शनिवार, फेब्रुवारी १४, २०१५

नेमाडेंच्या ज्ञानपीठ ची पोटदुखी

8 फेब्रु. च्या लोकसत्तामध्ये विनय हर्डीकर यांचा 'नेमाडेनी द्न्यानपीठ परत करावा' हा लेख वाचला. कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या अभिजात साहित्यिकाला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च द्न्यानपीठ पुरस्कार मिळणे ही सर्व मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणूनही नेमाडे यानी प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत मराठीला अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता असतानाच नेमाडेंच्या अभिजात लेखनाचा द्न्यानपीठने गौरव व्हावा ही अभिनंदनीय बाब आहे. नेमाडे हे प्रस्थापित साहित्यिकांच्या वर्तुळात कधीच रमले नाहीत. ते या परिघाच्या बाहेरच राहिले. प्रस्थापितानीही नेमाडे यांच्या कोसला, हिंदू अशा अभिजात साहित्यक्रुतींचा गौरव करण्याचे सौजन्य दाखवले नाही. नेमाडे कधी साहित्यसमेलनाला गेले नाहीत. कारण तिथे साहित्य किती उरलेय हा प्रश्न अनेकांप्रमाणे त्यानाही सतावतोय. साहित्य समेलनाबद्दल त्यांची परखड मते सर्वानाच माहित आहेत. इंग्रजी शाळांबद्दल त्यानी केलेली विधानेही वादग्रस्त ठरली. नेमाडे यांची भूमिका योग्य कि अयोग्य याची चिकित्सा होऊ शकते. मात्र त्यांच्याबद्दल द्वेषाने, तिरस्काराने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. नेमाडे यांच्या काही विचारांबाबत मतभेद असतील तर ते मांडत असतानाच त्यांच्या साहित्य सेवेचाही गौरव करणे क्रमप्राप्त आहे. परंतु साहित्य वर्तुळातील प्रस्थापित नेमाडेंचे कर्तुत्व मानायला तयार नाहीत. त्यातच नेमाडेना द्न्यानपीठ मिळून त्यांच्या लेखनाचा दर्जा सिद्ध झाल्यानेच काही मंडीळीना पोटशूळ उठला आहे. त्यामूळेच एका बाजूला नेमाडेंचे कौतुक चालले असताना दुसर्या बाजूला त्याना झोडपून काढणारेही दिसतात. या मंडळीना साहित्याच्या सेवेपेक्षा त्याआडून राजकारण करण्यातच रस असतो. आणि ही गोष्ट साहित्य समेलनाच्या निवडणूका, मानापमान, साहित्यबाह्य वाद यातून दिसून येतो. नेमाडे यांचे टिकाकार काहीही म्हणोत. नेमाडेनी मात्र मराठी वाचकाना आपल्या लेखनाने भूरळ घातली आहे. आणि त्यांच्या साहित्याचा अभिजात दर्जा द्न्यानपीठ पुरस्काराने सिद्ध झाला आहे.

2 टिप्पणी(ण्या):

Pravin Kapse म्हणाले...

I have read whole article in 1 breath. Now I am gasping. Your work is very good. Make your good to better and then towards best. If you need any technical support I will help you with my best. Jay Sahyadribana..

Pravin Kapse म्हणाले...

I have read whole article in 1 breath. Now I am gasping. Your work is very good. Make your good to better and then towards best. If you need any technical support I will help you with my best. Jay Sahyadribana..

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes