शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

डॉ. नरेंद्र दाभोळकर
बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?-
राही भिडे

जागतिकीकरणाने आलेला चंगळवाद समाजामध्ये भोगविलासी प्रवृत्ती वाढवत असताना बाराव्या-तेराव्या शतकातील सनातन मानसिकतेला २१व्या शतकात बुवा-बाबांनी खतपाणी घातले आहे. धर्मशास्त्रातील श्रृती-स्मृतींचा आधार घेऊन कर्मकांडे वाढवणारे धर्ममार्तंड सामाजिक प्रश्नांवर सनातनी निर्णय देत असतात. तोच प्रकार जातपंचायतीच्या रूपाने हेतुपुरस्सर वाढवला जात आहे. या सनातन प्रवृत्तींनी आणलेल्या सामाजिक विषमतेने समाज जीवन गढूळ केले. जुनाट रुढी-परंपरांचे जोखड समाजावर बसवले आणि त्यालाच धर्मतत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन सर्वसामान्य माणसांची आणि महिलांची गळचेपी केली. धर्माच्या नावाखाली बोकाळलेल्या अपप्रवृत्तींनी महिलांना शुद्रातिशुद्रांच्या पंक्तीत बसवून त्यांच्याप्रमाणेच हीन लेखले. महिलांकडे केवळ भोगवस्तू म्हणून तुच्छतेने बघण्याची प्रवृत्ती, जातीय विषमता आणि पुरुषी अहंभाव रुजवण्याचे आणि अंधश्रद्धा वाढवण्याचे काम झाले. त्यावर प्रहार करण्याचे काम संतांनी केले. संतांनी अंधश्रद्धांमधील खोलपणा दाखवून सुधारणांचे मार्ग सांगितल्यामुळे संतांचा पुरोगामी वारसा पुढे चालवणारे फुले-शाहू-आंबेडकर घडले; परंतु पुरोगामी विचाराने सर्वधर्मसमभाव आणि जात-धर्म विरहित समाज निर्माण झाला तर राजसत्ता आणि राजसत्तेतून धर्मसत्ता मिळवणे कठीण असल्याने सनातन प्रवृत्तींनी उचल खाल्ली आहे. बुवा-बाबांचे आणि कर्मकांडांचे उदात्तीकरण केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध उभे ठाकलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा सनातन्यांच्या कटाचाच एक भाग आहे आणि महिलांना तुच्छ समजणार्‍या सनातन शक्तींनीच 'शक्ती' मिल कम्पाऊंडमध्ये एका छायाचित्रकार-पत्रकार महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महात्मा गांधींचा खून करणारी सनातन प्रवृत्ती कशी वाढत राहिली, याचीच ही ठळक उदाहरणे आहेत.

'पाप के चार हथीयार' या आपल्या एका निबंधात सुप्रसिद्ध साहित्यिक हजारी प्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे की, १) विचार मारायचा असला की, चांगला विचार सांगणार्‍याला प्रथम विरोध करतात. २) विरोध करून ऐकला नाही तर त्याला छळतात. ३) छळवणुकीनंतरही विचार रुजवत राहिला तर त्याला मारतात. ४) त्याचा विचार समूळ नष्ट करायचा तर त्याचा पुतळा करतात आणि विचार संपवतात. पुरोगामी विचारांची सर्मथ परंपरा चालवणार्‍या संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी सर्व संतांनी हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार केल्यामुळे त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्‍वरांना वाळीत टाकले आणि संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली म्हणून त्यांचे विचार संपले नाहीत. गाथा वर आली ती वारकर्‍यांनी तारली. वारकरी पंथामध्ये मराठा, कुणबी, माळी, तेल्यांपासून महारांपर्यंत सर्व अलुतेदार, बलुतेदार सहभागी झाले. त्या सर्वांनी संतांचे विचार टिकवले. जे विचार करतात, त्यांना तारणे हे व्यक्तीच्या नव्हे समष्टीच्या हातात असते. बुद्धीप्रमाण्यवादी, स्वच्छ, स्पष्टवक्ते, विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सर्वसमावेशक मवाळ क्रांतिकारक होते. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरोधात आंदोलन उभारले. त्यांचा विचार मारण्याचे काम सनातत्यांनी जाणीवपूर्वक केले. जनसामान्यांना पालखीचे भोई बनवणार्‍या प्रवृत्तींनीच ज्ञानेश्‍वरांचा अनन्वीत छळ केला आणि तेच रथावर बसले. अशा मंबाजींनी डॉ. दाभोळकरांचा खून केला. असे मंबाजी आज समाजकारण, राजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आणि पत्रकारितेतही आहेत.

जादूटोणाविरोधी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला वारकर्‍यांचा विरोध होता, असा जावईशोध लावण्यात आला. बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का? वारकर्‍यांचा बुद्धिभेद करणार्‍या बडव्यांच्या तुरुंगातून वारकर्‍यांनीच विठ्ठल सोडवला. याचाही विचार झाला पाहिजे.

केंद्र आणि राज्य सरकारने डॉ. दाभोळकरांची दिवसाढवळय़ा हत्या करून पुरोगामित्वाचा गळा घोटू पाहणार्‍या मारेकर्‍यांना पकडून त्यांना समाजासमोर आणले पाहिजे. डॉ. दाभोळकर हे कोणी धर्माचे प्रेषित नव्हते, समाजातील वेडगळ समजूत दूर करून समाज सुदृढ करण्याचे व्रत घेतलेला एक साधासरळ कार्यकर्ता होता. अंधश्रद्धा विधेयकातील धार्मिक भावना दुखावणार्‍या तरतुदी काढून टाकण्यालाही त्यांनी संमती दिली होती. तरीदेखील सत्ताधार्‍यांनी हे विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा उद्घोष करून सलग तीन वेळा सत्तेत येणार्‍यांनी या विधेयकाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. एरवी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये गोंधळ झाला असता, त्या गोंधळातच अनेक विधेयके चर्चेविना मंजूर केली जातात. परंतु हे विधेयक मंजूर केले नाही. एकप्रकारे सनातनवाद्यांना सरकारनेच ढिल दिली. विधेयक मंजूर झाले असते तर सनातन्यांना नाइलाजाने गप्प बसावे लागले असते. परंतु ढिल मिळाल्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या हत्येचे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी प्रतिगाम्यांना बळ मिळाले. 
 
सनातनी प्रवृत्तीने गेल्या गुरुवारी आणखी एक बळी घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलेल्या बावीस वर्षांच्या एका छायाचित्रकार मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मुंबईच्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये आपल्या सहकार्‍याबरोबर बातमीसंबंधी छायाचित्रण करण्यासाठी ही मुलगी गेली होती. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आक्रोश क्षमण्याआधीच ही घटना घडली आणि पुनश्‍च गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाचा उद्रेक झाला. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुरता झाकोळून गेला. मुंबई हे सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याची शेखी आम्ही मुंबईकर मिरवत होतो. पण आमची मान शरमेने खाली गेली. या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह तर लागलेच; पण महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य प्रतिस्पध्र्यांना नामोहरम करण्यासाठी अथवा आमदार निधीत वाढ करण्यासाठी गोंधळ घालतात. सभागृहाचे कामकाज बंद पाडतात; पण महिलांचे प्रश्न व बलात्कारासारख्या घटनांसाठी एवढा जोराचा आवाज उठवला जात नाही. सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला शक्ती उभी राहिली आहे. तिचे पद्धतशीर खच्चीकरण केले जात आहे. तिला शक्तिहीन करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. स्त्रीची गर्भातच हत्या केली जाते आणि दोन वर्षांच्या बालिकेपासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंंत प्रत्येकीला बलात्काराला सामोरे जावे लागत आहे. अल्पवयीन मुली, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसाय करणार्‍या महिला, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
गेल्याच सप्ताहात पुण्याजवळ दौंडमध्ये पाचवी इयत्तेतील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यापूर्वी सातारा, जळगावमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून जन्मदात्या माता-पित्यांनीच मुलीचा बळी घेतला. रेशनकार्डासाठी गेलेल्या चेंबूर गृहिणीवर रेशनकार्ड एजंटानेच बलात्कार केला. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने महिलेवर बलात्कार केला. मुंबईत कफ परेडमधील झोपडपट्टीत अडीच वर्षांंच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. हिंगोलीत उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. बलात्काराचे सत्र सुरूच असून, अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली जात नाहीत. सरकारने विधिमंडळात दिलेल्या एका लेखी उत्तरामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत राज्यात बलात्काराच्या १७0४ घटना घडल्या आहेत. बलात्काराचे १४ हजार ४१४, विनयभंगाचे ३१ हजार ४१२ व छेडछाडीचे ९ हजार ४८0 प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. गतवर्षी झालेल्या बलात्काराच्या १७0४ घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची संख्या ९२४ आहे. ही सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयांमध्ये वर्ग करण्याच्या सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. तथापि जोपर्यंंत बलात्कार्‍यांना कडक शासन होत नाही, तोपर्यंंत पोलिसांचा अथवा कायद्याचा धाक वाटणार नाही. ही सर्व प्रकरणे पाहता सरकारच्या आणि समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय, असे वाटत असून, यामुळे सनातन शक्ती प्रभावी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

11 टिप्पणी(ण्या):

Vikas म्हणाले...

सनातन संस्कृती संस्थेचा बिमोड करण्यासाठी काय-काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करावयास हवा!

अनामित म्हणाले...

सनातन संस्कृती संस्था. समूळ नष्टच केली पाहिजे, फक्त बंदी घालून सुद्धा काहीही उपयोग होणार नाही.

अनामित म्हणाले...

स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.
'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’

विवेक (सिडको-औरंगाबाद)

अनामित म्हणाले...

रा. स्व. संघ आणि विध्वंस!

’ एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.

□ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.
□ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.
□ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार.
□ रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.
□ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.
□ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
□ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

अनामित म्हणाले...

पुरोगामी म्हणजे काय?

विवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक!

गोडसेवादी म्हणजे काय?

कशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक!

सनातनवादी म्हणजे काय?

देवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक!

सुनील न्यायाधीश.

अनामित म्हणाले...

अंधश्रद्धा निर्मुलन करणारा नव्हे, ब्राह्मणशाही माजविणारा कायदा!

-राजा
________________________________________
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मूळ कायद्यातील महत्त्वाची कलमे रद्द करण्यात आल्यामुळे हा कायदा अंधश्रद्धेच्या विरोधातील कायदा ठरण्याऐवजी ब्राह्मणशाही माजविणारा कायदा ठरणार आहे. देवॠषी, वैदू, छु-छावाले यांची भोंदूगिरी या कायद्याने बंद होईल. ब्राह्मणांकडून होणारी भोंदूगिरी मात्र निर्वेधपणे सुरू राहील. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांकडून होणा-या भोंदूगिरीला कायदेशीर संरक्षणही मिळेल.

'‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा'' असे या या कायद्याचे मूळ नाव आहे. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेच शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हापासून तो पडून होता.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे मूळ विधेयक आणि २०११ साली सरकारने विधिमंडळात सादर केलेले सुधारित विधेयक यात फरक आहे. मूळ विधेयक १३ कलमांचे होते. सुधारित विधेयकात ११ कलमे आहेत. कलम ५ आणि कलम १३ काढून टाकण्यात आले आहे. कलम ५ मध्ये धार्मिक ट्रस्टसंबंधी काही जाचक तरतुदी होत्या. तर कलम १३ मध्ये ब्राह्मणांच्या भोंदुगिरीवर थेट पाय पडेल, अशी तरतूद होती. या दोन्ही तरतुदी काढल्यानंतर हे विधेयक आता एकांगी आणि एकतर्फी झाले आहे. कनिष्ठ जातीतील प्रथा आणि परंपरा या विधेयकामुळे बेकायदेशीर ठरल्या आहेत. त्याच वेळी ब्राह्मणांच्या हस्ते पार पाडल्या प्रथा आणि परंपरा मात्र श्रद्धेच्या कक्षेत आल्या आहेत. वारक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ब्राह्मणी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे फळ त्यांना मिळाले आहे.

काय होते कलम १३?
या कायद्यात अंधश्रद्धा म्हणजे काय याचा खुलासा करणारे एक स्वतंत्र कलम आहे. तसेच या अंधश्रद्धांसाठी शिक्षा सांगितल्या आहेत. ही कलमे कोणाला लागू आहेत आणि कोणाला लागू नाहीत, याचा खुलासा कलम १३ मध्ये करण्यात आला होता. कलम १३ मध्ये एक तरतूद खालील प्रमाणे होती :
‘‘ शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरिक व आर्थिक बाधा पोहचत नाही, असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.''
ज्या विधिने नागरिकास शारिरिक किंवा आर्थिक झळ पोहोचविणारे विधि करणे या कायद्यानुसार बेकायदेशीर होते, असा वरील तरतुदीचा स्पष्ट अर्थ आहे. ब्राह्मणांमार्फत केले जाणारे कोणतेही विधि हे दक्षिणा घेतल्याशिवाय होत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, ब्राह्मणांना दक्षिणा घेण्यावर या कायद्याने बंदी येणार होती. तथापि, आता १३ वे कलमच या कायद्यातून काढून टाकले गेले असल्यामुळे ब्राह्मणांना दक्षिणा घेण्याचा तसेच धर्माची, ग्रहता-यांची भिती घालून नागरिकांची लुट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्राह्मणांकडून करण्यात येणा-या लुबाडणुकीला आळा घालणारी एकमेव तरतूद या कायद्यातून वगळण्यात आल्यामुळे हा कायदा आता ब्राह्मणांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

ब्राह्मणांची ती श्रद्धा बहुजनांची मात्र अंधश्रद्धा
कनिष्ठ जातीत पाळल्या जाणाèया प्रथा अंधश्रद्धा तर ब्राह्मणांच्या मार्फत पाळल्या जाणा-या प्रथा श्रद्धा असा सरळ भेद नव्या कायद्याने केला गेला आहे. हा मुद्दा आपण उदाहरणाने समजून घेऊ या. ''.. मरिआईचा प्रसाद खाल्ला नाही, तर तुझे तळपट होईल. तुझा सर्व धंदा बसेल!'' अशी भीती कोणी घातलीच तर या कायद्याने ती अंधश्रद्धा ठरून भीती घालणारास शिक्षा होईल. मात्र, ''... सत्य नारायणाचा प्रसाद खाल्ला नाही, म्हणून साधू वाण्याची नौका बुडाली. त्याचे तळपट झाले...'' हे सांगणे या कायद्यानुसार अंधश्रद्धा ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागाची पुजा केली जाते. नागाचा कोप झाला म्हणून देवॠषांमार्फत विधी केले जातात. हे प्रकार नव्या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतील. मात्र, नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्राह्मणांच्या हस्ते नारायण नागबळी केल्यास बेकायदेशीर ठरणार नाही. देवॠषाकडे विधी केल्यास येणारा खर्च शे-दोनशे रुपयांचा असतो. त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करण्याचा खर्च साधारण २५ हजार असतो. नारायण नागबळी हा विधि फक्त ब्राह्मणांच्याच हस्ते केला जातो.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा बहुजन समाजातील भोंदुगिरीला बंदी घालून ब्राह्मणांच्या भोंदूगिरीला प्रोत्साहन देणार आहे, एवढाच या चर्चेचा निष्कर्ष आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या धांदलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राह्मणांशाही माजविणारा कायदा राज्यात निर्माण होत आहे. त्यामुळे जरा सावधान.

अनामित म्हणाले...

।। आसारामायण ।।

रवींद्र तहकिक

ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या ।
करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।।
लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू ।
सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची ।
गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।।
रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। .
अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे ।
तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी ।
पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी ।
कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
नाचताना मोर । दिसे मन विभोर ।
मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे ।
गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।।
गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले ।
हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
तेलही गेले ।तूपही गेले ।
धुपाटणे हाती आले । भोसडीच्या ।।१२।।
खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा ।
पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
सांगती महिला मुली । तुझी कसाब करणी ।
रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात ।
कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।।
भर सभेत नाचतो । पोरी कवेत आवळतो ।
रासलीला सांगतो । अवचीन्द्या ।।१८।।
नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
आता नाकाने कांदे । सोलू नको ।।१९।।
पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा ।
बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।

अनामित म्हणाले...


दाभोळकरांचा खूनी वर्तकच !

रवींद्र तहकिक
------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र पोलिस सध्या डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्य साठी जंग जंग पछाडत आहेत .
परंतु खून कोणी केला याचा मागमूस पोलिसांना आजून लागलेला नाही .कारण स्पष्ट आहे : पोलिस
चुकीच्या दिशेने तपास करीत आहेत . ही काही कुण्या सर्वसाधारण माणसाची हत्या नाही . जी कोणी
वयक्तिक सुडाच्या भावनेतून किंवा रागाच्या उद्रेकातून केली असेल . किंवा हा खून एखाद्या फसलेल्या किंवा
बिनसलेल्या व्यवहारातुन झाला आसेल असेही नाही . दाभोलकरांचे व्यक्तिमत्व , वर्तन आणि व्यवहार अत्यंत
चोख , काटेकोर आणि पारदर्शी होते . त्यांचे नैतिक आचरण देखील अतिशय सरळ होते . विचारसरणी , विचारांची मांडणी आणि भूमिकेचे प्रगटन देखील नेमस्त आणि साधन शुचीत्वाच्या मर्यादा पाळणारे होते .
असे असताना त्यांचा खुनी शोधताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अस्तिवा पेक्षा त्यांच्या कार्याचे आस्तित्व कुणाच्या हिताआड येत होते ? कोणाच्या डोळ्यात खुपत होते ? कुणाला ते विचारानेच नव्हे तर जगण्याने देखील नकोसे झाले होते ? कोण त्यांच्या सत्यान्वेशी विचार समोर हतबल झाले होते ? आणि कोण एखादा विचार हाणून पडता येत नसेल तर माणूस हाणून पाडा ! ही ब्राम्हणी विचारधारा आपल्या संस्थेचे ब्रीद
म्हणून मिरवतो ? हे पोलिसांनी तपासले पाहिजे .
वर्तकला पकडा
---------------------
महाराष्ट्र पोलिसांना आम्ही अगदी खात्री पूर्वक सांगतो की दाभोलकरांचे खुनी पकडण्या साठी
सगळ्या महाराष्ट्रात सैरावेंरा धावायची आजीबात आवश्यकता नाही . कारण ज्यांनी खून केला ते
सुपारी घेतलेले शार्पशुटर आहेत. त्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करणे , सी सी टीव्ही फुटेज तपासणे , संभाव्य
मोटारसायकल नंबर वरून मालकाचा शोध घेत आज इकडे तर उद्या तिकडे धावपळ करणे यात वेळ आणि
उर्जा दोन्हीचा अपव्यय आहे . आशा प्रकरणात प्रत्यक्ष खून करणाऱ्या पेक्षा खुणा मागचा सूत्रधार पकडणे
आवश्यक असते . तो आधी पकडला नाही तर मग नंतर खुनी पकडले तरी सूत्रधार कायम पडद्याआडच
राहतो. या प्रकरणातही अशीच शक्यता आहे . म्हणूनच आमचे पोलिसांना असे आव्हान आहे कि
आधी सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा . टायर मध्ये घालून तेल लावलेल्या बेताच्या दंडुक्याने
त्याच्या ढूगंणा वर दहा पाच टोले हाणा ; एका तासात तो पादरा बामन कटाचे कारस्थान हागेल .
पुन्हा ती चूक नको
-----------------------------
मुख्य सूत्रधार सोडून खुन्याचाच तपास केल्या मुळे आपण महात्मागांधी , इंदिरा गांधी , राजीव गांधी
यांच्या हत्या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष खुन्या पर्यंतच पोहोचलो आणि त्यांना फाशी देवून मोकळे झालो .
परंतु या खुनाचे मुख्य सूत्रधार , त्यांनी रचलेले षड्यंत्र , कट कारस्थान आज्ञातच राहिले . -ते कधीच
बाहेर येवू शकले नाही. महात्मा गांधी हत्या नथुराम गोडसेच्याच मेंदूतून उगवलेली कृती होती ;
असे कुणीही गुन्हेशास्राचा व राजकीय हत्यामागील कारणांचा आभ्यास करणारा अभ्यासक मान्य करणार नाही . हीच बाब इंदिरा राजीव हत्ये बाबत लागू होते , आता दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास देखील
ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने चालू आहे त्यातही कदाचित खुनी पकडले जातीलहि ( ?) पण मुख्य सूत्रधार मात्र साळसूदपणे आसुरी आनंद घेत टीव्ही वर प्रतिक्रिया आणि चर्चा करील ! आमची पोलिसांना एकाच विनंती आहे कि महात्मा गांधीच्या वेळी केली तशी चूक पुन्हा करू नका , वेळ न दवडता सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा ; आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवून बोलते करा .
वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे
-----------------------------------------------
वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे आहेत , सनातन संस्थेने वेळोवेळी दाभोलकर आणि त्यांच्या चळवळी
विषयी आपल्या पुस्तिका , प्रकाशने तसेच वेब साईट वरून जे लिखाण केले आहे , हे लिखाण ज्या भाषेत
केले आहे तो एकमेव पुरावा देखील वर्तकच्या मुसक्या आवळण्यासाठी पुरेसा आहे , या शिवाय दाभोलकर यांच्या छायाचित्रावर मारलेली लालफुली : या शिवाय आठ महिन्यांपुर्वी दाभोलकर तसेच श्याम मानव यांच्यावर पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात सनातनच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला ( धक्का बुक्की ) आणि
त्यावर वर्तकची " यह तो बस झाकी है " हि प्रतिक्रिया ! वर्तकला बेड्या ठोकून ; पोलिस कोठडीत बर्फाच्या लादीवर पालथा झोपवून सुंद्री ने त्याचे टिंगर झोडायला आणखी कोणते पुरावे हवेत ?

rohit म्हणाले...

Wel said prakash ji

अनामित म्हणाले...

कमालच आहे. जोपर्यंत दाभोळकर हयात होते तोपर्यंत त्यांना मनुवाद्यांचे गुप्तहेर, बहुजनांचा बुद्धीभेद करणारे अशा आणि यापेक्षाही शेलक्या शब्दांत तुम्हा लोकांच्या टीकेचे धनी होते आणि आता एकदम हुतात्माच.

Typed with Panini Keypad

प्रकाश पोळ म्हणाले...

@Anonyms-
दाभोलकरांना कधीही आम्ही टीकेचे धनी बनविले नाही. दाभोलकरांच्या विचाराच्या, कार्याच्या पाठीशी आम्ही नेहमीच होतो आणि आहोत. काही लोकांनी दाभोलकरांना मनुवादी म्हटले असेल तरी आम्ही कधीही त्यांचाशी सहमत झालो नाही. दीड वर्षापूर्वी आमच्या गावाशेजारी डॉ. दाभोलकर यांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा मी त्यांना भेऊन चर्चा केली होती. त्या कार्यक्रमाबद्दल सह्याद्री बाणावर मागेच लिहिले आहे. तसेच साधारण चार वर्षांपूर्वी मी काही लोकांशी झालेल्या पत्रव्यवहारातून डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या विचारांचा पुरस्कारच केला आहे. शक्य झाल्यास ती पत्रे ब्लॉगच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातील.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes