बुधवार, ऑक्टोबर २३, २०१३

मराठा आरक्षणाची दुसरी बाजू

दै. लोकसत्तामध्ये दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दलित चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांचा ‘असंविधानिक आणि अनाठायी मागणी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. मराठा समाज सर्व ठिकाणी सत्ताधारी आहे, त्याच्याकडून अजूनही दलित-आदिवासी, मागास समाजावर अन्याय अत्याचार चालू आहेत, तसेच हा समाज आरक्षणाच्या सामाजिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही असंविधानिक आणि अनाठायी आहे अशा स्वरुपाची मांडणी ज. वि. पवार यांनी आपल्या लेखात केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचा लेख दै. लोकसत्ताच्या दि. २३ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला. या लेखाचे नावच मुळी ‘नकारात्मक भूमिका नकोच!’ असे आहे. या लेखात शशिकांत पवार यांनी मराठा समाज आरक्षणाचा हक्कदार आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मांडणी करताना नकारात्मक भूमिका घेवू नये अशी मांडणी केली आहे. वरकरणी पाहता त्यांची ही भूमिका योग्य वाटत असली तरी त्यांनी मराठा आरक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या नादात मराठा समाजाची नकारात्मक बाजू साफ नजरेआड केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि एकूणच मराठा समाज यावर भाष्य करणारा हा लेख....

शशिकांत पवार आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच ज. वि. पवार यांच्या लेखाला पूर्वग्रहदुषित म्हणत आहेत. ते म्हणत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ शशिकांत पवार यांच्या मराठा महासंघाने जाळले होते तो पूर्वग्रह नव्हता काय असे पवार यांना विचारावे वाटते. संपूर्ण लेखात पवार यांनी मराठा आरक्षणाची गरज प्रतिपादली आहे. परंतु हे सर्व लिहित असताना बहुतांशी प्रमाणात मराठा समाजाकडून दलित मागासांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याबद्दल पवार यांनी अवाक्षरही काढले नाही. उलट पूर्वीचा मराठा समाज आणि आत्ताचा मराठा यात जमीन आस्मानचा फरक आहे असे पवार म्हणत आहेत. मराठा महासंघाची पाळेमुळे ग्रामीण महाराष्ट्रात खूप खोलवर रुजली आहेत. महासंघाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना पवार यांना दलित अत्याचाराचे भयाण वास्तव दिसू नये ही शोकांतिका आहे. खैरलांजी येथे घडलेला अत्याचार हा दीड-दोनशे वर्षापूर्वी झाला नव्हता. त्या निर्घृण हत्याकांडात सामील असलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी किती आटापिटा केला हे पवार यांना माहित आहे. याच शालिनीताईंना बरोबर घेवून मराठा महासंघाने दलित-मागासांच्या राखीव जागांना टोकाचा विरोध केला. आरक्षणाला विरोध करता करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजावर बोचरी टिका शालिनीताई आणि मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. त्याचे पर्यवसान अनेक ठिकाणी सवर्ण-दलित यांचे संबध बिघडण्यात झाले. बाबासाहेबांवर इतक्या खालच्या पातळीवर जावून ताई आणि मराठा कार्यकर्ते चिखलफेक करत असताना शशिकांत पवार किंवा मराठा समाजाची एकही संघटना समोर येवून त्यांना थांबवू शकली नाही. उलट मराठा महासंघ, छावा यासारख्या संघटना शालिनीताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ प्रत्यक्ष सामील नसले तरी तेही ताईंना विरोध करू शकले नाहीत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दलित-मागास समाजावर अन्याय-अत्याचार होत असताना सर्व मराठा संघटना मुग गिळून गप्प राहिल्या ही शोकांतिका आहे. पवार म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाच्या चळवळी सर्वसमावेशक होत्या तर इतक्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडूनही मराठा संघटना गप्प का याचे उत्तर त्यांनी द्यावे.

पूर्वीचा मराठा आणि आत्ताचा मराठा यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे हे पटवून देण्यासाठी पवार लिहितात कि ‘महाराची सावली पडली तरी पाणी टाकून घरी येणारा तत्कालीन हिंदू आज प्रेमविवाहाच्या जमान्यात दलित सून घरात नांदवतो, दलित जावयाचे पाय धुतो.’ खरे पाहता पूर्वीचा काळ बदललाय हे खरे आहे. प्रेमविवाहाचे प्रमाणही वाढलेले आहे. परंतु मराठा समाजाची दलित सून किंवा दलित जावई स्वीकारण्याची मानसिकता आहे काय याचा विचार केला पाहिजे. वास्तव दुर्दैवी आहे परंतु आजही दलित सून किंवा दलित जावई स्वीकारायला मराठा समाज तयार नाही. दलितच कशाला, ९६ कुळी मराठे ९२ कुळी असलेल्यांना स्वीकारत नाहीत तिथे दलित फार दूरची गोष्ट आहे. आणि खरोखर जर पवार यांच्या म्हणण्यात तथ्य असते तर साताऱ्याच्या आशा शिंदेला जीव गमवावा लागला नसता, प्रेमप्रकरणावरून सोनाई येथील मेहतर समाजाच्या तीन युवकांच्या शरीराचे अमानुषपणे तुकडे केले नसते, सातेगाव (नांदेड) येथे दलित प्रियकराचे डोळे चाकूने काढले नसते. या सर्व घटना काय दर्शवतात ? या अन्याय-अत्याचाराबद्दल मराठा संघटना कधी बोलणार आहेत कि नाही ? कि पूर्वीसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही या गोड स्वप्नातच आम्ही राहणार आहोत ?
आज महाराष्ट्रात मराठा समाज हा सत्ताधारी समाज आहे. राजकीय क्षेत्रात पूर्णपणे मराठा समजाचे वर्चस्व आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून सर्व महत्वाची मंत्रिपदे मराठा समाजाकडे आहेत. राजकारणात सक्रीय असलेली मराठा घराणी खूप प्रबळ आहेत. एखाद्या मुंडे-भुजबळांचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांच्या हातात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सहकार क्षेत्रातही पूर्णपणे मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. किंबहुना सहकार हा मराठा समाजाचे बलस्थान आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा सरपंच एकवेळ बिगर मराठा चालेल (आरक्षण असल्यामुळे चालवावाच लागतो) पण सहकारी सेवा सोसायटीचा चेअरमन मात्र मराठाच पाहिजे हे वास्तव आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मराठा समाजच सर्वोच्च स्थानी आहे. भारती, डी. वाय. पाटील, कृष्णा यासारखी विद्यापीठे आणि शेकडो शिक्षण संस्था मराठा समाजाच्याच मालकीच्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा अशा सर्व ठिकाणी मराठा समाज इतरांपेक्षा खूप वरचढ आहे. शिक्षणातसुद्धा मराठा मुले खूप पुढे आहेत. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीपेक्षा निश्चितच जास्त शेती आहे. आणि आत्महत्या करण्यात मराठा शेतकऱ्याबरोबर बिगर मराठा शेतकरीही असतो. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार केला असता असे दिसते कि मराठा समाज सर्वच क्षेत्रात इतर बहुजन जातींपेक्षा नक्कीच पुढे आहे. त्यामुळे स्वतःला मागास सिद्ध करताना या सर्व सत्तास्थानांचा त्याग आपण करू शकतो का याचाही विचार व्हायला पाहिजे.

अजून एक मुद्दा पवार मांडतात, तो म्हणजे सर्व मराठे मुळचे कुणबी आहेत. मान्य आहे. परंतु ही काही वर्षांपूर्वीची परिस्थिती होती. काळाच्या ओघात कुणबी आणि मराठा यांच्यातही खूप फरक पडला आहे. ज्या कुनब्यांकडे त्या काळात सत्तास्थाने होती त्यांनी स्वतःला मराठा असे अपग्रेड करून घेतले. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढली आणि मुळचा कुणबी कि जो धनगर-माळी यांच्या जवळपास गणला जात होता त्या स्थानापासून मराठा खूप पुढे गेला. मुळच्या मराठा या प्रदेशवाचक शब्दाला एका जातीचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचा उपयोग मराठा समाजाने इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी करून घेतला. ९६ कुळीचा गर्व बाळगत इतरांना हिणवण्यात धन्यता मानली. आजही अनेक मराठा व्यक्ती राजकीय, शैक्षणिक उद्देशासाठी कुणबीचे प्रमाणपत्र मिळवतात. कागदोपत्री जात कुणबी मात्र व्यवहारात मराठा असते कि नाही ? अशावेळी जात सांगताना आपण मराठाच सांगतो कि नाही ?

शशिकांत पवार म्हणतात कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली तेव्हा त्यांनी फक्त त्यांचा समाजच डोळ्यासमोर ठेवला. अनुसूचित जाती एवढेच लक्ष त्यांचेसमोर होते आणि त्यांनी इतर मागासांकडे दुर्लक्ष केले. परंतु पवार हे विसरतात कि बाबासाहेबांनी घटनेत कलम ३४० नुसार इतर मागास वर्गांच्या आरक्षांची तरतूद केली आहे. कलम ३४१ हे अनुसूचित जाती आणि ३४२ अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाबाबत आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी इतर मागास वर्गांच्या आरक्षणासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बाबासाहेबांनी इतर मागासवर्ग नजरेआड केला या पवार यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. उलट दलित-आदिवासी समाजाबरोबरच इतर मागासांसाठीही बाबासाहेबांनी घटनेत तरतुदी करून ठेवल्या आहेत. परंतु सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याची स्वातंत्र्यानंतर अंमलबजावणी केलीच नाही. बाबासाहेबांनी फक्त दलित समाजापुरते काम केले असे गैरसमज पसरवण्यात आले. शशिकांत पवार यांची वरील विधाने म्हणजे असाच प्रकार म्हटला पाहिजे.

डॉ. आंबेडकरांच्या राम आणि कृष्णाची चिकित्सा या पुस्तकाचे भांडवल कुणी केले? त्यांचे ग्रंथ कुणी जाळले ? त्या काळात दलित समाजाविरोधात समाजमन कुणी कलुषित केले हे पवार यांनी सांगावे. मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करताना शेकडो दलितांची घरे जाळण्यात आली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले याची जबाबदारी कोण घेणार ? कि फक्त सकारात्मक बाजुच पाहण्याच्या नादात इतरांनी आमची नकारात्मक बाजू लक्षातच घ्यायची नाही का ? मराठा आरक्षणाचा विचार करत असताना या सर्व गोष्टींचाही विचार करावा.

38 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

good article. u r totally right prakash pol.

अनामित म्हणाले...

तुमी खरे लिहले आहे. मराठा समाज सर्व ठिकाणी उच्च स्थानी आहे. त्यांना आरक्षन देणे चुकीचे आहे.

SACHIN SHENDGE म्हणाले...

very true prakash sir

Rohit G. Pawar म्हणाले...

Maratha he jast jatiwadi astat. Kontahi vyavasay nivadala tari angat maharaj asato ani customer la gulamachi vagnuk deto. tyamule hyanche vyavasay chalat naahi,(ani mhnatat ki te magas aahe).
kshatriy mhantat ani civil society madhech mirwat basatat.Simevar javun dakhava na kshatriy pana.

अनामित म्हणाले...

प्रकाशराव ,अभिनंदन राव मराठा व कुणबी मराठा या मध्ये फार मोठा फरक आहे . या साठी पश्चिम महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात जावे लागेल . कारण ब्राम्हण -ब्राम्हणेतर चाळवलीमुले इथे कुणबी मराठा समाजाला इथल्या राव मराठ्यांनी गिळून टाकले आहे . त्यांना कोणताही लाभ आजआखेर मिळालेला नाही .ते रंगारी ,बिगारी ,हेल्पर ,शेतमजूरच आहेत . त्याच्या गरीबीचे भांडवल करून हे राव मराठे (वतनदार ) आज आरक्षण मागत आहेत . आरक्षण हे गरिबी हटावचा मार्ग नव्हे हे यांना कोण सांगणार . सगळे साखर कारखाने ,सुत गिरण्या ,शिक्षणसंस्था ,कारखानदारी याच राव वतनदार मराठा समाजाच्या ताब्यात आहेत . या सत्ताकेंद्रात यांच्या पोटातील कुणबी मराठा ,धनगर माळी कुठेच दिसत नाहीत. सगळे आमदार-खासदार याच राव वतनदार पाटील -देशमुख -सरकार घराण्यातीलच आहेत . हीच खरी आजची शाषक जाती आहे . फुले-आंबेडकरांचे काळात ब्राम्हण हि शाषक जाती होती .आजच्या वास्तवात फुले - आंबेडकरानी याच राव मराठा (वतनदार ) शाषक जाती विरुद्ध वैचारिक लढा दिला असता . ---- विजय ग . गावडे

sanjay kshirsagar म्हणाले...

अतिशय मुद्देसूद आणि तर्कशुद्ध विवेचन आहे. श्री. शशिकांत पवार यांचा लेख बव्हंशी एकांगी असून त्याचा समारोप जो आहे तो देखील एका विशिष्ट राजकारणी युतीकडे लक्ष वेधून घेणारा आहे.

sachin kandalkar म्हणाले...

mi pahileli majordi jaat mhanje maratha......

NITIN DIVEKAR म्हणाले...

शशिकांत शिन्दे यांचा हा लेख केवळ ज.वि.पवार यानी मराठा समाजाबाबत जे सत्य मांडल त्याच्या चढफडितुन लिहिलेला आहे. शशिकांत पवारांची ह्यात बाबासाहेबाना आणि आरक्षणाला शिव्या देण्यात गेली. मराठा तरुणाना जातीच्या नावान भडकाउन त्यांच्याहातुन दलितांना मारहाण करउन घेणे हा शशिकांत पवारांचा आवडता छंद होता. मुळात दलित समाजाला आरक्षण दिल गेल त्याच कारण गरिबी नसुन हजारो वर्षे जातीच्या/धर्माच्या नावाखाली स्वविकासाची सगळी सन्धी नाकारली जाण हा आहे. सामाजिक चळवळींमुळे मराठात समाजात काहि प्रमाणात वैचारिक क्रांती झाली हे खर आहे पण ते प्रमाण अत्यल्प आहे. आज आरक्षणाच्या मोर्चात मराठा समाज बाबासाहेबांच्या तसबिरी उंचावतो पण ते सिम्बॉलिकल आहे, आरक्षण मिळाल्यानंतर तो त्या तसबिरींची काय करतील हे कळायला काही मार्ग नाही. मराठा आरक्षण हा मुद्दा सामाजिक न होता तो काहि पुढा-यांच्या राजकिय कारकिर्दीचा सोपान ठरला आहे.

Unknown म्हणाले...

j.v. pawarani jo lekh lihila ahe tyat fakta arthik nikasha chich mandni keli ahe educational niksh chi mandni keli nahi.maratha samajik magas nahi pan to education madhe magas ahe.khedegaot anyay atyacharachya ghatna ghadtat tya jatiwadai mansiktetun ghadtat ani mansikta brahmanwadatun aleli ahe tyamule apan marathasah sarva bahujanani brahmanwada virodhat ladha dila pahije.

Unknown म्हणाले...

j.v. pawarani jo lekh lihila ahe tyat fakta arthik nikasha chich mandni keli ahe educational niksh chi mandni keli nahi.maratha samajik magas nahi pan to education madhe magas ahe.khedegaot anyay atyacharachya ghatna ghadtat tya jatiwadai mansiktetun ghadtat ani mansikta brahmanwadatun aleli ahe tyamule apan marathasah sarva bahujanani brahmanwada virodhat ladha dila pahije.

प्रकाश पोळ म्हणाले...

Khare ahe sanjay Ji......navin Rajkiy Yuti......

Dr.Ramesh Suryawanshi म्हणाले...

https://www.facebook.com/photo.php?fbid=608966665815832&set=gm.665074156844759&type=1&theater

Dr. Ramesh Suryawanshi ,Kannad

अनामित म्हणाले...

प्रकाश साहेब जरा या प्रश्नांची उत्तरे द्याल का?

दलितांनी चौक बाटवला म्हणून गोमूत्राने तो शुद्ध करून घेणारे कोण होते?

कुणबी मराठ्याशी लग्न होऊ नये म्हणून स्वत:च्या मुलीला मारून रुळांवर तिचा मृतदेह फेकून देणारे कोण होते? (http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227548:2012-05-18-17-02-45&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194)

आज ओबीसी म्हणवून घेणाऱ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह किती प्रमाणात होतात?

मराठा नेते घराणेशाही करतात तर ओबीसी नेते तरी काय वेगळे करतात?

दलितांची एवढीच काळजी असेल तर ओबीसी जनता आपापल्या जातींच्या नेत्यांच्या ऐवजी दलित नेत्यांना का बरे निवडून आणत नाही?

तुम्ही जातीसाठी माती खाल्ली तरी तुम्ही स्वत:ला पुरोगामी ठरवणार आणि दुसऱ्यांनी तेच केले की बोंब मारणार. असले पुरोगामित्व काय कामाचे?

हर्षवर्धन पाटील म्हणाले...

@प्रकाश पोळ जी :
शिक्षणसम्राट किंवा साखरसम्राट सर्वच मराठा समाज नाही.बरेच लोक आजुन हलाक्याचे जीवण जगत आहेत.
त्यांना आरक्षण मिळाले तर काय वाईट आहे ? आरक्षण मिळालेच पाहिजे.
राहीली गोष्ट जातीवादी आहंकाराची माझे कितीतरी मित्र अहेत जे पुर्वी कांबळॆ होते तर नोकरी लागली शहरी गेले लगेच कामत झाले.त्यांना आता बाबासाहेबांना फ़ोटॊ घरी लावणे म्हणजे पण कमी पणाचे वाटते,
ज्या मराठा संघटानावर आगपाखड करताय त्याच सम्घटनेमुळे आज राष्ट्रपिता महात्मा फ़ुले विश्वभुषण युगप्रवर्तक बाबासाहेब प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये आहेत.

अत्याचार : जे काही घडले मेहतर समाजाबरोबर त्याचे वाईट वाटतेच पण हेही तितकेच खरे आहे की त्या जागी मराठा तरून जरी असते तर त्यांचेही तेच हाल झाले असते कारण जे जातीवादातून होत नाही तर प्रतिष्ठे तुन होत असते.

मराठा आरक्षण आणि सामाजिक मानसिकता
http://marathikattaa.blogspot.in/2012/09/blog-post_16.html
आरक्षण [प्रकाश पोळ]
http://marathikattaa.blogspot.in/2012/05/blog-post_5159.html
आरक्षण
http://marathikattaa.blogspot.in/2012/09/blog-post_8714.html

अनामित म्हणाले...

प्रश्न मराठा-बी.सी. ओबीसी वादाचा आहे. यात ब्राह्मणांना कशाला ओढता ? आणि ब्राह्मण मंडळींना ही एक सूचना : विनाकारण प्रतिक्रिया देवून नसत्या वादाचे निखारे आपल्या अंगावर ओढवून घेऊ नका.

Typed with Panini Keypadप

प्रकाश पोळ म्हणाले...

आदरणीय राजेश लिगाडे जी,
खेडेगावात अन्याय-अत्याचार हे मराठा किंवा उच्च ओबीसी करतात हे खरे आहे. आपण लिहिले आहे त्याप्रमाणे हे सर्व ब्राह्मणवादी मानसिकतेतून घडते हेही मान्य. मात्र अशा प्रसंगी आपण म्हणजे बहुजनांनी कोणती भूमिका घ्यायला पाहिजे ? आपण अशा अन्याय करणाऱ्या लोकांना ते केवळ बहुजन आहेत किंवा आपल्या जातीचे आहेत म्हणून पाठीशी घालायचे का ? त्यांचे समर्थन करायचे का ? ब्राह्मणवादी मानसिकता आपण आपल्या स्वार्थासाठी, मोठेपणासाठी जपत असू तर मला वाटते की आपली खूप मोठी चूक होते आहे. माझा आक्षेपाच मुळी याला आहे. त्यासाठी मी शशिकांत पवार आणि शालिनीताई पाटील यांचे उदाहरण दिले आहे. हे लोक उघडपणे दलित समाज आणि बाबासाहेब यांच्यावर घाणेरड्या पद्धतीने बोलत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या यांच्या बांधवानी त्यांना पहिला विरोध करायला नको का ? हा माझा प्रश्न आहे. मराठ्यांसहित सर्व बहुजन एक होऊन चळवळ करायला हरकत नाही ? परंतु मराठेतर बहुजनानाही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे की नाही ? सर्वाना विश्वासात घेवून वाटचाल केली पाहिजे की नाही ? काही लोकांनी चळवळीसाठी अख्खे आयुष्य खर्ची घातले आहे, अशा लोकांशी काही मतभेद झाले तरी त्यांचा आदर करायला नको का ?
मला वाटते की अन्याय करणारा माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो त्याला एकाच चष्म्याने बघायला पाहिजे. फक्त ब्राह्मणवादी म्हणून आपल्या चुकांवर पांघरून घालणे योग्य नाही.

प्रकाश पोळ म्हणाले...

@Anonymous-
आपल्या प्रश्नांची उत्तरे-
दलितांनी चौक बाटवला म्हणून गोमुत्राने पवित्र (!) करवून घेतला तो त्यावेळी शिवसेनेत असलेल्या छगन भुजबळ यांनी. ते ओबीसी नेते असले तरी त्यांच्या या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. नंतर ते कॉंग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी मध्ये आले. त्यानंतर त्यांच्याकडून असा काही प्रकार घडलेला नाही हेही लक्षात घ्यायला हवे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या या कृतीचे समर्थन होईल. त्यांच्याकडून मागे असा दावा केला गेला की ते गोमुत्र नसून फक्त पाणी होते.तरीही त्यांनी केलेली कृती चुकीची होती असेच म्हटले पाहिजे. आणि त्यांच्या या कृतीला कोणत्या ओबीसी विचारवंत, अभ्यासकांनी पाठीशी घातलेले मला तरी दिसलेले नाही.
कुणबी मराठ्याशी लग्न होऊ नये म्हणून स्वत:च्या मुलीला मारून रुळांवर तिचा मृतदेह फेकून देणारे कोण होते? या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाही. परंतु असा कोणताही प्रकार निंद्य आहेच. आणि कोणत्या समाजात अशा प्रकारच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत तेही पहा.
आज मराठा किवा ओबीसीमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण खूप कमी आहे हेही मान्य. परंतु सामान्य माणसांकडून आपली फारशी अपेक्षाच नाही. पुरोगामी म्हणवून घेणारे कितपत आंतरजातीय-धर्मीय विवाह करतात असा प्रश्न आहे ? ओबीसीमध्ये तरी निळू फुले, प्रा. हरी नरके, संजय सोनवणी, लक्ष्मण माने, समीर भुजबळ, मकरंद सावे, पद्मकांत कुदळे, गार्गी फुले, डॉ. केतकी करणे, सीमा रेणके, रेखा ठाकूर, डॉ. तृप्ती रेणके, सविता रेणके, बाळकृष्ण रेणके, संगीता गायकवाड, रेणके कुटुंबातील अरुण, सौरभ तसेच दशरथ पारेकर, मंगल खिवसरा, मंगल गायकवाड, मनस्विनी लता, लता प्रतिभा अशा अनेकांनी आंतरजातीय लग्न केले आहे. त्या तुलनेत पुरोगामी मराठा व्यक्तींचे प्रमाण निश्चितच कमी आहे.
मराठा घराणेशाही आणि ओबीसी घराणेशाही यामध्येही फरक आहे. तसं पाहायला गेलं तर मला कोणतीच घराणेशाही मान्य नाही. परंतु महाराष्ट्रात राजकारण, सहकार या क्षेत्रातील मराठा आणि ओबीसी घराणेशाही यांची त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात टक्केवारी काढली तर काय चित्र दिसेल याचाही विचार करा.
ओबीसी जनता ही ना दलितांना निवडून आणते ना ओबीसी नेत्यांना. टी सर्वात आधी प्राधान्य देते मराठा समाजाला. तसे नसते तर बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा, जत, आटपाडी, खानापूर, माण फलटण या पट्ट्यात धनगर आणि ओबीसी, भटके विमुक्त समाजाची लोकसंख्या प्रचंड आहे. तरीही इथले ८० % आमदार, खासदार मराठा आहेत. हेच उलट पाहायला गेले तर मराठबहूल मतदारसंघात ओबीसी किंवा दलित निवडून येवू शकतो काय याचा विचार व्हावा.
शेवटचा मुद्दा जातीसाठी माती खाण्याचा. जातीसाठी माती खाने म्हणजेच स्वतःच्या जातीपुरता विचार करून, स्वतःच्या जातीच्या चुकीच्या गोष्टी, विचारांना पाठीशी घालणे हे होय. आणि पुरोगामी ओबीसी किंवा भटके विमुक्त विचारवंत फारसे आपल्या समाजातील राजकीय नेत्यांच्या नादाला लागले नाहीत हे वास्तव आहे. मात्र त्याचवेळी पुरोगामी मराठा विचारवंतांचा मराठा नेत्यांशी चांगला घरोबा होता हे विसरून चालणार नाही. आणि मी एक ओबीसी म्हणून विचार करतच नाही. मी माणूस म्हणून विचार करतोय, तिथे कोणताही व्यक्ती चुकतोय असे वाटल्याने लिहिले.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आपले नाव आणि ओळख का दिली नाही ?

प्रकाश पोळ म्हणाले...

@हर्षवर्धन घाटगे पाटील साहेब-
शिक्षणसम्राट किंवा साखरसम्राट सर्वच मराठा समाज नाही हे मान्यच आहे. परंतु बहुतांशी शिक्षणसम्राटांनी सहकार सम्राट हे मराठा समाजातील आहेत. त्यांनी समाजाला मदत करायला पाहिजे की नाही. परंतु ते स्वतःचा स्वार्थ साधतात आणि तरीही मराठा समाज त्यांचेच समर्थन करतो हे वास्तव आहे. जे मराठे हलकीचे जीवन जगात आहेत त्यांच्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु ओबीसींच्या तोंडातील घास हिसकावून इतरांना देणे योग्य नाही. कोल्हापूरचे संभाजी राजे आता म्हणत आहेत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ? हे योग्य आहे का ? मला एक सांगा की आधी आधी आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या अशी मागणी होती. आता आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करा किंवा काहीही करा ही गुर्मीची भाषा वापरणे योग्य आहे का ?
मराठा संघटना आणि त्यातही पुरोगामी संघटना किती पक्षपातीपणे वागतात हे मी वर लिहिले आहेच.
दलित तरुणांच्या जागी मराठे असते तर त्यांचीही तीच अवस्था झाली असती हे आपले विधान वास्तवास धरून नाही. कदाचित काही प्रमाणात त्यांना त्या गोष्टीचा फटका बसला असता हे मान्य. परंतु दलित समाजाबद्दल एक गृणा मनात असल्याने त्यांचे डोळे काढणे, हात-पाय काढणे अशा प्रकारच्या क्रूर घटना माझ्या तरी ऐकण्यात आलेल्या नाहीत. गरीब मराठा आणि गरीब ओबीसी-दलित-भटके-विमुक्त यांची सामाजिक पातळीवर बरोबरी करू शकतो का ?
आणि आपण जि लिंक दिलेली आहे त्यात माझा मराठा आरक्षणाबद्दल लेख आहे. त्यात मी मराठा आरक्षणाचे समर्थन केले असले तरी त्यातील महत्वाचे मुद्दे आपण नजरेआड करत आहात. त्यात मी स्पष्ट लिहिले आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लावता काम नये. पण मराठा संघटनानी पलटी खाल्ली.

Viraj Jadhav म्हणाले...

सर्वात आधी आपण मराठा हि एक जात नसून तो प्रांत वाचक शब्द आहे हे जाणून घेणे.
दुसरी गोष्ट ज वी पवार अन शशिकांत पवार या दोघांनाही महापुरुषांच्या आंदोलनाचा अभ्यास नाही असे दिसतेय त्यामुळे त्यांचे समर्थन किंवा विरोध करणे म्हणजे फुकाचे आहे.....कारण शून्यावर चर्चा केली असता निकाल हि शून्य च लागतो.

अनामित म्हणाले...

समर्थन होऊ शकत नाही तर मग विरोध तरी कुठे होतोय? मराठेतर समाजात अशा घटना घडतात त्याच तेव्हढ्या तुमच्या नजरेला कशा दिसत नाहीत? तुम्ही तुमच्या लेखात आशा शिंदेचे नाव घेतले आहे. इथे दिलेल्या (http://archive.prahaar.in/prahaar_blog/60715.txt) बातमीमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी आशा शिंदे बरोबरच मनीषा धनगरचेही नाव आहे. तेच तुम्हाला नेमके कसे बरे दिसले नाही? आणि मी दिलेली लिंक काही दिवसांपूर्वी व्यवस्थित उघडत होती. आता मात्र नेमकी तीच लिंक उघडत नाही? याचा अर्थ काय लावायचा? तरीही तुमचे समाधान व्हावे म्हणून ह्या इतर लिंक्स देत आहे. पहिली लिंक ज्यांनी उडवली त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी ह्या सर्व लिंक्स उडवून दाखवाव्या.

http://www.abpmajha.newsbullet.in/maharashtra/nashik/14999

http://72.78.249.126/esakal/20120408/5232472359626160996.htm

http://jalgaonlive.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%80/

ओबीसींची घराणेशाही दाखवली की तुम्ही लगेच टक्केवारी काढणार आणि मराठा नेत्यांच्या घराणेशाही विषयी लिहिताना मात्र मराठा समाजाकडे बोट दाखवणार? ओबीसी विचारवंत काय करतात याने जनतेला काडीचाही फरक पडत नाही. जर ओबीसी विचारवंत स्वत:च्या लोकांनाच सुधारू शकत नसतील तर मग त्यांना इतर कोणत्याही समाजाकडे बोट दाखवायचा काय अधिकार राहतो? मराठा समाजावर नाहीतरी सनातनीपणाचा शिक्का तुम्ही मारलाच आहे. मग आता तुमच्या लाडक्या ओबीसी विचारवंतांना म्हणावे निदान ओबीसी समाजात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करून स्वत:चे पुरोगामित्व दाखवून द्या. जितका वेळ मराठ्यांना शिव्या देण्यात घालवता तोच वेळ ओबीसींना सुधारण्यात घालवा. म्हणजे आपोआपच सत्तापालट होणार नाही का?

तुम्ही स्वत:च लिहिता की ओबीसी जनता मराठा समाजाला प्राधान्य देते. मग मराठा समाजाच्या वर्चस्वाला फक्त मराठ्यांनाच कसे जबाबदार धरता येईल? आणि ओबीसी नेत्यांना मराठा समाजाची मते पडतच नाहीत असा तुमचा दावा आहे का?

"पुरोगामी ओबीसी किंवा भटके विमुक्त विचारवंत फारसे आपल्या समाजातील राजकीय नेत्यांच्या नादाला लागले नाहीत हे वास्तव आहे."
म्हणजे हे तथाकथित पुरोगामी विचारवंत जोपर्यंत खरोखरच पुरोगामी होते तोपर्यंत त्यांचे चेहरे टीव्हीवर कधीच दिसले नाहीत. आणि मराठा समाजाच्या विरोधात आघाडी उघडल्यावर अचानक ह्या सर्वांचे चेहरे दर महिन्याला वृत्तवाहिन्यांवर दिसू लागले हा निव्वळ योगायोगच म्हणायचा तर!

मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्याला विरोध करण्यासाठी मराठा समाजाचे सहकार आणि राजकीय क्षेत्रातील वर्चस्व एवढा एकच मुद्दा पुरेसा आहे. मग उगाच फक्त मराठा समाजातील ऑनर किलिंगची उदाहरणे देऊन तुम्हाला नेमके काय सिद्ध करायचे आहे? उद्या मराठ्यांनी ऑनर किलिंग थांबवले तर तुम्ही मराठा आरक्षणाला पाठींबा देणार आहात का? अर्थातच नाही. मग उगाच गैरलागू मुद्दे उपस्थित करून केवळ मराठा समाजाची बदनामी करणे हेच तुमचे लक्ष्य आहे का?

आता इतके लिहिल्यावर माझी जात तर सर्वांना कळली असेलच. मग नाव सांगून तरी काय फरक पडणार? ज्या दिवशी नावाचा उपयोग जात शोधण्यासाठी केला जाणार नाही त्या दिवशी नाव सांगायला हरकत नाही.

प्रकाश पोळ म्हणाले...

@Anonyms-
मनीषा धनगर हिच्या बाबतीत जो प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे यात शंका नाही. आशा शिंदे आणि मनीषा धनगर यांना या जातीयवादी दुर्दैवाला तोंड द्यावे लागले ही शोकांतिका आहे. परंतु आशा शिंदेचे प्रकरण मी वर्तमानपत्रात वाचले होते. आणि मीही सातारा जिल्ह्यातील असल्याने मला ते चांगलेच माहित होते. परंतु मनीषा धनगरचे प्रकरण माझ्या वाचनात आले नव्हते. (या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही हे माहित आहे) तरीही आपणास एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपण मराठा समाज आणि मराठा आरक्षण याविषयी चर्चा करत आहोत त्यामुळे मराठा समाजातील प्रकरणाचे उदाहरण दिले आहे. यात मराठा समाजाची बदनामी करणे किंवा इतरांच्या गोष्टी लपविणे हा हेतू नाही. आपण दिलेली आधीची लिंक ओपन होत नव्हती. काहीतरी तांत्रिक समस्या असेल. वर नंतर दिलेल्या लिंक ओपन होत आहेत. त्या लिंक उडवण्याचा अधिकार ज्यांनी त्या टाकल्यात त्यांनाच असतो हे आपणास माहित असेलच. आपण वर्तमानपत्रातील लिंक दिल्या आहेत त्या इतर कुणीही डिलीट करू शकत नाहीत.
घराणेशाही वर बोलताना ओबीसी आणि मराठा समाजाची तुलना कशी काय होऊ शकते हा माझा प्रश्न आहे. म्हणजे भ्रष्टाचार करणारे सारेच गुन्हेगार असतात. मात्र पाच हजार रुपयांचा भ्रष्टाचार आणि पाचशे कोटींचा भ्रष्टाचार यात काही फरक असतो की नाही. (हे आकडे फक्त उदाहरणादाखल आहेत हे लक्षात घ्यावे.) तसेच मराठा आणि ओबीसी घराणेशाहीची चर्चा करताना त्यांचे लोकसंखेच्या प्रमाणात किती स्थान आहे हे लक्षात नको का घ्यायला ? याचा अर्थ ओबीसी किंवा इतर जातीच्या घराणेशाहीचे समर्थन करतोय असा मात्र नाही.
माझी वरील प्रतिक्रिया नीट वाचली नाहीत. त्यात मी ओबीसी विचारवंत, नेत्यांची आंतरजातीय लग्नाची उदाहरणे दिली आहेत. आणि हेच विचारवंत ओबीसी किंवा सर्वच समाजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. म्हणूनच म्हणतोय की मराठा संघटनांमध्ये असे किती लोक आहेत की ज्यांनी आंतरजातीय लग्न केली आहेत ? आणि मराठा समाजावर सनातनीपणाचा शिक्का कुणीही मारत नाही. पण जे अन्याय करतात त्याचे समर्थन काही लोक करतात याचा अर्थ काय ? अशा अन्याय करणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांबद्दल चर्चा चालू आहे. डॉ. आ. ह. साळुंखे सर म्हणतात त्याप्रमाणे टीका करताना मराठा शब्द आला की सर्व मराठ्यांनी ती आपल्यावर टीका आहे असे मानू नये. (डॉ. आ. ह. साळुंखे सरांनी हे ब्राह्मण समाजाविषयी सांगितले आहे. त्यात थोडासा बदल केला. बाकी मतितार्थ तोच. ) निदान अशा ओबीसी संघटना कधी अन्यायाच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्याचे माझ्या ऐकिवात नाही. परंतु शालिनीताईच्या पाठीशी मराठा महासंघ, छावा उभे राहिले हे वास्तव आहे.
ओबीसी जनता मराठा समाजाला प्राधान्य देते हे वास्तव आहे हे मी वरील प्रतिक्रियेत काही मतदारसंघाची नावे दिली आहेत त्यावरून स्पष्ट होते. पण हे वास्तव आपण स्वीकारायला तयार नाहीत. ओबीसी-दलित बहुल प्रदेशातसुद्धा मराठा लोकप्रतिनिधी सहज निवडून येतात आणि ओबीसी पराभूत होतात. याउलट खुल्या आणि मराठाबहुल प्रदेशात किती ओबीसी-भटके-विमुक्त-दलित निवडून येतात हे सांगा. यात या समाजांचीही चूक आहे हे मान्य. म्हणजे मराठा आहे म्हणून विरोध करावा असे माझे म्हणणे नाही. नाशिकमध्ये “वाजवा टाळी हाकला माळी”, बीडमध्ये “वाजवा तुतारी, हाकला वंजारी:” आणि शिर्डीमध्ये “हिंदू दलित की बौद्ध दलित”, “निळा गुलाल की भगवा गुलाल” अशा प्रकारचा जातीयवादी प्रचार झाला. यात फक्त शिर्डीमध्ये रामदास आठवले यांच्याविरुद्ध असा प्रचार करण्यात काही ओबिसीही असतील याची मला जाणीव आहे. परंतु मुख्य भूमिका कोणाची होती ? तसेच माळी आणि वंजारी यांना हाकलण्याची गरज कुणाला आहे हेही आपल्यासारख्या चाणाक्ष व्यक्तीच्या लक्षात यायला हरकत नसावी.
ओबीसी विचारवंताना टीव्हीवर प्रसिद्धी मिळाली की ते ब्राह्मणवादी, सुपारीघेवून काम करणारे. तर मग पूर्वीपासूनच मराठा नेत्यांना, विचारवंताना खूप प्रसिद्धी मिळाली आणि अजुनही मिळत आहे, त्यांच्याबद्दल काय बोलाल ?
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा. प्राश फक्त मराठा आरक्षण नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असून इतर गोष्टींवर बोलूच नये ही भूमिका म्हणजे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होय. मराठा आरक्षण हे केवळ निमित्त आहे किंवा एक छोटासा भाग आहे. त्यानिमित्ताने समाजावर वर्चस्व लाडाने किंवा इतरांचा घास हिसकावून घेणे, स्वतःच्या बांधवानी इतरांवर अन्याय केला तरी एकतर समर्थन करणे किंवा गप्प बसणे या सर्व गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे.
सर्वात शेवटी आपण नाव सांगितले नाही त्यात सर्व आले. नाव बघून जात काढणारी आमची प्रवृत्ती नाही. परंतु माणसाने खुलेपणाने भिडावे असे मला वाटते. आपले विचार जरी जुळत नसले तरी आपण चर्चा करू शकतो. माझ्याकडूनतरी काही पक्षपाती भूमिका घेतली जाणार नाही याची खात्री देतो.

अनामित म्हणाले...

हा जातीयवाद म्हणजे सत्ताधारी मराठ्यांनी वंचित मराठ्यांना मूर्ख बनवण्यासाठी वापरलेले हत्यार आहे. हे सर्वांनाच माहित आहे. मी मराठा किंवा इतर कोणत्याही समाजाच्या जातीयवादाचे समर्थन करत नाही. कारण त्यात आमच्यासारख्या सामान्य मराठ्यांचे काहीच भले होणार नाही हे कळण्याइतकी बुद्धी मला आहे. पण हा जातीयवाद मराठ्यांनी केला की जास्त रान माजवले जाते आणि इतरांनी केला की त्यावर कसे पांघरूण टाकले जाते हे तुम्हालाही माहित आहेच.

तुम्ही ज्याची उदाहरणे दिली आहेत ते विचारवंत आहेत. नेते नव्हेत.स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात कोण काय करतो याने काहीही फरक पडत नाही. उघडपणे जनतेला त्यासाठी प्रोत्साहित करणे हे महत्वाचे असते. ते काही झालेले दिसत नाही.

मराठे जास्त संख्येने निवडून येतात कारण त्यांची संख्याच इतर समाजाच्या तुलनेत जास्त आहे. शिवाय इतर जातींमध्ये परस्पर कुरघोडीचे राजकारण चालतच असते. जो जातीयवाद मराठा समाजात आहे तोच इतर समाजांतही आहे. उद्या मराठे जर अल्पसंख्य झाले तर इतर जाती मराठ्यांना निवडून देतील काय? ज्या मराठा घराण्यांनी वर्षानुवर्षे सत्ता स्वत:कडे राखून ठेवली आहे त्यांनाच माळी आणि वंजारी ह्यांना हाकलण्याची गरज वाटते. ते जसे ओबीसींना सत्तेच्या आसपास फिरकू देत नाहीत तसेच सामान्य मराठ्यांना देखील उभे करत नाहीत.

मराठ्यांच्या ऑनर किलिंगबद्दल बोलूच नये असे मी कुठेही म्हटलेले नाही. पण प्रश्न मराठा आरक्षणाचा असताना मधेच ऑनर किलिंगचे लचांड कशासाठी? माझा प्रश्न अनुत्तरितच आहे. उद्या मराठ्यांनी ऑनर किलिंग थांबवले तर तुम्ही मराठा आरक्षणाला पाठींबा देणार आहात का? जर नाही तर मग हा विषय भलत्या ठिकाणी उपस्थित करायची गरजच काय? मराठा आरक्षणाच्या संदर्भात फक्त मराठ्यांची ऑनर किलिंगची प्रकरणे खोदून काढणे ह्याला बुद्धिभेद का म्हणू नये? मराठा जातीचे नाव घेऊन जर ऑनर किलिंग बद्दल लिहायचेच असेल तर इतर जातींचेही नाव घेऊन स्वतंत्र लेखच लिहा. वडाची साल पिंपळाला कशाला लावायची?
समजा उद्या मराठ्यांनी आंतरजातीय विवाह धडाक्यात करायला सुरुवात केली तर ह्या ओबीसी विचारवंतांचा मराठा आरक्षणाला पाठींबा असेल काय?आणि मराठ्यांनी इतकेच अन्याय केले असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग आतापर्यंत मौन कशासाठी बाळगले होते? मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यावरच हे सगळे अन्याय ओबीसी विचारवंतांना अचानक कसे काय दिसायला लागले?
ह्यांचे पोट भरलेले होते तोपर्यंत ह्यांना कोणाचीही पडलेली नव्हती. आता ह्यांच्या ताटातला घास काढून घेणार म्हटल्यावरच ह्यांना अचानक कंठ बरा फुटला?

मराठ्यांना दलितांविषयी फार कळवळा नाही हे उघडच आहे. पण मराठा आरक्षणाच्या विरोधासाठी दलितांना पुढे करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रकार काही ओबीसी विचार(?)वंत आणि नेत्यांनी चालवला आहे हे देखील उघड झाले. हेही नसे थोडके.

प्रकाश पोळ म्हणाले...

@Anonymous

आपण जातीयवादाचे समर्थन करत नाही हे चांगलेच आहे. परंतु मराठा संघटनांची भूमिका खूप पक्षपाती राहिली आहे. जेव्हा गावगाड्यात दलित-सवर्ण असा संघर्ष निर्माण होतो तेव्हा हे सवर्ण म्हणजे मराठा समाजातील लोक असतात. आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवाने सांगू शकतो. निदान माझ्या सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या घटना काळजीपूर्वक पहिल्या तर हेच चित्र दिसते. कालवडे ता. कराड येथे दलित समाजाने प्रा. सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी इतर व्याख्यानांच्या ध्वनिफिती लावल्या होत्या. त्यात हिंदू देवांच्याबद्दल अपशब्द काढले, किंवा हिंदू देवतांची बदनामी होतेय म्हणून त्या गावातील मराठा समाजाने दलित बांधवांच्या कार्यक्रमावर दगडफेक केली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशा वेळी मराठा संघटनांनी सुषमा अंधारे चुकीची मांडणी करतात असा सूर लावला.

वहागाव ता. कराड येथे बाहेरगावचे बरेच लोक येवून स्थायिक झाले होते. हे सर्व दलित-भटके-विमुक्त होते. त्यांनी गावातून निघून जावे, कारण त्यामुळे गावाला डाग लागतोय, हे लोक बेघरवस्ती करून राहिलेत त्यामुळे त्यांनी गावातून निघून जावे यासाठी गावातील लोकांनी दाभाव आणला. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये ठराव केला. त्यानंतरही ते लोक गाव सोडून गेले नाहीत म्हणून त्यांची अख्खी वस्ती जाळली. हे अत्याचार करणारे लोक मराठा समाजातील होते. त्यानंतर दलित संघटना, प्रसारमाध्यमे यांनी गांभीर्य ओळखून धावाधाव केली. लगेच मराठा महासंघ वहागावातील मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिला. आणि माझ्या गावात ज्यावेळी या विषयावर चर्चा होत होती तेव्हा आपल्याही गावातील बेघरवस्ती अशीच जाळून टाकली पाहिजे, यांना धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्ये केली जात होती. ही वक्तव्ये करणारे मराठा समाजातील होते हे सांगायला नको.
वाई-सातारा-जावळीच्या मधोमध एका गावात हिंदू देवाची पालखी नेताना एका दलित व्यक्तीबरोबर काही लोकांचा वाद झाला. त्याचे पर्यावसान मोठ्या वादात झाले. लगेच दलित संघटना या वादात उतरल्या. त्यानंतर मराठा महासंघही या वादात उतरला. या दोन संघटनांची भूमिका एकवेळ समजू शकतो. तरीही दलित संघटना बचावाच्या तर मराठा संघटना आक्रमणाच्या भूमिकेत होत्या हे विसरून चालणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथले तत्कालीन आमदार शिवेंद्रराजे भोसले (सातारा), मदन भोसले (वाई) आणि शशिकांत शिंदे (जावळी) हे लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या बाजूने मैदानात उतरले. खूप मोठा मोर्चा काढला आणि त्यानंतर हे प्रकरण कुठे विझले ते समजले नाही. लोकप्रतिनिधी हे एका जातीचे नसतात. ते सर्व समाजाच्या मतांवर निवडून येतात. परंतु वरील चित्र काय दर्शवते. या आमदारांनी सामोपचाराची भूमिका घेवून वाद मिटवायला हवा होता. परंतु हे एका जातीची बाजू घेवून थेट मैदानात उतरले.

जातीयवाद तर सर्वत्र आहेच. प्रत्येक जातीत-धर्मात आहे. परंतु आपण त्याचे समर्थन करता कामा नये असे माझे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी ओबीसी-दलित असा वादही होतो. अशावेळी ओबीसी संघटना किंवा लोकप्रतिनिधी ओबीसीच्या पाठीशी उभे राहिले असे कधी झाले नाही हा फरक लक्षात घ्यावा.

Swabhimani Amol म्हणाले...

१९६० पासून आता पर्यंत (सुशील कुमार शिंदे अपवाद पण रबर स्टंप) सर्वच मुख्यमंत्री मराठा समाजाचेच झाले आहेत मग त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी का नाही काही धोरणे आखली
अखंड महाराष्ट्रात साखर कारखाने कुणाकडे आहेत ? मग नोकरीचा प्रश्न अजून सुटत कसा नाही ?

सहकार संस्था, शिक्षण संस्था कुणाच्या नावावर आहेत ? सर्व मराठा समाजाचे सम्राट आहेत मग मराठा समाजाची प्रगती न होणे याला हेच लोक जबाबदार नाहीत काय ?

मराठा समाज हा आधीपासूनच उच्च वर्णीय आणि साधन असल्याने घटनाकाराने त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवले.

१) आरक्षणाने सामाजिक असमानता जातीय द्वेष संपणार आहे का ? तर याचे उत्तर नाही असेच आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरी आंबेडकरी तरुण उतरला तरी दलितांवर अत्याचार होणार नाहीत याची हमी कोण देणार ?

२) स्वातंत्र्य आंदोलनात, स्वातंत्र्य तर हवेच पण आधी सामाजिक सुधारणा महत्वाची कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर दलितांना त्यांचे अधिकार मिळतीलच याचा भरवसा काय ? म्हणून बाबासाहेबांनी आधी समाज सुधारणेवर भर दिला होता मग आता आधी अखिल मराठा समाजाकडून दलितांवरील होणारे अत्याचार थांबवा मग आम्ही विचार करू मराठा आरक्षणाला पाठींबा द्यायचा कि नाही ते

३) जातीयवाद हा मानसिक आहे आणि तो मुळासकट काढून टाकण्यासाठी पुरोगामी म्हणून घेणाऱ्या मराठा संघटनानी आधी मराठा तरुणांच्या प्रबोधनाचे काम हाती घ्यावे

४) जातीयवाद कसा संपवणार याबद्दल मराठा संघटना मुग गिळून बसलेल्या दिसून येतात आणि कुठल्याही जातीय द्वेषातून झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ब्र सुद्धा काढत नाहीत याचा अर्थ काय ?

5) सतत होणारे दलितांवरील वाढते अत्याचार आणि त्याविरोधात आंदोलने करणारी आंबेडकरवादी तरुणांना आता पर्यंत किती मराठा संघटनांनी पाठींबा दिला आहे किंवा या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत ?

Swabhimani Amol म्हणाले...

मुरबाड जिल्हा ठाणे ग्रामीण येथे भोइर नावाच्या बौद्ध तरुणाच्या घरी रात्री काही मराठा आणि कुणबी गुंडांनी जातीय द्वेषातून हल्ला करून घरच्या सर्वाना बेदम मारहाण केली तसेच संसार उपयोगी गोष्टींची नासधूस केली यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेची सुद्धा मोडतोड केली
सदर घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात केली असून १२ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे

सविस्तर वृत्त "जनतेचा महानायक " मध्ये वाचा आज

धन्यवाद

अमोल गायकवाड

Rahul Sadavarte म्हणाले...

"मराठा समाजाने आजपर्यंत अनेक वेळा बौद्धांवर हल्ले केलेत पण एकदा ही बौद्ध समाजाने मराठ्यांवर हल्ला केलेला नाही. मला तर वाटतयं की आता आपण ही सुरवात करायला पाहिजे ह्यानां वठणीवर आणण्यासाठी !!"

अनामित म्हणाले...

obc garib lok aahet aapan bhale aapale kam bhale ashya vrutiche aahet obc ni tyamule maratha aarakshan la tyani facebook var sudha marathyana virodh kela nahiye , maratha madhale kahi lok Aadi aarakshanala bhik mhanayche aani obc ani other cha apman vaigere karayche maja sudha facebook var aarakshan ghetoy mhanun apman jhala aahe , aata matra aarakshana sathi mage lagale aahet ... aarakshan milane kathin ahe yana ..

अनामित म्हणाले...

Ithe asnarya lokana vinanti aahe OBC na kahi bolu naka agodarach obc na aarakshna purn nahi milale ...

अनामित म्हणाले...

bhrashatchar kelelya netyanchi list kadha tyamadhe 95% maratha nete ahet ani tyanchi kali samppati mojali tar 30000 Cr madhe jate.
Maratha sanghatna tyanchya netyanchya bhrshtachara viruddha ka bolat nahi .he nete apala lutlela paisa samjachya ka upyogi anat nahi.ani maratha samaj yana virodh karat nahi karan te aplya jatiche ahet mhanun .to ltulelya paisa aha sarv jatiy lokanchya asto ani khanare matr maratha asatat ...sambhaji briged maratha mahasangh he Rashtrvadi puraskrut ahet .Shalini Patil yani Jarandeshwar lutla....ka nahi kele andolan yaviruddha .......mag maratha nete sankhyene jast ahet tyani saglyat jast bharshtrachar kelay mhanun ..ha samaj srimant ahe asa mhanava kay ? ani tyani lutlelya garib lokanchya paishacha kay ???/

अनामित म्हणाले...

70,000 karod cha sinchan ghotla zala to ajit pawar ne kela ,sharad pawar ne adiwasi lokanchi 10000 hector jamin hadap karun LAVASA ubha kele.Mehdha patkar ,Anna Hajare sarkhe lokana damaki deun sampvanyachi bhasha keli.Pdamsinh Patlane anna hajare yana marnyachi supari dili hoti .Tyache samrthan karnara sharad pawar hota ,karan to swjatiy mhanje maratha . maratha sanghatnani yaviruddh anodlan karave .Garib shetkaryana golya ghalanre reashtrvadiche lok maratha nete ahet .varkaryana golya ghalnarelok maratha nete ahet ..Yani sarv dehsla lutaycha ..maharashtrala lutaycha ...ani yacnha sanghatna matr kayda hatat gheynyacha bhasha kartat....Vinayak mete ni sharad pawar ani ajit pawar yani kelelya bhrshtachara viruddha bolave ........Ani Ati tethe Mati aste he hi lakshat thevave ..gundgiri chya bhashela tasech uttar denyachi takad bahujan samjat ahe....v ti dakhvun denyachi vel ali ahe

अनामित म्हणाले...

पोळसाहेब, या मंडळीना हे नक्की ठाऊक आहे की तुम्ही. फक्त असे लेख लिहाल , चर्चासत्रे भरवाल, फार तर मोर्चे काढाल पण अंतिमत: पेशवाई, बामण अशा आरोळ्या. ठोकल्या की सत्ता यानाच देणार. हे चतुर सत्ताकारणी अंतिम फलनिष्पत्तीवर लक्ष ठेऊन असतात. याच पद्धतीने कधी जेम्स लेन तर कधी दादोजी अश्या आरोळ्या ठोकून तुमची मते मिळवली. ही मंडळी आरक्षण तर मिळविणारच परंतु आणखी असाच एखादा मुद्दा उकरुन तुमची मते पदरात पाडून घेणार. हे सत्तेवर बसतील आणि तुम्ही बसा बहुजनांचा विजय आणि मनुवाद्यांचा पराभव साजरा करीत. तुमच्या नुसत्या गप्पा आणि सत्तेवर दादा तात्या आप्पा.

अनामित म्हणाले...

हा हा हा. सत्तेवर जाणता राजा आणि यांच्या हाती पिपाणी आणि बाजा.

अनामित म्हणाले...


राहुलजी, एक धक्का द्याच यांना. ते तुम्हाला गृहीत धरून चाललेत. कुठेतरी थोडासा धोका पत्करायलाच हवा. नाहीतरी कॉंग्रेस शासित राज्यात दलितांचे फार काही कल्याण झालेले नाही की भाजपा शासीत राज्यात त्यांची फारच वाईट स्थिती नाही.

अनामित म्हणाले...

.

अनामित म्हणाले...

tumchya blog varchya comments disat nahiyet wachaycha purn prayatn kartoy pn yet nahiyet

प्रकाश पोळ म्हणाले...

आता दिसत आहेत प्रतिक्रिया. तंत्रिक दोष होता. गैरसोयीबद्दल क्षमस्व.

अनामित म्हणाले...

Incredible points. Great arguments. Keep up the great
spirit.

Feel free to visit my web site :: seo ()

Navnath म्हणाले...

जो येतो तो म्हणतो साखर कारखाने कोणाचे,शिक्षणसम्राट कोण,नक्की मराठयांचा आहेत .पण दुसर्या समाजाच्या आहेत.
साखर कारखाने व शिक्षणसम्राट मराठयांचे झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला का.
समजा महाराष्ट्रात 50 साखर कारखाने आहेत.म्हणजे 50 घरे श्रीमंत आहेत.शिक्षणसम्राट 50 जण आहेत म्हणजे 50 घरे श्रीमंत आहेत.
मग सगळा मराठा समाज श्रीमंत कसा.50 ,60 वर्ष आरक्षण घेवून सुध्दा जर सगळे श्रीमंत झाले नाहीतर मराठा समाज कसा श्रीमंत झाला.
आज सुध्दा मराठा समाज ऊसतोड मजुर,मातीकाम,बांधकाम क्षेत्रात मजुर म्हणून काम करत आहेत.मराठा समाजाने कधीही दुसर्या आरक्षणाला विरोध केला नाही.मग आम्हाला विरोध का?शेवटी जातीवादी आम्ही की तुम्ही.
एवढे मुख्यमंत्री झाले म्हणता ते मुख्यमंत्री ने कधी जाती साठी काम नाही केल त्यांनी सगळे नागरीक एक समान म्हणले.जर ते जाती साठी लढले असते तर आम्ही OBC मध्ये समाविष्ट असतो.पण तुमच्या सारख्या जातीवादी ना ते समजणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes