रविवार, ऑगस्ट १७, २०१४

संजय सोनवणी सर

माझे मित्र, मार्गदर्शक, तत्वद्न्य, अभ्यासक, विचारवंत  संजय सोनवणी सर यांचा 14 ऑगष्ट वाढदिवस.....सराना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......

संजय सोनवणी सर अनेक क्षेत्रात काम करतात. अनेक कलागुण असलेला हा माणूस खरंच विलक्षण आहे. एक लेखक, विचारवंत म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेतच. पण सर खूप मोठे उद्योगपतीही होते. त्यांच्या
वाशिंग्टन सोफ्टवेअर आणि इतर कंपन्या स्टोक एक्सचेंज ला नोंदणीक्रुत होत्या. सरानी अखेरचे वादळ आणि इतर दोन चित्रपट बनवले. त्यात सरांचे योगदान निर्माता, दिग्दर्शक, लेखन, पटकथा, संगीत, गायक अशा सर्व पातळ्यावर होते. सरानी लिहिलेली, कांपोज केलेली आणि स्वत: गायलेली गाणि अप्रतिम आहेत. सर चित्रही छान काढतात. सरांचा अभ्यास एकाच विषयापुरता मर्यादित नाही. कथा, कादंबरी, चरित्र, वैचारिक, ललित, इतिहास, पौराणिक, बालसाहित्य अशा सर्व प्रकारचे लेखन सरानी केलेले आहे. आज रोजी त्यांची नव्वदच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर स्वत: प्रकाशकही आहेत. पुष्प प्रकाशनच्या माध्यमातून त्यानी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. सर प्रायवेट डिटेक्टिव सुद्धा होते. इतकेसारे कलागूण असणारी, अनेक विषयांचा सखोल अभ्यास असणारी व्यक्ती एकच आहे की संजय सोनवणी नावाच्या अनेक व्यक्ती आहेत असा प्रश्न अनेकाना पडतो.

हे सर्व असताना सरांचा निगर्वी, शांत, सयमी स्वभाव त्यांची जमेची बाजू आहे. अनेक लोकानी सराना खूप त्रास दिला परंतू सर कधीही त्यांच्याविषयी वाईट बोलत नाहीत. सरांचं 'माणूस' म्हणून इतरांशी वागणं आम्हाला खूप भावतं. आज माझ्यासारख्या अनेक तरुणाना सरांचा खूप आधार वाटतो. सर देत असलेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला हत्तीचे बळ येते. 

सरानी आजपर्यंत उपेक्षित, वंचित बहुजन समाजासाठी खुप काही केले. स्वत: जळत राहून दुसर्याला प्रकाश देणार्या मेणबत्ती प्रमाणे सरांचे जीवन आहे. 

सर वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेछा.....आपले विचार, कार्य असेच व्रुद्दिंगत होवो हीच सदिच्छा.......

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes