मंगळवार, मे १२, २०१५

विचारांची लढाई विचारानेच लढा...

संजय सोनवणी यांच्यासारख्या चतुरस्त्र लेखक, संशोधक, विचारवंताला काही दिडदमडीची फॅसिस्ट मंडळी शिव्या देत आहेत. संजय सोनवणी हे नेहमीच वादग्रस राहिले आहेत. वाद आणि सोनवणी सर यांचं नातं अतुट आहे. सोनवणी सरानी एखाद्या प्रकरणी सरळधोपट, बहुसंख्यांकांच्या लोकानुनयाची भुमिका न घेता स्वतंत्र विचार मांडले तर काही समाजघटकाना ते पटत नाहीत. 


एकाच भुमिकेबद्दल ब्राम्हण त्याना ब्राम्हणद्वेष्टे म्हणतात तर मराठे आणि मुलनिवासी त्याना भटाळलेले म्हणतात. आता एकाच वेळी कोणतीही व्यक्ती ब्राह्मणद्वेष्टी आणि भटाळलेलीही कशी असू शकते असा माझ्या बालबुद्धीला प्रश्न पडला आहे. बर, सोनवणी सर काही हुकुमशाही प्रव्रुत्तीचे नाहीत. मी म्हणेल तेच सत्य आणि ते तुम्ही मानलेच पाहिजे असे ते कधीही म्हणत नाहीत. किंबहुना त्यांच्याइतका नम्र माणूस शोधून सापडणे कठीण आहे. बर्याच जणांशी वैचारिक मतभेद होऊनही सोनवणी सर नेहमी चर्चेला तयार असतात. आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतात. सोनवणी सरांचे सर्वच विचार योग्य असतील असेही नाही. त्यात काही त्रुटीही असतील. काही गोष्टी चुकत असतील. पण त्या त्रुटी, चुका सभ्य मार्गाने, वैचारिक चर्चेतून दाखवून देणे हा मार्ग योग्य आहे. परंतु अलीकडे महाराष्ट्रात काही लोकाना मुद्द्याची भाषाच समजत नाही. कदाचित ती भाषा पेलण्याइतकी त्यांची वैचारिक पातळी नसेल त्यामुळे मुद्द्याकडे दुर्लक्ष करुन अशी मंडळी गुद्द्यावर येतात. आपल्या सामाजिक, राजकिय ताकदीचा वापर करुन समोरच्या व्यक्तीवर दबाव आणन्याचा प्रयत्न करतात. वैचारिक भुमिकेशी देणेघेणे नसल्याने अश्लिल शिव्या ओघाने आल्याच. मग आपल्या बगलबच्च्याना समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर द्यायचा आणि शिव्या द्यायला सांगायच्या. असे उद्योग सध्या चालू आहेत. यातून प्रा. हरी नरके सरांसारखा विद्वानही सुटला नाही. ज्या माणसानी आपली हयात ज्ञाननिर्मितीत, वंचित समुहाच्या कल्याणासाठी घालवली, त्यांच्याशी काही मतभेद झाले म्हणून अशा प्रकारची घाणेरडी वागणूक देणे कोणत्याही सुद्न्य माणसाचे लक्षण नाही.

पूर्वी ब्राह्मण वर्गाने आपल्या विरोधाकांचा मुकाबला करण्यासाठी अशीच फॅसिस्ट पद्धत अवलंबली होती. धर्म, परंपरा, सनातनी व्यवस्था यांच्याविरुद्ध जो कोणी बोलेल, क्रुती करेल त्याला अनन्वित छळाला सामोरे जावे लागे. महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर आदि लोकाना मारहाण करण्यापर्यंत या सनातन्यांची मजल गेली होती. दरम्यान पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर आणि इतर समाजसुधारक, माहामानवांच्या लढ्यामूळे ब्राह्मणांचे वर्चस्व कमी झाले. परंतु आता मराठे आणि मुलनिवासीनी त्यांची जागा घेतली आहे. या लोकांचे म्हणने आहे कि आम्ही म्हणतो तेच खरे. विरोधात बोलाल, तर खबरदार. म्हणजे वैचारिक वाद-प्रतिवाद, चर्चा याना काहीच अर्थ नाही. अलीकडे काही मराठा संघटनानी खूप उचल खाल्ली आहे. सुरुवातीला ब्राह्मणांच्या विरोधात बोलत असल्याने दलित, बहुजन संघटनानीही त्याना पाठिंबा दिला. कारण जो ब्राह्मणविरोधी तो पुरोगामी अशी नवी व्याख्या तयार झाली आहे. त्या द्रुष्टीनी या मराठा संघटना पुरोगामी ठरवल्या गेल्या. आणि इथेच दलित, बहुजन संघटनांची फसगत झाली. हळूहळू ब्राह्मणांवर असलेला निशाणा दलित, ओबीसींकडे वळू लागला. दलित, ओबीसी नेते, विचारवंतांवर चिखलफेक होऊ लागली. आणि मी स्वत: या संघटनांची कार्यपद्धती जवळून पाहिली असल्याने मला या गोष्टींची चांगलीच जाणीव आहे. ब्राह्मणी विचाराने लिहिलेल्या इतिहासाला विरोध करुन इतिहासाची पुनर्मांडणी करताना तो जर मराठा angle ने लिहिला तर कसे चालेल. ब्राह्मणानी ब्राह्मणवर्चस्व वाढवण्यासाठी इतिहासाचा वापर केला हे जितके सत्य आहे, तितकेच इतिहासाच्या पुनर्मांडणीच्या नावाखाली मराठा संघटना मराठा वर्चस्व वाढवत आहेत हेही सत्य आहे. थोडक्यात काय, इतकी वर्षे ब्राह्मणांची गुलामी केली, आता मराठ्यांची करावी लागेल. कारण काळाची चक्रे तर त्याच दिशेने फिरत आहेत.

पण सर्वच जातीधर्मातील सुजान व्यक्तीना (यात ब्राह्मण आणि मराठेही आलेच ) माझी विनंती आहे कि जाती-धर्माच्या पलीकडे जावून जे घडतंय त्याचा विचार करा. चुकीच्या गोष्टीना वेळीच विरोध करा. ताकतीचा वापर करुन कोणी बुद्धिवादी, विचारवंत, अभ्यासकाना त्रास देत असेल तर संघटित होऊन त्यांचा सामना करा. महात्मा फुल्यांच्या स्वप्नातील एकमय समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपणावरच आहे हे विसरु नका.

शेवटी.....प्रा. हरी नरके, संजय सोनवणी आणि फॅसिस्ट मनोव्रुत्तीचे बळी ठरलेले सर्वच व्यक्ती....याना सांगू इच्छितो कि तुम्ही एकटे नाही आहात. सर्व समाज आपल्यासोबत आहे. विचारांची भाषा सोडून कोणी दंडुका दाखवत असेल तर त्यांच्या हजारो दंडुक्याना आमची एक लेखणी पुरेशी आहे.

19 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes