गुरुवार, सप्टेंबर ०४, २०१४

वैभव रासकरला न्याय मिळेल का ?

कडेगाव हे सांगली जिल्ह्यातील तालूक्याचं गाव. या गावातील वैभव  रासकर हा हरहुन्नरी, गुणी खेळाडू. कुस्तीच्या क्षेत्रात वैभवने कडेगावचेच नाहितर सांगली जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. अतिशय गरीब आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या वैभवने कुमार गटातील महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवून आपल्या कुटुंबीय, मित्र यांचा विश्वास सार्थ ठरवला. अवघ्या सतरा वर्षाच्या वैभवने ऑल इंडिया चॅपियनशीप मिळवली आहे. 
अठरा वर्षाखालील गटातील वैभव खुल्या गटातील पैलवानानाही बघता बघता आसमान दाखवायचा. वैभव  फडात उतरणार म्हटल्यावर नावाजलेल्या पैलवानानाही घाम फुटायचा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही
अनेक कुस्ती स्पर्धामध्ये वैभवने विजेतेपद पटकावले आहे. वैभव  हा अतिशय गुणी खेळाडू आहे हे वैभवला ओळखणारे सारेच जाणतात. परंतु वैभवचे हे यशच अनेकांच्या डोळ्यात खुपत होते. वैभव  कुस्तीला आला कि आपला पराभव नक्की आहे या भावनेने अनेकजण मनातल्या मनात कुढत होते. पण खेळ ही स्पर्धा आहे आणि येथे जो सर्वोत्तम खेळी करतो तोच जिंकतो हा खेळाचा नियमच वैभववर राग धरणारे विसरले. एका ठिकाणी वैभव  कुस्ती खेळायला गेला असता पंधरा ते वीस जणानी त्याला अडवले. तू खुल्या गटातून कुस्ती खेळायची नाही असे त्यानी वैभवला सांगितले. वैभवने त्यास नकार दिला असता पुर्वनियोजन करुन आलेल्या त्या गावगुंडानी वैभवला दांडकी व इतर हत्यारानी मारायला सुरुवात केली. बिचारा वैभवबरोबर फक्त एकच मित्र असल्याने प्रतिकार करु शकला नाही. त्या टोळक्याने वैभवला गुडघ्यावर मारहाण केली. अतिशय बेदम मारहाणीत वैभवच्या गुडघ्याचे लीगामेंट तुटल्या आहेत. वरुन त्या टोळक्याने वैभव विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करुन राजकीय दबाव आणायला सुरुवात केली. वैभव  सध्या होस्पीटलमध्ये गंभीर अवस्थेत आहे. वैभव वर हल्ला करणार्या गुंडाना शिक्षा झाली पाहीजे. वैभव रासकरला न्याय मिळालाच पाहिजे.

वैभव रासकरला झालेल्या मारहाणीची दै. पुढारीतील बातमी, दि. 02/09/2014.

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=481676&boxid=233521328&pgno=1&u_name=0

http://epaper.pudhari.com/details.aspx?id=481680&boxid=23345328&eddate=9/3/2014

1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

गांडो भडवे रण चढे मर्दो के बेहाल

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes