन कि फिक्र कर नादान मुसीबत आनेवाली है,
ना समझोगे तो मीट जाओगे,
तुम्हारी दास्तान तक ना होगी दास्तानो मे.

अनामित म्हणाले...

"तरीही केवळ सत्तेसाठी भाजप पीडीपीच्या गळ्यात पडला."

राष्ट्रीय समाज पक्ष भाजपच्या गळ्यात नेमका कशासाठी पडला ह्याचे स्पष्टीकरण काय असावे बरे?

अनामित म्हणाले...

tumchya peksha tari changla aahe bjp cha rashtravad.

अनामित म्हणाले...

Kiti paise miltat varshaahr bjp government virudha lihyache? aata tar ti kamai band zali asel na, 9500 ngo indian government ne ban kelyamule.

Unknown म्हणाले...

भाजपाला शिव्या घालण्यात धन्यता मानणारे लेख लिहून फक्त तुम्हाला पैसे मिळतात. त्यापेक्षा इशरत प्रकरणात तिला ह्याच कॉंग्रेस नेत्यांनी शहीद बनवले तेव्हा ते काय राष्ट्रहिताचे काम करत होते का? युपीए काळातील एक गृहमंत्री ती दहशवादी आहे म्हणतो तर दुसरा त्याचा अहवाल बदलून तिला शहीद ठरवतो आणि सत्य जेव्हा समोर येत तेव्हा मग तुम्ही सगळे सेक्युलर कुठे असता. तिस्ता सेटलवाड च काय ? इंदिरा जयसिंघ च काय हि सर्व काय तुमची राष्ट्रहिताचे काम करणारी मानस का? एनजीओ ना मिळणारी परदेशी रसद बंद होते तेव्हा तुम्हाला असहिष्णुता आठवते का?

अनामित म्हणाले...

I agree with @ unknown. I read in news that Indira jayasing got 32 crore rupees from ford foundation.

saibaba म्हणाले...

he kay ahe samajat nahi kalat nahi

Rohit म्हणाले...

I agree with you prakash...

sadashiv म्हणाले...

गिरीश कुबेरांचा माफिनामा, श्री श्री च्यां विरोधातील षडयंत्र, संघा च्या कार्यकत्यांच्या खुनां बद्दल न बोलणारी मिडीया हे ही सर्व सेक्युलर असण्याचीच लक्षण आहेत काय?

sadashiv म्हणाले...

We must greaty thankful to late. PM Rajiv Gandhi for Telecom revolution and Shahabano and RAMManndir issues Salute to rajiv ganghi for his secularism

sadashiv म्हणाले...

We must greaty thankful to late. PM Rajiv Gandhi for Telecom revolution and Shahabano and RAMManndir issues Salute to rajiv ganghi for his secularism

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes