बुधवार, जानेवारी १६, २०१३

साहित्य संमेलनात धर्म नको त्याप्रमाणे जातही नको

यंदाचे साहित्य संमेलन साहित्यामुळे कमी आणि साहित्यबाह्य वादामुळे जास्त गाजले. ह. मो. मराठे यांचा जातीय प्रचार, परशुराम, हमीद दलवाई, संमेलनातील राजकारण्यांचा सहभाग या विषयावरून चांगलेच वाद झाडले. संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी समारोपाच्या भाषणात ‘साहित्य संमेलनात धर्म नको’ अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी कोतापल्ले यांची ही भूमिका घडलेल्या प्रकाराशी सुसंगत नव्हती. साहित्य संमेलनात परशुरामाचा जो उदो-उदो करण्यात आला त्यासंदर्भात कोतापल्ले यांनी सदर विधान केले. परंतु परशुराम हा हिंदू धर्माचे प्रतिक नाही. हिंदू धर्माचा उदो-उदो करण्यासाठी परशुरामाला संमेलनात घुसडले नव्हते. तर परशुरामाच्या पौराणिक कथांच्या अनुषंगाने आपल्या जातीय जाणीवा जपण्यासाठी आणि जातीय अहंकाराचे निखारे फुलवण्यासाठी परशुरामाचा उदो-उदो केला गेला.


परशुराम हा स्वतःच्या आईची हत्या आणि क्षत्रिय संहार यासाठी प्रसिद्ध आहे. ब्राम्हण समाज हा परशुरामाला आपला पूर्वज मानतो. त्यांच्यादृष्टीने परशुरामाचे स्थान खूप मोठे आहे. हरकत नाही. परंतु बहुजन समाजाला परशुरामाबद्दल किती प्रेम वाटते हे सर्वांनाच माहित आहे. ब्राम्हनानीच लिहिलेल्या पौराणिक कथा खर्या मानायच्या तर परशुराम हा आपसूकच बहुजन समाजाचा शत्रू ठरतो. कारण बहुजनांच्या क्षत्रिय पूर्वजांची परशुरामाने कत्तल केली होती. मग असे असताना परशुरामाला समस्त हिंदू धर्माचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या माथ्यावर थोपण्याचे काय कारण ? संमेलनात धार्मिक प्रतीके नकोत याऐवजी जातीय प्रतीके, जातीय जाणीवा नकोत अशी परखड भमिका कोतापल्ले सरांनी घेतली असती तर अधिक बरे झाले असते.

कोतापल्ले सरांचे लिखाण उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. सरांचे पुरोगामी चळवळींशी, फुले-शाहू-आंबेडकरवादाशी जवळचे नाते आहे. अशा परिस्थितीत कोतापल्ले सरांनी रोखठोक भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु ते घडले नाही.

2 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

thank u सह्याद्री बाणा

tushar म्हणाले...

parshurama parat janm ghe

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes