मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, सातारा.
जन्मतारीख- ०१/११/१९४५
शिक्षण- एम.बी.बी.एस. (१९७०)
वैद्यकीय व्यवसाय- १९७०-८२
Ø  १९८२ सालानंतर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात सतत संघर्ष, लेखन, भाषण. आजवर हजारो व्याख्याने, शेकडो लेख, आकाशवाणी, दुरचित्र वाहिन्या यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग. अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन याच्या विविध पैलूंवर बारा पुस्तकांचे लेखन. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा या प्रक्रियेत महत्वाचा
सहभाग. आज महाराष्ट्रात समितीच्या २२० शाखा आहेत. कोणत्याही शासकीय अनुदान अथवा फंडिंगशिवाय हे काम अहोरात्र चालू आहे. या संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष. ६० वर्ष झाल्यानंतर कार्याध्यक्ष पद सोडले.
Ø  १९८६ साली परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेची सातारा येथे स्थापना. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार व उपचार या चारही पातळीवर भरीव स्वरूपाचे कार्य. या संस्थेमार्फत सध्या ४० व्यसनी व्यक्तींना एक महिन्याचे उपचार दरमहा केले जातात.
Ø  गेली २५ वर्षे परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता (वैद्यकीय व्यवसाय बंद करून) असलेल्या दाभोलकरांनी पुरोगामी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते.
Ø  परिवर्तनवादी पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन करण्यात दाभोलकरांचा पुढाकार. डॉ. दाभोलकर हे त्याचे कार्यवाहक आहेत. हा निधी १ कोटी रुपयांचा आहे. त्या रकमेच्या व्याजातून दरमहा ५० कार्यकर्त्यांना १ हजार रुपये मानधन देण्यात येते. गेली १८ वर्षे हा उपक्रम चालू आहे.
Ø  साधना या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ध्येयवादी वैचारिक साप्ताहिकाचे गेली १४ वर्षे संपादक. या कालावधीत साप्ताहिकाचे ६० विशेषांकासह एकूण ७०० अंक नियमितपणे प्रसिद्ध झाले. साधना प्रकाशनाचे सचिव, त्यामार्फत गेली १० वर्षात सुमारे ४० दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन.
Ø  आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू. भारत विरुद्ध बांगलादेश या कबड्डी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाकडून गौरव. व्यक्तिगत कौशल्याची सात सुवर्ण पदके.
पुरस्कार-
Ø  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व शिवछत्रपती युवा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाचे त्या-त्या क्षेत्रातील सर्वोच्च दोन्हीही पुरस्कार मिळवणारी एकमेव व्यक्ती. झाडे लावणे, पर्यावरण सुसंगत होळी, प्रदूषणमुक्त दिवाळी, गणेश मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण रोखणे अशा धर्मचिकित्सेच्या अनेक संघर्षातही मोठ्या प्रमाणात सहभाग व नेतृत्व.
Ø  पुस्तक लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा एकूण तीन वेळा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार. (अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, ऐसे कैसे झाले भोंदू व अंधश्रद्धा विनाशाय या पुस्तकांना) याशिवाय विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

सामाजिक संस्थांकडून सन्मान-
Ø  महाराष्ट्र फौंडेशन, अमेरिका यांच्यामार्फत न्यू जर्सी येथे दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा दहा लाखाचा पुरस्कार मिळाला. हे पैसे दाभोलकरांनी समितीला देवून टाकले. (याच पैशाचे निमित्त करून दाभोलकर आणि अंनिसला परदेशातून पैसा येतो असा अपप्रचार करण्यात आला. वास्तविक पाहता हे दहा लाख रु. वगळता अनिस किंवा दाभोलकर यांना परदेशातून एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे अनिस ला कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. अनिसच्या कार्यकर्त्यांच्या देणगीवरच सारे काम चालते.)
डॉ. दाभोलकर यांचा परिवार-
Ø  पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवदत्त दाभोलकर, प्रयोग परिवाराचे संस्थापक आणि तासगाव येथील द्राक्ष क्रांतीचे प्रणेते मुकुंदराव उर्फ श्रीपाद दाभोलकर, सायन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नरसिंह दाभोलकर, टाटा एक्स्प्रेस मिलचे दिनानाथ दाभोलकर, लेखक दत्तप्रसाद दाभोलकर आणि नागपूर सहकारी डेअरी व आरे मिल्क कॉलनीचे संचालक चारुदत्त दाभोलकर हे नरेंद्र दाभोलकरांचे बंधू होत.
Ø  एस.एन.डी.टी. कॉलेजच्या माजी उपप्राचार्या कुंदा दाभोलकर, रयत शिक्षण संस्थेतील प्राध्यापिका वेणू पळशीकर, एस.एन.डी.टी. तील प्राध्यापिका डॉ. अर्मज्ञा नेरुरकर या त्यांच्या भगिनी होत.
Ø  डॉ. शैला दाभोलकर (स्त्रीरोगतज्ञ) या त्यांच्या पत्नी, तर डॉ. हमीद दाभोलकर (मानसोपचार तज्ञ) हे त्यांचे पुत्र होत. मुक्ता पटवर्धन ही त्यांची मुलगी टाटा सोशल सर्विसेस मध्ये काम करत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes