मंगळवार, नोव्हेंबर २४, २०१५

मस्तानीच्या प्रणामी संप्रदाया विषयी...


कालच्या माझ्या मस्तानी ..सौंदर्य ...प्रेम आणि असुया या लेखावर खुप चांगला प्रतिसाद मिळाला ...अनेकानी तो whtsapp वर शेर केला .. काही जणांचे त्यासाठी फोन आणि मेसेज आले ...सोलापुर वरुन राकेश , पुण्यावरुन शैलेश पाटील ....मुंबइ वरुन माझे मित्र आणि धडाडीचे पत्रकार मनोज भोयर ...अरुण खोरे
सर .. लेखक आणि मला मनस्वी आवडणारे राजन खान आणि मुळचे बार्शीचे असलेले माझे स्नेही पत्रकार विलास पाटील यानी प्रणामी संप्रदाया बद्दल सविस्तर लिहायला सांगितले होते. त्यासाठी या मानवतावादी सांप्रदायाबद्दल लिहत आहे.


सिंध प्रांतातील ( सध्या पाकीस्तानात ) उमरकोट गावातील श्री. देवचंद्रजी महाराज ( जन्म 1581आणि मृत्यु 1655 ) यानी वयाच्या सोळाव्या वर्षी दिव्यज्ञानाच्या शोधात घर सोडले ....धार्मिक सद्भभावनेची शिकवन देवू लागले त्याला त्यानी सुरुवातीला निजानंद संप्रदाय असे नाव दिले. पुढे गुजरात मधील जामनगर येथे ते स्थायिक झाले ...सोप्या भाषेत धर्म चिकित्सेवर भाष्य करुन रचनाही लिहल्या. 

त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी निर्माण झाले ...त्या अनुयायाना सुंदर साथ किंवा प्रणामी या नावाने ओळखु लागले. पुढे हा प्रणामी ( परनामी ) संप्रदाय झाला. या संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टे.... इश्वर एक असून गीता आणि कुराण दोघांचेही लक्षय एकच इश्वर आहे. अशा या प्रणामी संप्रदाय पुढे देवचंद्रजी महाराजांचे शिष्य महामति प्राणनाथ ( 1618 ते 1694) यानी मोठ्या प्रमाणात वाढविला ....हिंदु आणि मुस्लिमातील धार्मिक कडवट पणाची किनार अतिशय पातळ करुन नवी सहिष्णुता निर्माण करणा-या संप्रदायाची दिक्षा मस्तानीचे वडिल बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यानी 1683 मध्ये घेतली आणि ते कट्टर अनुयायी झाले. प्राननाथ यानी 14 वेगवेगळे ग्रंथ लिहले त्यात वैदिक ग्रंथाबरोबर कुरान , तोरा , बायबल या ग्रंथाचा आधार घेतला. या चौदा ग्रंथाची नाव पुढील प्रमाणे आहेत रास , प्रकाश, षटऋतु , कलश , सनंद , किरंतन , खुलासा , खिलवत , परिक्रमा , सिनगार ,सिंधी, मारफत सागर आणि कयामतनामा. 
1722 मध्ये मस्तानी बाजीरावांच्या आयुष्यात आली ....अर्थात छात्रसाल महाराज या संप्रदायात आल्या नंतर मस्तानीचा जन्म झाला त्यामुळे तिच संपूर्ण बालपण या संप्रदायाच्या शिकवणीत गेले असल्यामुळेच तीला गिते बरोबर कुराणातल्या आयातीही पाठ होत्या. 

यातली आणखी एक महत्वाची आणि अधोरेखित करता येइल अशी गोष्ट म्हणजे महात्मा गांधीची आइ पुतळीबाइ या प्रणामी सांप्रदायी होत्या ....यावरुन या संप्रदायाचे महत्व लक्षात येइल. मस्तानी आणि बाजीराव यांच्या वैचारिक झेपेचीही कल्पना येइल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes