शनिवार, जुलै २६, २०१४

हिंदू हा प्रदेशवाचक शब्द

महराष्ट्र सदनात झालेल्या प्रकारावरुन संसदेत गदारोळ चालू असताना भाजपच्या एका खासदार महाशयानी हे राष्ट्र हिंदूंचे आहे, रहायचे असेल तर रहा नाहीतर  ........ला निघून जा असे वादग्रस्त वक्तव्य केले. दुसरीकडे 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेत्रुत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल असे विधान गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने केले. त्यावर गोव्याचे
उपमुख्यमंत्री डिसोझा यानी 'भारत हे हिंदू राष्ट्रच असून येथील सर्व भारतीय हिंदूच आहेत' असे वक्तव्य केले. (लोकसत्ता, 26 जुलै 2014, पान 9) या तीनही वक्तव्यावरून समाजात संभ्रमावस्था पसरली आहे. त्यामुळे हिंदू आणि हिंदूस्थान यांचे खरे अर्थ काय हे पाहिले पाहिजे. सध्या हिंदू या शब्दाचा धर्मवाचक अर्थ घेतला जातो. परंतू हिंदू हा धर्मवाचक शब्द नाही हे अनेक अभ्यासकानी सिद्ध केले आहे. सिंधु नदीच्या  पलीकडील लोकांचा हिंदू असा उल्लेख पश्चीम आशियातील आक्रमकानी करायला सुरुवात केली. त्या अर्थाने आज सर्व भारतीय हिंदूच ठरतात. परंतू पुढच्या काळात अनेक सामाजिक, धार्मिक स्थित्त्यंतरे झाली आणि हिंदू या शब्दाचा प्रदेशवाचक अर्थ मागे पडला. नंतर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला. त्यामुळे भारतातील अनेक पंथ, धार्मिक प्रवाह जरी त्यांच्यात कमालीचे भेद असले तरी हिंदू या एकाच धाग्यात गुंफले गेले. इथल्या धर्मव्यवस्थेला सर्व समाजावर वर्चस्व ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग झाला. पुढे ब्रिटीशानीही हाच कित्ता गिरवत फोडा आणि राज्य करा या तत्वासाठी हिंदू शब्दाचा वापर केला. महाराष्ट्रात  मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. पण त्याही शब्दाचा खरा अर्थ मागे पडून मराठा या शब्दाला एका जातीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तोच प्रकार हिंदू/हिंदुस्थान या शब्दांच्या बाबतीत झाला आहे. त्यामुळे प्रदेशवाचक अर्थाने सर्व भारतीय हिंदूच ठरतात आणि हिंदूंचा देश तो हिंदूस्थान. परंतू भाजपच्या काही लोकानी हिंदू/हिंदुस्थानचा जो जयघोष लावला आहे तो याच अर्थाने लावला असेल असे वाटत नाही. हिंदू या शब्दाचा धर्मवाचक अर्थच त्याना अभिप्रेत असतो. परंतु अशा संकुचित भुमिकेमुळे समाजात वाद निर्माण होतात. हिंदू/हिंदुस्थान या शब्दाकडे प्रदेशवाचक अर्थाने पाहिले तर वादाचा प्रश्नच राहणार नाही.

प्रकाश लालासाहेब पोळ, कराड, सातारा.
मोबा. 7588204128

3 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes