ज्यांनी मला वाचायला, लिहायला शिकवलं, पुरोगामी, विवेकवादी दृष्टीकोन दिला आणि ज्यांच्या संस्कारांमुळे एक 'माणूस' म्हणून माझी जडणघडण झाली ते माझे वडील दिवंगत लालासाहेब पोळ यांना हा ब्लॉग अर्पन…
संपर्क
प्रकाश पोळ, कराड. Mobile-7588204128 prakashpollive@gmail.com
भुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय.
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या एकीकरणाचा नारा दिला. या भेटीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
खरंतर महाराष्ट्राची बिहारशी केलेली तुलना अनेकांना आवडणार नाही. परंतु गेली अनेक वर्षे बिहार मध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे तथाकथित माफिया आणि धनदांडग्या लोकांकडून काढले जात होते ते पाहता आता महाराष्ट्रात हि बिहार सारखी परिस्थिती निर्माण होते कि काय असे वाटू लागले आहे. २५ जानेवारी रोजी सर्व देश दुसर्या दिवशीच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना नाशिक जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. मालेगाव चे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांची माफियांनी जिवंत जाळून हत्या केली.
हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग....... जीवघेण्या संघर्षातही ज्याचे हृदय स्वच्छ आणि मस्तक ताठ राहिले ... असा तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता... सात काळजाच्या आत जपून ठेवावा , असा निरागस 'माणूस'...
भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.... सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता..
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही. या संकुचित प्रवृत्तीनीच छ. शिवराय आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना महाराष्ट्रापुरते संकुचित करून टाकले. त्यांचा आदर्श, त्यांचे चरित्र इतर राज्यातील लोकांपर्यंत नीट पोहचू दिले नाही. आपला सामाजिक, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या महामानवांच्या नावाचा, कर्तुत्वाचा दुरुपयोग केला गेला. परिणामी या महामानवांच्या कर्तुत्वाला जे राष्ट्रीय आणि सर्वसमावेशक स्वरूप लाभायला पाहिजे होते ते लाभले नाही. त्याच प्रमाणे दुसऱ्या राज्यातील महामानवांचे कर्तृत्वही महाराष्ट्रातील
बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे संपादक प्रा. ज्ञानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.
उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते.
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर' असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
केंद्र सरकारच्या डाक-तार विभागाने दोन रुपये किमतीचे अहिल्यादेवींचे तिकीट जारी केले. या तिकीटासोबत वितरीत केल्या गेलेल्या माहिती पत्रकामध्ये अनेक चुका आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
चूक क्र. १-अहिल्याबाई मल्हारराव होळकरांची 'मुलगी' होती. वस्तुस्तिथी- प्रत्यक्षात अहिल्यादेवी मल्हाररावाची सून होती. मल्हाररावांच्या मुलाशी म्हणजे खंडेरावशी तिचा विवाह झाला होता. अहिल्याबाईंचे वडील चौंडी (नगर) चे माणकोजी शिंदे होते. विशेषत्वाने मी नमूद करतो कि, १९७५ साली
‘जात नाही ती जात’ असे जरी आपल्या जातीव्यवस्थेबद्दल किंवा जातींबद्दल बोललं जात असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. कारण खरं सत्य आहे ते ‘मनातून जात नाही ती जात’. बऱ्याच वेळा या जाती नकोशा वाटतात. आरक्षणासारखा मुद्दा समोर आला तर मात्र या जातीव्यवस्थेचा (कि जातींचा) फारच तिटकारा यायला लागतो. या जाती नसत्या तर बरे झाले असते असे वाटू लागते. एकसंध समाज निर्माण व्हयला हवा अशी स्वप्ने काही जणांना पडू लागतात. परंतु खरोखर आपण मनातून जाती हद्दपार करू शकतो का ? या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आणि माझातरी असा अनुभव आहे कि वरवर पाहता सर्व जाती-धर्माचे लोक दैनंदिन व्यवहारामध्ये जातीपातीना महत्व देत नाहीत असा भास निर्माण करत असले तरी मनातून मात्र जाती अधिक बळकट केल्या जातात. जातीव्यवस्था बळकट व्हायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा उहापोह करून या व्यवस्थेला सुरुंग लावण्याऐवजी जातीनाच दोष दिला जातो. आपणच कळत नकळत जाती कशा बळकट करत असतो त्याचा नुकताच विदारक परंतु अपेक्षित अनुभव आला.
डॉ. विश्वनाथ कराड, विश्वास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. आनंद पाटील
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तरुणाईत कमालीची क्रेझ आहे. सनदी अधिकारी, सरकारी अधिकारी, त्यानं मिळणारा मन तरुणीला आकर्षित करतो. त्यांच्यात सेवाभावाच बीज रुजवतो. या परीक्षेसाठी कठोर मेहनतही घ्यावी लागते.
परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. वी. वाले आणि पेपर वाले सांगत होते. त्या सभेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर दाखवले. पण राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरेच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी असूनही एकाही प्रसारमाध्यमाने त्यांची दखल घेतली नाही. लेख वाचा 'प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा' ) त्या सभेत राज ठाकरेनी बोलण्याच्या ओघात अतिशय खोटारडे विधान केले. बहुजन समाजातील महामानवांचा सत्य इतिहास दडपून जातीयवादी इतिहास लादण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे ते विधान म्हणजे उत्तम नमुना होय.
जिजाऊ.....स्वराज्याची प्रेरणा......जगातील प्रत्येक माणसाने आदराने नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच
असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही जिजाऊनी
शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही -
पारतंत्र्यात आहोत, ही दिलेली जाणीव होती.
दै. पुण्यनगरी मध्ये ५ जानेवारी २०११ रोजी प्रकाशित झालेला विजय सामंत यांचा ‘हे राज्य मराठी कि मराठा’ हा लेख महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती, इतिहास यांचा विपर्यास करणारा व एकांगी आहे. सदर लेख लिहिताना लेखकाने पूर्वग्रह मनात ठेवून लेखन केले आहे हे स्पष्टपणे जाणवते. आजवर ज्यांनी इतिहास लेखनात अनेक लबाड्या केल्या आणि स्वताचा जातीय अहंकार फुलवत ठेवला त्याना अभय देवून जातीयवाद आणि इतिहासातील विकृतीविरोधात लढा उभारणाऱ्या संभाजी ब्रिगेडला लेखक जातीयवादी ठरवतात.
Thank very much for joining the group and very warm welcome to all of you to the group of Savitribai Phule. Your support and encouragement for the cause of Savitribai Phule’s birthday the 3rd January to be recognized as Woman’s day of India is much appreciated.
खांद्यावर कावड घेवून पाणी आणणं हे त्याचं रोजचंच काम होतं. खांद्यावरच्या बांबूला दोन्ही टोकांना सारख्याच आकाराची दोन मडकी त्यानं दोराने घट्ट बांधली होती. पण त्यातलं एक मडकं व्यवस्थित, चांगलं होतं, तर दुसऱ्या मडक्याला तडा गेला होता. विहिरीवरून पाणी आणताना दोन्ही मडकी तो पाण्यानं गच्च भरायचा. पण घरी परत येईपर्यंत त्यातलं एक मडकं अर्ध गळून गेलेलं असायचं आणि एका खेपेत जेमतेम दीड मडकं पाणी त्याला मिळायचं.
दोन मित्र. रस्त्याने चाललेले असतात. बोलता बोलता त्यांच्यात जबर भांडण होतं. वाद पेटतो. दोघांचीही डोकी तापतात आणि राग अनावर होवून एक मित्र दुसऱ्याच्या श्रीमुखात भडकावतो.
आपल्या मित्रानं एवढ्या तेवढ्या कारणानं आपल्यावर हात उचलला, हे काही त्या बिचाऱ्या मित्राला आवडलं नाही. पण तो गप्प बसला. संतापून हात तर अजिबात उचलला नाही. चालता चालता तो फक्त थांबला आणि वाळूवर त्यानं लिहिलं, “माझ्या जीवाभावाच्या मित्रानं आज माझ्यावर अकारण हात उचलला !”
सामान्यतः समाजातील बहुतांशी लोक कालचक्राप्रमाणे वाहत जातात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. आणि यातच त्यांचे युग प्रवर्तकत्व सामावलेले असते.
महात्मा जोतीराव फुले
भारताचा इतिहास हा जेवढा पुरुषांच्या उज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारून गेला आहे तेवढाच स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने भारतीय इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली आहेत. परंतू आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान अजून मिळालेला नाही. आज भारत २१ व्या शतकात मार्गक्रमण करत आहे. गेल्या दीडशे वर्षात भारताने कमालीची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती केली आहे. परंतु या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचाराचे स्मरण आपण कितपत करतो ? विकासाच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारताना आपण या महामानवांच्या विचाराकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करतो.
झाडाचा शेंडा आकाशात उंच उंच झेपावत असतो. वाऱ्याच्या तालावर डुलत असतो. त्याला कोवळी पालवी फुटत असते. एकेकाळी त्याच्या समपातळीवर असलेले असंख्य पदार्थ आता खूप खाली राहिलेले असतात. अशा स्थितीत जमिनीच्या उदरात अदृश्य बनलेली स्वताची मूळे त्याला दिसण्याचा तर प्रश्नच नसतो. शिवाय माथ्यावरील आकाशाकडे नजर लागलेली असल्यामुळे आपल्यापेक्षा खूप खालच्या स्तरावर असलेल्या आपल्या मुळांकडे पाहायला सवड नाही, असेही काही झाडांच्या शेंड्यांना वाटत असते. खाली डोकावून पाहणे कधी कधी त्यांना अप्रतीष्ठेचेही वाटते.
सातारा जिल्हा हा सुरवातीपासूनच परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिला आहे. कारण स्वराज्य निर्माण करून सामाजिक आणि राजकीय अस्थिरता संपवण्याचा प्रयत्न करणारे छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी.