शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२

'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल

गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर २०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन समाज हा अशिक्षित आणि
अज्ञानी आहे. बहुजन समाजाजवळ प्रचार-प्रसाराची साधने फार कमी आहेत. आणि जी आहेत टी अपुरी आहेत. त्यामुळे बहुजन विचाराच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धीजीवी वर्गाने प्रसारमाध्यमे निर्माण केली पाहिजेत ही निकड नेहमीच जाणवत होती. बहुजन समाजाचा खोटा, बदनामीकारक इतिहास लिहून बहुजनांच्या माथी मारला जातो. असे नतदृष्ट इतिहासकार आणि अभ्यासक (?) नेहमीच प्रस्थापित व्यवस्था टिकवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या हाती हजारो वर्षांपासून शिक्षणाच्या चाव्या असल्याने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आघाड्यांवर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. प्रचार-प्रसाराची बहुतांश माध्यमे त्यांच्याच हाती असल्याने बहुजनांचा आवाज दाबला जायचा. आपल्या हातातील माध्यमांचा गैरवापर करून बहुजनावरील गुलामी अधिक बळकट कशी होईल यासाठीच ही माध्यमे झटत आहेत. स्वतःची बाजू जशीच्या तशी मांडणे हे प्रस्थापित माध्यमांच्या मदतीने कधीच शक्य होत नव्हते. त्यामुळे बौजानांचा आवाज सर्व समाजासमोर मांडण्यासाठी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला.
सध्या इंटरनेट विश्वात कमालीची क्रांती झाली आहे. समाजातील सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करू लागला आहे. विशेषतः तरुण वर्गाचा इंटरनेट वरील वाढता वावर पाहता एखाद्या ब्लॉग/वेबसाईट ची निर्मिती करण्याची कल्पना मनात आली. सह्याद्री बाणा वर आजपर्यंत जे-जे लिखाण केले त्याला बहुजन वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विविध प्रश्नांवर एक वर्ष लेखन केले. काही वेळा इतर ब्लॉगवरील/वर्तमानपत्रातील लेखही सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. अल्पावधीतच सह्याद्री बाणा हा ब्लॉग बहुजन समाजात लोकप्रिय झाला.
सह्याद्री बाणाचे वैशिष्ठ्य म्हणजे कुणालाही शिव्या न देता सभ्य भाषेत केलेली मांडणी. आपल्या वैचारिक शत्रूविरुद्ध लिहितानाही लेखणीचा तोल ढळू दिला नाही. मी शिव्या द्याव्या म्हणून अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मला घाणेरड्या शिव्या दिल्या. त्यानेही मी बिथरलो नाही म्हटल्यावर त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांना शिव्या घातल्या. परंतु मी बहुजन महा मानवांची बदनामी हे लोक का करतात ते सुसंस्कृत शब्दात मांडले.
आजपर्यंत अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार, संपादक आणि चळवळीतील नेत्यांनी सह्याद्री बाणाची दाखल घेतली. यामध्ये डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. हरी नरके, महादेव जानकर, संजय सोनवणी, एस. एल. अक्कीसागर, डॉ. नीरज साळुंखे, प्रा. श्रावण देवरे, प्रा. शोभाताई देवरे, डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. महावीर सांगलीकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सह्याद्री बाणाच्या वाटचालीत अनेक मित्रांनीही खूप मदत केली. निखिल देशमुख याने sahyadribana.com हे डोमेन विकत घेवून दिले. त्याचा सुरुवातीचा खर्चही त्यानेच केला. अनेक मित्रांनी सह्याद्री बाणासाठी शक्य ते सर्व सहकार्य केले. त्यांचा नामोल्लेख करायचा तर जागा अपुरी पडेल.

एका वर्षात सह्याद्री बाणा ची वाचकसंख्या- १,६०,०००
Countries- 53, Follower- 183, Google Page Rank- 2.
 Top 5 articles-
गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज    1369

13 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes