मंगळवार, जानेवारी १९, २०१६

तथाकथित संकृती-धर्म-देशप्रेमी अजून किती बळी घेणार ?


दुर्दैवी रोहित वेमुला
हैदराबाद विद्यापीठामये गेल्या काही दिवसात 'आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन' आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यामध्ये चाललेल्या वादात अखेर रोहित वेमुला या विद्यार्थ्याचा बळी गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी असणाऱ्या रोहितचा शेवट अशा प्रकारे व्हावा ही  मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. हैदराबाद विद्यापीठाचा पीएच. डी. चा विद्यार्थी आणि आंबेडकरी चळवळीचा संघर्षाचा वारसा असणाऱ्या रोहितसारख्या मुरलेल्या कार्यकर्त्याला आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या कारणांची थोडी चिकित्सा केली पाहिजे. विद्यापीठ प्रशासन  आणि विद्यार्थी यांच्यातील वाद तसा आधीपासूनच अस्तित्वात होता. परंतु प्रसंगपरत्वे, कारणपरत्वे तो वाद अनेकवेळा उफाळून येत असे.  मग ते याकुब मेमन फाशी प्रकरण असो वा 'मुझफ्फरनगर बाकी है' या चित्रपटाचे सादरीकरण. 'मुझफ्फरनगर...' चित्रपटाचा मुद्दा तसा जास्तच वादग्रस्त ठरला. आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन आणि त्यांच्या काही समविचारी सहकार्यांनी सदर चित्रपटाच्या केलेल्या सादरीकरणाला 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' या उजव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला. चित्रपटाचे सादरीकरण चालू असताना 'अभाविप'च्या काही कार्यकर्त्यांनी तिथे येवून गोंधळ घातला. त्यातून या दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली.

अभाविपचा कार्यकर्ता सुशीलकुमार आणि त्याचा भाऊ विष्णू (भारतीय युवा मोर्चा) यांनी रोहित आणि त्याच्या मित्रांविरुद्ध मारहाणीची तक्रार केली. हैदराबादचे भाजपचे विधानपरिषद सदस्य रामचंद्र राव यांनी उपकुलगुरूची भेट घेवून रोहित आणि त्याच्या मित्रांवर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या तपासात अशा प्रकारची मारहाण झाल्याची कोणतीही घटना समोर आली नाही. तसेच विद्यापीठाचे सुरक्षारक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार अशी कोणतीही मारहाणीची घटना घडली नव्हती. अभाविप आणि हे विद्यार्थी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र मारहाणीचा प्रकार कल्पोकल्पित असल्याचेच सर्वजण सांगत आहेत. त्यामुळे समितीने रोहित व त्याचे मित्र निर्दोष आहेत असा अहवाल दिला.

इथपर्यंत मामला इतका गंभीर नव्हता. परंतु जेव्हा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री (श्रम आणि रोजगार) बंडारू दत्तात्रय हे या प्रकरणात पडले तेव्हा मात्र याला गंभीर वळण लागले. दत्तात्रेय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून 'आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन' ही जातीयवादी व देशद्रोही संघटना असून त्यांच्यामुळे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था ही देशद्रोहाचे अड्डे बनत चालले आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. स्मृती इराणी यांनीही पडत्या फळाची आज्ञा मानून हैदराबाद विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र विद्यापीठाने नवीन समिती नेमून विद्यार्थ्यांना एकतर्फी दोषी घोषित केले. त्यांना देशद्रोही आणि जातीयवादी ठरवून वसतिगृहातून आणि विद्यापीठातून काढून टाकले. विद्यापीठाने कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोहित वेमुला, प्रशांत, विजयकुमार, शेशैय्या चेमुद्गुंदा आणि वेल्मुला सुन्कला यांचा समावेश होता. हे पाचही विद्यार्थी पीएच.डी. करत होते. विद्यापीठाने कारवाई केल्यानंतर या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. त्यांच्या विद्यापीठाशी संबंधित अनेक बाबींवर बंदी घातली. तब्बल बारा दिवस हे पाच विद्यार्थी आपले सामान आणि डॉ. आंबेडकरांचे एक पोस्टर घेवून विद्यापीठाच्या बाहेर रस्त्यावरच राहिले. फुटपाथवर राहून त्यांनी आपले आंदोलन पुढे चालवले. 

आपणाला न्याय मिळावा म्हणून सर्वपरीने त्यांचे प्रयत्न चालू होते.  रोहित व त्याचे सहकारी लोकशाही व घटनात्मक मार्गाने संघर्ष करत होते. असे असताना या विद्यार्थ्यांवर सुडाची कारवाई करणे योग्य नव्हते. याकुब मेमनच्या फाशीला विरोध, 'मुझफ्फरनगर बाकी है' या चित्रपटाचे सादरीकरण आणि आंबेडकरवादी विचारांचा प्रचार-प्रसार यामुळे 'अभाविप'सकट अनेक उजव्या संघटना या विद्यार्थ्यांना विरोध करत होत्या. हा संघर्ष वैचारिक पातळीवर आणि विद्यापीठ स्तरावर राहिला असता तरी ठीक होते. परंतु बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांनी सदर प्रकरणी विशेष लक्ष घालून 'आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन' आणि 'आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल'वर बंदी घालण्याचा प्रयत्न करणे सर्वस्वी चुकीचे होते. वरिष्ठ स्तरावरून होत असलेला विरोध आणि न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्त झाल्यानेच रोहित वेमुला याचा बळी गेला. 

हा राजकीय बळी आहेच परंतु जातीयही आहे. या प्रकरणाला जातीय रंग देवू नये असे म्हणणार्यांची कीव करावीशी वाटते. कारण जातवास्तव हे भारताची खरी समस्या आहे. इथे प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात आडवी येते. जन्माने मिळणारी ही जात व्यक्तीच्या मरणानंतरही त्याचा पिच्छा सोडत नाही. इथली जवळजवळ सर्वच क्षेत्रे जातीवादाने बरबटली आहेत. रोहितसकट त्याचे पाचही मित्र दलित होते हा केवळ योगायोग आहे का ? ते सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होवून समतेसाठी संघर्ष करीत होते ही त्यांची चूक होती का ? भारतीय समाजातील जातवास्तव आणि त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामाविषयी रोहित आणि त्याच्या सहकार्यांचा लढा चालू होता हा त्यांचा दोष होता का ?  रोहितच्या आत्महत्येचे समर्थन होवू शकणार नाही मात्र त्याच्यासारख्या चळवळीत मुरलेल्या व्यक्तीला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरत नसेल तर गांभीर्याने विचार केला पाहिजे. रोहितने मरण्याआधी लिहिलेले पत्र वाचले तर तो भ्याड आणि पळपुटा नव्हता हे दिसून येते. रोहित त्याच्या पत्रात लिहितो, "इस क्षण मैं आहत नहीं हूं. मैं दुखी नहीं हूं. मैं बस ख़ाली हूं. मुझे अपनी भी चिंता नहीं है. ये दयनीय है और यही कारण है कि मैं ऐसा कर रहा हूं." 

आंबेडकरी विचार प्रमाण मानून चळवळीत लढणारा रोहितसारखा खंदा कार्यकर्ता आत्महत्या करू शकतो यावर अजूनही कुणाचा विश्वास बसू शकत नाही. रोहितचा बळी गेलाच. परंतु यापुढे असे रोहित बळी जाऊ नयेत म्हणून आम्हाला काळजी घेतली पाहिजे. 'अभाविप' सारख्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षक संघटनांना चाप लावला पाहिजे. समाजात कुठे काही चुकीचे होत असेल तर त्यासाठी पोलीस आणि सरकार आहे. कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याचा आणि त्यानुसार शिक्षा करण्याचा अधिकार  'अभाविप'ला कुणी दिला ? या देशात पूर्वापार वैदिक वि. अवैदिक, ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर, पुरोगामी वि. प्रतिगामी, सनातनी वि. सुधारक असा संघर्ष चालत आलेला आहे. त्याचे स्वरूप काळानुसार वेगवेगळे असेल. परंतु यात एक समान धागा आहे. तो म्हणजे या संघर्षात एका बाजूला समतेचे पुजारी, वंचितांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आणि सनातनी विषमतावादी व्यवस्थेचे विरोधक आहेत तर दुसऱ्या बाजूला जात-धर्म-लिंगाधारित परंपरागत वर्चस्ववादी व्यवस्था शाबूत राहावी, समाजात विशिष्ठ वर्गाचेच वर्चस्व राहावे आणि इतरांनी केवळ त्यांच्या गुलामीत राहावे अशा विचारांचे लोक आहेत. सध्याही या लढ्यात एका बाजूला रोहित आणि त्याचे सहकारी होते कि जे समतावादी भारताचे स्वप्न पाहत होते तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप, अभाविप सारख्या उजव्या विचारांच्या संघटना आणि व्यक्ती आहेत. यांचा परंपरागत विषमतावादी व्यवस्थेवर विश्वास असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समतेला विरोध असतो. या संघर्षात दोन्ही बाजूनी परस्परविरुद्ध वैचारिक मांडणी केली जाते. ती गैर आहे असे कुणीही म्हणणार नाही. मात्र आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा मार्ग कोणता असावा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 'अभाविप'सारख्या संघटनाच्या विचारांना पुरोगाम्यांचा विरोध असला तरी त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा, त्यांच्या विचार-कार्याचा प्रचार-प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रोहित आणि त्याच्या सहकार्यांचे काही चुकतेय असे 'अभाविप'ला वाटत असेल तर त्यांना संविधानिक मार्ग मोकळा होता. त्यांनी लेख लिहून, पुस्तक लिहून आपला विरोध व्यक्त करावा. ज्या  'मुझफ्फरनगर...' चित्रपटावरून अभाविपने गोंधळ घातला त्याऐवजी एक चित्रपट काढून विरोध करता आला असता. परंतु ज्यांना मुद्द्यांची भाषा जमत नाही ते गुद्द्यांच्या भाषेत व्यक्त होतात. रोहित आणि सहकार्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणे, FTII च्या विद्यार्थ्यांना मारहाण, कबीर कलामंचच्या विद्यार्थांना मारहाण अशा प्रकारचे हिंसक मार्ग अभाविपसारख्या संघटना अवलंबत असतील तर त्यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. 

त्यामुळेच रोहितने जरी आत्महत्या केली असली तरी त्याला आत्महत्या करण्याइतपत परिस्थिती निर्माण करणे हे एकप्रकारे त्याची हत्या केल्यासारखेच आहे. तेव्हा रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्वच संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची, कल्याणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच आपणावर अन्याय होतो ही भावना समाजातील एका वर्गाला सतत डाचत असते. या वर्गाला न्याय मिळवून देवून दिलासा देण्यात सरकार शासन-प्रशासन अपयशी ठरत असेल तर यापुढेही असे शेकडो रोहित वेमुला बळी जातील याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tags:-

rohit vemula, bandaru dattatrey, amedkar students association, amedkar-periyar study circle, smriti irani, narendra modi, akhil bhartiy vidyarthi parishad, haiderabad central university, vice chancellor apparav, ramchandra, bjp, abvp, rss, vhp, hindu ideology, sucide of rohit vemulla, murder of rohit vemula, arvind kejariwal, rahul gandhi, dalit scholar murdered at hiederabad, dalit activist protest against abvp, atrocities against dalits, progressive movement.

दलित चळवळ, रोहित वेमुला, रोहित वेमुलाची आत्महत्या, दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, हैदराबाद विद्यापीठ, दलित अत्याचार, बंडारू दत्तात्रेय, स्मृती इराणी, नरेंद्र मोदी, भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन, आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल, दलित विद्यार्थ्यांची हकालपट्टी.

22 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

nice article. We support Rohit Vemula

अनिता म्हणाले...

रोहित जातीयवादाचा बळी ठरला. अभाविपवर बंदी घातली पाहिजे.

#banabvp म्हणाले...

#banabvp
#banrss

Unknown म्हणाले...

#banabvp

Manoj Nirgudkar म्हणाले...

रोहितवर अन्याय झाला आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. परंतु रोहितने आत्महत्या केली हे चुकीचे वाटते. त्यातून चुकीचा संदेश जातो असे वाटते.

प्रकाश पोळ म्हणाले...

Tags:-

rohit vemula, bandaru dattatrey, amedkar students association, amedkar-periyar study circle, smriti irani, narendra modi, akhil bhartiy vidyarthi parishad, haiderabad central university, vice chancellor apparav, ramchandra, bjp, abvp, rss, vhp, hindu ideology, sucide of rohit vemulla, murder of rohit vemula, arvind kejariwal, rahul gandhi, dalit scholar murdered at hiederabad, dalit activist protest against abvp, atrocities against dalits, progressive movement.

दलित चळवळ, रोहित वेमुला, रोहित वेमुलाची आत्महत्या, दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, हैदराबाद विद्यापीठ, दलित अत्याचार, बंडारू दत्तात्रेय, स्मृती इराणी, नरेंद्र मोदी, भाजप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आंबेडकर स्टुडनट्स असोसिएशन, आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल, दलित विद्यार्थ्यांची हकालपट्टी.

अनामित म्हणाले...

हा मुलगा दलित होता म्हणूनच हे प्रकरण उचलून धरलेले आहे. भाजपला आणि पर्यायाने मोदिना बदनाम करण्यासाठी च हा आटापिटा चाललेला आहे. इथे वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो कि या मुलावर विद्यापीठाने योग्य कारवाई केलेली आहे. या विद्यार्थ्याचे रेकोर्ड खराब आहे. हा विद्यापीठात गुंडगिरी करायचा म्हणून प्रशासनाने याला निलंबित केले होते. यात जातीचा कुठेच संबंध येत नाही. याला जातीच रंग दिलाय तो विरोधक आणि सेकुलर वाल्यांनी. पण मुद्दा असा आहे कि देशात हत्या या फक्त दलित आणि मुस्लीमांच्याच होतात !!! बाकी सगळे स्वाभाविकपणे मरतात किंवा निधन पावतात. त्यामुळे याला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कॉंग्रेस किंवा विरोधी पक्ष जर जातीय रंग देणार असतील तर विरोधी पक्षाकडे सत्ताधार्यान्विरुद्ध कुठलाच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही.असे खेदाने म्हणावेसे वाटते

ganesh ubale म्हणाले...

एवढीच मेहनत व एवढाच अभ्यास जर मालदा हिंसाचारावर केला असता तर बरे झाले असते , पण मग तुम्हाला पुरोगामी कोण म्हणणार? किती दिवस ही बेगडी पुरोगामित्वाची झूल पांघरणार आहात? कधीतरी अतिशयोक्ती न करता पूर्वग्रहदूषित न होता लिहा

ganesh ubale म्हणाले...

एवढीच मेहनत व एवढाच अभ्यास जर मालदा हिंसाचारावर केला असता तर बरे झाले असते , पण मग तुम्हाला पुरोगामी कोण म्हणणार? किती दिवस ही बेगडी पुरोगामित्वाची झूल पांघरणार आहात? कधीतरी अतिशयोक्ती न करता पूर्वग्रहदूषित न होता लिहा

प्रकाश पोळ म्हणाले...

@ गणेश उबाळे जी,

आपण मला मालदा हिंसाचारावर मेहनत घ्यायला सांगितलेली आहे त्याबद्दल धन्यवाद...

आपण हा ब्लॉग नीट वाचला नाही असे दिसते. मालदा हिंसाचार प्रकरणावर मी लिहिले आहे. http://www.sahyadribana.com/2016/01/blog-post_29.html या लिंकवर आपणाला तो लेख वाचता येईल. पुरोगामी लोकांवर अशा पद्धतीने अज्ञानमूलक टीका करण्याआधी नीट माहिती घ्यावी.

अनामित म्हणाले...

hindu lokachya navae garal okalya sivay dalit nete ani tuzya sarkhe lokanche pot nasen bharen.

प्रकाश पोळ म्हणाले...

@अनामित-

दलितांची राजरोस हत्या होत असताना समाजातील सुबुद्ध लोकांनी गप्प बसावे ही अपेक्षा आपण करताच कशी...ज्याने जातीयवादाला कंटाळून आत्महत्या केली तो रोहित वेमुला कोणत्या जातीचा होता ते मलाही माहित नाही. माहित करून घ्यायची गरजही नाही. परंतु तो आंबेडकरी चळवळीतील खंदा कार्यकर्ता होता हेच खूप आहे.

परवा कोल्हापुरात ब्राह्मण युवकाची आंतरजातीय लग्न केले म्हणून हत्या झाली. त्याच्या बायकोचीही निर्घृण हत्या करण्यात आली. त्याबद्दलही मी लोकसत्ता, सकाळ आणि माझ्या ब्लॉगवर लिहिले होते. लोकसत्तामधील माझे पत्र वाचून एबीपी माझाने या विषयावर चर्चाही आयोजीत केली होती. या लेखात मी पुरोगामी संघटनानाही फटकारले आहे.
परवा झालेल्या मालदा येथील मुस्लिम समाजाच्या आंदोलनाचीही दखल घेवून त्यावर कोरडे ओढण्याचे काम मी केले आहे. एखाद्या विषयावर मतप्रदर्शन करताना मी नेहमी संयमी मांडणी करण्याचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे मतभेदांचे नेहमीच स्वागत आहे. परंतु मोघम टीका न करता स्पष्ट चर्चा करावी.

आपणासारखे लोक दलित, मुस्लिम मरत असतानाही शांत राहतात यातच सर्व काही आले.

अनामित म्हणाले...

Aajkal aambedkaranche nav ghevun swatche pot bharnyacha dhanda saglikade jorat suru aahe. (sagle ambedkarvadi swatchya dokyavar swatchaya jatiche label lavun firat astat.

प्रकाश पोळ म्हणाले...

@ अनामित-

आपण म्हणालात ते खरे आहे. आजकाल आंबेडकरांच्याच नाही तर सर्वच महामानवांच्या नावावर पोट भरण्याचा, राजकारणाचा धंदा जोरात चालू आहे. परंतु युवा पिढी हे चित्र बदलू शकते. त्यासाठी आपणाला पुढे येवून व्यक्त व्हावे लागेल. समता, न्याय, स्वातंत्र्य ही संविधानाची मुल्ये जपण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. सह्याद्री बाणाचा उद्देशच मुळी तो आहे. तेव्हा आपण सर्वजण मिळून हे चित्र बदलू शकतो अशी मलातरी आशा वाटते.

Be positive....

अनामित म्हणाले...

"ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची, कल्याणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच आपणावर अन्याय होतो ही भावना समाजातील एका वर्गाला सतत डाचत असते"

ही भावना समाजातील सर्वच वर्गांना डाचत असते. जातीआधारित आरक्षणाच्या विरोधात जी आंदोलने झाली त्यात देखील काही तरुणांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांची नावे मात्र आजच्या पुरोगामी कार्यकर्त्यांना आठवणार नाहीत. कारण ते विरुध्द पक्षातील होते ना!

"अपना खून खून दुसरो का खून पानी", हे तत्वज्ञान केवळ उच्चवर्णीयच नव्हे तर तथाकथित पुरोगामी मागासवर्गीय देखील स्वत:च्या सोयीनुसार वापरतात.

प्रकाश पोळ म्हणाले...

@अनामित-

ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची, कल्याणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच आपणावर अन्याय होतो ही भावना समाजातील एका वर्गाला सतत डाचत असते"
....ही भावना सर्व समाजातील उपेक्षित वर्गालाच प्रकर्षाने जाणवत असते. कारण शासनयंत्रणा आणि सरकार उच्चभ्रू समाजाच्या हितासाठी चालवत असल्याचा प्रत्यय येतो. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी आणि अभाविप यांच्या वादात प्रशासन अभाविपच्या बाजूने उभे राहिले. त्याची परिणती रोहितच्या आत्महत्येत झाली हे लक्षात घ्यावे.

अनामित म्हणाले...

Since Rohit was from poor family, it his first priority to concentrate on study only. If he want to any activity related to politics he supposed to do outs side college campus.
If he was suspended to use college hostel then also he not improved himself. That time he was supposed to stay paying guest or with relative or another option was to rent a room. But never did it because he brain was spoiled by some bullshit thoughts. He started andolan in college campus.
Most of dalit and minority peoples brain washing done to hate Hindu peoples, their customs and tradition.
Everywhere in the world minority have very limited access, but in India it is reverse, even though thsese peoples are getting more benefits they are always planning to hurt majority.
In hindi it said that "pani me rahakar magarmachh se vair nahi rakhna chahiye."

प्रकाश पोळ म्हणाले...

भाग १-
@अनामित-
आपण मांडलेल्या मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ.

१. आपला पहिला मुद्दा असा आहे कि गरीब घरातील विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यांनी इतर चळवळी करत बसू नये. जर इतर गोष्टी करायच्या असतील तर त्या शैक्षणिक संस्थांच्या बाहेर कराव्या.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित आणि त्याचे सहकारी स्वतःच्या हक्काची, स्वाभिमानाची लढाई लढत होते. या जात-धर्माधारित व्यवस्थेत दलित, अल्पसंख्यांक, उपेक्षित, मागास वर्ग यांना टिकून राहायचे असेल तर संघर्ष केलाच पाहिजे. रोहितचा संघर्ष हा समतेसाठी, मानवमुक्तीसाठी तसेच संविधानातील स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी होता. रोहित अभ्यासाव्यतिरिक्त इतर राजकारण करत होता असेही नाही. आपला अभ्यास सांभाळून त्याने संघर्ष चालू ठेवला होता. तो पीएच. डी. चा शिष्यवृत्तीप्राप्त छात्र होता. त्याचे इतर सहकारीही शिष्यवृत्तीप्राप्त पीएच. डी. चे विद्यार्थी होते. याचा अर्थ त्यांनी या विषमतावादी व्यवस्थेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणे म्हणजे राजकारण करणे नव्हे. आपली मते मांडणे, चळवळ करणे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विद्यार्थ्याने फक्त अभ्यासच करावा असे नाही. विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. तेव्हा त्यांनी न्याय्य हक्कांसाठी संघर्षरत असणे हे देशाच्याच भल्याचे आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू अशा अनेकांनी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळेच समाजातील विषमता काही प्रमाणात का होईना कमी झाली. रोहित आणि त्याचे सहकारी हा वारसा पुढे नेत असताना त्यांच्या संघर्षाला अनावश्यक राजकारण म्हणून नाके मुरडणे हे आपल्या अभिजन मानसिकतेचे लक्षण आहे.

२. रोहितला वसतिगृहातून निलंबित केले तरी तो सुधारला नाही असे आपण म्हणता. त्याच्या आंदोलनाबद्दल आपले आक्षेप आहेत.
- वर सांगितल्याप्रमाणे रोहित आपल्या हक्कांची लढाई लढत होता. त्याचा मार्ग संविधान आणि लोकशाही प्रक्रियेशी सुसंगत होता, त्यामुळे त्याबद्दल कुणालाच तक्रार असण्याचे कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितला वसतिगृहातून निलंबित केले तेच मुळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या दबावामुळे असा आमचा सर्वांचा आक्षेप आहे. ज्या कथित मारहाण प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्याने तक्रार केली होती ती मारहाण झालीच नव्हती असे तेथील विद्यार्थी, सुरक्षारक्षक यांचे म्हणणे आहे. तसेच आपणाला मारहाण झाल्याचा बनाव करून अभाविप'चा कार्यकर्ता हॉस्पीटलमध्ये दाखल झाला. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला कोणतीही बाह्य इजा झाली नसल्याचा अहवाल दिला आहे. अभाविपचा कार्यकर्ता अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झाला होता. त्यामुळे रोहितविरुद्ध जो काही बनाव करून त्याला गुंडाच्या पातळीवर नेवून बसवले जात आहे हे षड्यंत्र आहे.

प्रकाश पोळ म्हणाले...

भाग २-


३. अनेक दलित व अल्पसंख्यांक लोकांना हिंदूंचा द्वेष करायला शिकवले जाते.
- मुळात ब्राह्मणी व्यवस्थेने दलित-अस्पृश्य, आदिवासी यांना कधीही चांगली आणि समतेची वागणूक दिली नाही. त्यामुळे दलितांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, कांशीराम हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. ब्राह्मणी व्यवस्थेचे बिनपगारी शिपाई म्हणून आमच्याच ओबीसी बांधवांनी दलित-अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार केला. दगड मारणार ओबीसी मात्र त्यापाठी मेंदू असायचा ब्राह्मणाचा. अर्थात काहीही असले तरी ब्राह्मण आणि अत्याचार करणारे ओबीसी दोघेही दोषी आहेत. अर्थात याला काही सन्माननीय अपवादही आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करणारे, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले अनेक ब्राह्मण आणि ओबीसी आहेत. तर मुद्दा असा आहे कि ज्या घटकांनी पिढ्यानपिढ्या एखाद्यावर अन्याय केला तर त्या घटकाने आपणाविरुद्ध थोडाही आवाज काढू नये हे अपेक्षा खूप चुकीची आहे. दलित-अल्पसंख्यांक अन्यायाविरुद्ध बोलले तर ते नैसर्गिक मानले पाहिजे. काही घटक समाजात द्वेष पेरण्याचे काम करत असतीलही. मात्र त्यामुळे संपूर्ण चळवळीला आणि उपेक्षितांच्या संघार्षालाच नाकारणे चुकीचे आहे.

४. जगात सर्वत्र अल्पसंख्याकांना फारसे हक्क नाहीत, मात्र भारतात त्यांना जास्त हक्क, सुविधा आणि फायदे मिळतात असे आपण म्हणता.
- हा तर आपला आणि व्यवस्थेच्या समर्थकांचा गोड गैरसमज आहे. भारतात हिंदुबहुल राजकारण प्रामुख्याने चालते. दलित-अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन केल्याचे फक्त नाटक केले जाते. सत्तेवर कॉंग्रेस असो वा भाजप. दोघांचीही धोरणे दलित-मागास-अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय करणारीच आहेत. गेल्या दोन वर्षात घडणाऱ्या घटना पहिल्या तर हिंदुत्ववादी शक्तींना किती बळ आलंय ते दिसून येईल. मुस्लिम-दलितांच्या राजरोस हत्या होत आहेत, त्यांना आत्महत्या करायला भाग पडत आहे आणि वरून त्यांनी नाकासमोर बघून चालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हे कशाचे लक्षण आहे ? भारतातल्या बहुसंख्यांक राजकारणाचीच ही परिणती नव्हे काय ?

५. पाणी मी रहकर मगरमच्छ से वैर नही रखना चाहिये.
- याचा अर्थ प्रथापित, अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध बोलायचेच नाही का ? समोर चुकीचे घडत आहे आणि आपण गप्प बसायचे का ? आणि जर गप्प न बसता संघर्षाचा मार्ग निवडला तर त्याला संपवण्याचा प्रयत्न होणार का ? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, रोहित या सर्वाना गप्प बसण्याचा मार्ग उपलब्ध होता. परंतु ही व्यवस्था राजरोस नैतिक मूल्यांचे खून पाडत असताना गप्प राहणे वरील व्यक्तींना योग्य वाटले नाही. या संघर्षात आपल्या जीवाचे बरे-वाईट होवू शकते याचीही जाणीव त्यांना होती. तरीही त्यांनी संघर्ष केला. दाभोळकरांना संपवले म्हणून पानसरे गप्प बसले नाहीत. पानसरेना गोळ्या घातल्या म्हणून कलबुर्गी शांत राहिले नाहीत. आणि या तिघांच्याही मारेकर्यांना पकडावे म्हणून प्रयत्न करणारा रोहितही शांत राहिला नाही. सर्वाना माहित आहे कि या संघर्षात काहीही होवू शकते. परंतु हा लढा आमच्या स्वार्थासाठी नाही. तर उदात्त मानवी मूल्यांसाठी आहे. त्यामुळे आम्हीही रोहितच्याच मार्गाने हा लढा लढत राहू. भले आपण काहीही करा....

Amit म्हणाले...

I have serious doubt on Rohit Vemula's intentions. You are saying he was fighting against discrimination. However, i clearly remember one signboard in the protest which was held against hanging of Yakub. It roughly translates like"if you kill one Yakub, 100 or 1000 will be produced". That's clear example of threat against Democracy. It was not fight against discrimination. And Rohit was part of it.

Rohit म्हणाले...

I agreed with u Mr. Prakash

Manesh म्हणाले...

yakub menon kay deshbhakta hota ka tyachya fashi la virodh karayla

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes