शनिवार, फेब्रुवारी २५, २०१२

बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?

हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.

स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही

बुधवार, फेब्रुवारी २२, २०१२

स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?

सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण  म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-

शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२

बुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या

प्राचीन काळी बौद्ध भिक्खुंमध्ये धम्मा विषयी वादविवाद निर्माण होत असत , काही तत्व, आचार विचार विषयी मतभिन्नता निर्माण होत असे तेव्हा ते वाद मिटविण्यासाठी धम्म संगीतीचे आयोजन करण्यात येत असे. या संगीति अनेक महिने, वर्ष चालत असत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर चार महिन्या नंतर प्रथम धम्म संगीतीचे आयोजन शिशुनाग वंशातील राजा 'अजातशत्रू' यांनी राजगृह येथे केले होते. स्थविर उपाली आणि बुद्धांचा आवडता शिष्य आनंद यांची या संगीतीसाठी प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. ही संगीति सात महिने चालली. मानवाच्या कल्याणासाठी भदंत आनंद यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध तत्व प्रणाली तयार करण्यात आली.

शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२

'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल

गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर २०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन समाज हा अशिक्षित आणि

वैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (?)

निरपराध शम्बुकाला रामाने ठार मारले. शंबूक हा तथाकथित शूद्र वर्णातील असून त्याने विद्या ग्रहण केली, हा त्याचा अपराध होता काय? यात रामाचे समर्थन कसे होईल. हे सुसंस्कृत युद्धाचे उदाहरण आहे का ? वामनाने तीन पावलाची जमीन मागून कपटाने निष्कपट बळीराजाला ठार केले हा सुसंस्कृतपणा आहे का ? परशुरामाने अत्यंत क्रौर्याने आपल्या आई आणि भावाना ठार मारले हा सुसंस्कृतपणा आहे का ? सुग्रीव आणि वाली यांच्या संघर्षात निरपराध वालीला रामाने क्षात्रधर्म बाजूला सारून मारले हे रामाचा सुसंस्कृतपणा दर्शवते की कपट ? वालीचा कोणता अपराध होता ? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. इंद्राने
ऋषीच्या बायकोला फसवून तिच्यावर केलेला अत्याचार काय दर्शवतो.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes