मंगळवार, जुलै १५, २०१४

पुणे विद्यापीठ नामविस्तार- कृतघ्न लेकाचे....

श्री. संजय सोनवणी यांनी पुणे विद्यापिठाच्या नामांतराच्या निमित्ताने उपस्थित केलेली चर्चा उद्बोधक होत आहे. तथापि यातील कोहम महोक यांच्यासारखे काही लोक मात्र हेकटपणा, वितंडवाद, व्यक्तीगत आकस/खुन्नस आणि वर्चस्ववादी मानसिकतेतून लिहीत असल्याचे दिसते. अशांच्या या लेखनामुळे चर्चेची पातळी खालावते.ह्या लोकांना स्वत:च्या जागतिक गुणत्तेची बढाई मारण्याची सवयच लागून गेलेली आहे. मुळात ज्यांना सावित्रीबाईंच्या नावाचीच आलर्जी आहे ते मूळ मुद्द्याला बगल देणारच. हे महाशय मागे म्हणाले होते, "सावित्रीबाईंचे काम प्राथमिक शिक्षणात असल्याने त्यांचे नाव द्यायचेच असेल तर एखाद्या शाळेला द्या, जर दिले नसेल तर," ही यांची जागतिक अक्कल. "शिक्षणाच्या जागतिक दर्जाचे निकष काय असावेत" हा खरा प्रश्न अतिशय व्यापक आहे. तो कळायचा ज्यांचा आवाका नाही त्यांनी जागतिक गप्पा माराव्यात हे फारच विनोदी झाले. त्यावर त्यांचे उत्तर काय तर म्हणे, १] जगात competition हा गुणवत्ता सुधारण्याचा मूलमंत्र समजला जातो.२] जगभरच्या स्पर्धेत पुढे राहायचे असेल, आणि एक विकसित देश म्हणून नावाजले जायचे असेल तर विद्यापीठे, शाळा, कॉलेजे ही जागतिक दर्जाचीच हवीत.३] जागतिक दर्जाचे शिक्षण नसेल तर मग उत्पादकता, उत्पादन, दर्जा सगळाच खालावणार. पैसा कमी मिळणार, कर उत्पादन कमी होणार, लोकांचे राहणीमान खालावणार. हौदात भर टाकणारे कमी आणि पाणी उपसणारे जास्त होणार. ह्या कम्युनिस्ट व्यवस्थेची वहिवाट कोणी लावायची? रशिया, झिम्बावे, ग्रीस यांच्याकडून आम्ही काहीच शिकणार नाही का? शिक्षणाच्या ढासळत्या दर्जाची बाजू घेणारे प्राध्यापक बघून आज धन्य झालो. ४]It is beyond me when progressive liberals want everything for themselves but do not want the quality of life, education for others!
५] ज्यांचे अक्खे करियर जातीपातीच्या गोष्ठी करण्यात गेले त्यांना माझ्या विवादात माझी ब्राम्हण जातच दिसणार. ६}जगात जर का यशस्वी व्हायचे असेल तर जागतिक दर्जाचे शिक्षण द्यायला हवे, नाहीतर इंफिरीयर पदवीधर तयार करून काय मिळवणार आहात ह्याचे उत्तर दिले नाहीत. उत्तर दिले नाहीत कारण आपल्याकडे त्याचे उत्तर नाही. तुम्ही स्वतःची फुटपट्टी वापरून पश्च्यात्त्याची शिक्षण पद्धती चूक ठरवत आहात. असे करून भारतात गरीब पदवीधर तयार करण्याचा आपला डाव आहे, बहुदा लोक गरीब राहिले,अडाणी राहिले की त्यांना आपल्यासारख्या इण्टरप्रिटरची गरज लागेल आणि तुमचे स्थान अजून पक्के होईल असा काहीसा आपला विचार दिसतो. ७] परंतु ज्या दर्जाची विकृत ब्राम्हणविरहित जातीयवादी व्यवस्था आपण अनु इच्छिता आहात, त्यामानाने आपली सामाजिक वागणूकीवर काळजीपूर्वक नजर ठेवावी लागेल आणि जनताच ती नजर ठेवेल. बहुजानांनो, हे गृहस्थ तुमच्या फायद्याचा विचार कारतात की स्व:ताच्या फायद्याचा ह्याचा तुम्हीच विचार करा.८}शिक्षणाच्या जागतिक दर्जाचे निकष काय असावे असा प्रश्न उपस्थित करणारे विद्वान प्राध्यापक विवादात मागे पडले असे वाटते. शिक्षणाच्य जागतिक दर्जाचे निकष ठरवणारे तुम्ही कोण? आपणास हार्वर्ड, ऑक्सफोर्ड, ड्युक,आणि इतर २०० संस्थांनी आपली क्षमता, योग्यता पुणे विद्यापीठाच्या दर्जाला साजेशी कमी ठेवावी असे तर तुम्ही सुचवत नाही ना? कारण काय? ते काय तुमच्यासारखे जात्यंध येडे आहेत का? survival of the fittest विसरलात का? फिट राहण्याकरता अत्युच्च दर्जा गाठण्याची तयारी लागते, परिश्रम लागतात. सदा सर्वदा प्रत्येक गोष्ट जातीच्या चष्म्यातून बघण्याची वृत्ती सोडा अशी विनंती करतो. फक्त नाव बदलून कशात कशात फरक पडणार नाहीये, शैक्षणिक दर्जात तर नाहीच नाहि. ९}ह्यामागे नामांतर मागणाऱ्यां बर्याच लोकात विद्यापीठाच्या दर्जात सुधारणा आणण्याचा वकूब, इच्छा आणि सामर्थ्यच नाहीये. इथे काही सन्माननीय अपवाद आहेत, जे दर्जाची चर्चा करताहेत परंतु प्रा. महाशय मात्र जगातील विद्यापीठांचा दर्जावर प्रश्न उभा करू लागले, ही कमाल आहे."
मी अधोरेखित केलेला मजकूर परत एकदा वाचला तर काय दिसते?.
"बळी तो कान पिळी" अशा जंगली स्पर्धेची तरफदारी हे यांचे गुणवत्तेचे तत्वज्ञान होय. खुली स्पर्धा करण्यासाठी सगळे लोक मुळात आधी एका रेषेत आणुन उभे करावे लागतात.सर्वांना समान "लेव्हल प्लेइंग फिल्ड" असावे लागते. जिथे जातीव्यवस्था नाही पण वंशवाद नी वर्गीय तसेच लिंगभावाची व्यवस्था आहे, त्या तुमच्या "प्राणप्रिय अमेरिकनांनीसुद्धा" आफरमेटिव्ह आक्शन आणली याचे काय कारण होते? वर्ण विषमतेच्या पाईक असणारांच्या डोक्यात हे शिरण्याची शक्यताच नाही. जाने दो, आपके बसकी बात नही है यह...
ज्या मनुस्मृतीच्या आधारे त्रैवर्णिकांनी २ हजार वर्षे "ज्ञानसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता" ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी राखीव ठेवली त्यांना आणखी कोणते आरक्षण हवेय? म्हणे मला आरक्षण मिळाले नाही. "मला माझ्या जातीचा काय फायदा झाला?, एका पैशाचे आरक्षण नाही की पैशाची सवलत नाही. स्व-कष्टाने आणि कोणत्याही मदतीशिवाय मोठा झालेला मी आहे. उगाच ब्राम्हणांची रोजगार हमी म्हणून माझ्या प्रयत्नांची वंचना करण्याचे कृपणपण दाखवू नका. भटोबाच्या कर्दनकाळात वर्णन केलेला मी भिक्षुक ब्राम्हण नाही ना मी कोणाकडे पूजा सांगायला जातो. "शेंडीला गाठ मारून फिरणारे ज्यांचे आजही आदर्श आहेत त्या "माजबेस" वाल्याची ही हास्यास्पद निवेदनं वाचली की त्यांच्या जागतिक आकलनाची दिवाळखोरी समोर येते. आजही {२०१४ सालीही} सगळी धर्मसत्ता एकाच जातीच्या हातात आहे.कोण आहेत हे सगळे शंकराचार्य? कोण आहेत सगळे धर्माधिकारी नी धर्माधीश? कोणत्या विद्यापिठाच्या जागतिक परिक्षेत कोणत्या गुणवत्तेच्या आधारे यांची यापदावर निवड झाली हो? राजसत्ता आणि अर्थसत्ताही या तीन वर्णांचीच बटीक आहे. ह्या लोकांनी जागतिक स्पर्धेच्या गप्पा माराव्यात?
महोदय, बहुजन तुमच्याकडे सल्ला मागायला आले की सल्ला द्या. तुमचा अनाहूत सल्ला कोणीही मागितला नव्हता. "सागरा प्रण तळामळला! ने मजशी ने अमेरिकेला!!"
ज्यांना तुम्ही २०००वर्षे राजकीय सत्ता, संपत्ती आणि ज्ञान यांची धर्माच्या आणि तलवारीच्या जोरावर बंदी घातली होती, त्यातले लोक तुम्हाला आज निरूत्तर करू लागले म्हणून तुम्ही त्यांना बरळल्यासारखे ते काय तुमच्यासारखे जात्यंध येडे आहेत का? असले शब्द ऎकवणार असाल तर याद राखा आमचे मेंदू आम्ही तुमच्याकडे गहाण टाकायचे केव्हाच नाकारलेले आहे.सभ्यपणाने बोलाल तर चर्चा करू, माजबेस सोडा, बरोबरीच्या नात्याने बोला. जागतिक गप्पा राहूद्या. तुमच्या स्वत:च्या आयाही सावित्रीबाई नसत्या तर शिकल्या नसत्या. कोणाच्या नावाला विरोध करताय? कृतघ्न लेकाचे....

अशोक बुद्धिवंत 

4 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes