बुधवार, नोव्हेंबर ३०, २०११

कोण करत आहे शिवाजी महाराजांचे अपहरण?

गेल्या रविवारी २० नोव्हेंबर २०११ रोजी माझा लोकमतमद्धे "शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?" हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला पार्श्वभुमी होती ती एका प्रसिद्ध दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजीची मुखप्रुष्ठावर प्रसिद्ध झालेली बातमी. शिर्षक होते "फ्रेंच अभासक उभारतोय शिवस्रुष्टी" आणि याच बातमीत दुस-या परिच्छेदात म्हटले होते कि "लोहगांव येथे पाच एकरात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्यांच्या पराक्रमाचे माहिती देणारे संग्रहालय उभारण्यास गोतिये यांनी सुरुवात केली असुन त्याचा पहिला टप्पा या महिन्यात पुर्ण होत आहे...." याच बातमीत पुढे म्हटले आहे कि या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे व दुर्मीळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे." खरे तर माझा लेख लोकमतने आवर्जुन प्रसिद्ध केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक वैचारिक वादळ उठले. पण गोतिये यांचे या लेखाला उत्तर छापुन आले ते डीएनए या इंग्रजी दैनिकात दिनांक २३ नोव्हेंबर २०११ रोजी. या उत्तरात पहिली चुक म्हणजे माझा लेख १९ नोव्हेंबर रोजी छापुन आला आहे असे केलेले प्रारंभीचे विधान. प्रत्यक्षात ते २० नोव्हेंबर रोजीचे असायला हवे होते. पण मी या इतिहाससंशोधक फ्रेंच-हिंदुला ती गफलत माफ करतो. या लेखाचे शिर्षक होते, "Hijacking of Shivaji Maharaj by vested interests." (छुपा हेतु असणा-यांचे शिवाजी महाराजांचे अपहरण...) मुख्यारोप अर्थात माझ्याकडेच होता...पण मला म्हणायचेय कि कोण शिवाजीमहाराजांना वैदिक तंबुत हायज्यक करू पहातोय? हे गोतिये आणि त्यांचे छुपे समर्थक, मी नव्हे कारण मी मानवी स्वरुपाच्या एका महानायकाकडे, शिवाजी महाराजांकडे, एक माणुस म्हणुन पहातो, दैवी अवतार म्हणुन नव्हे कि दैवी आशिर्वादाने महनीय क्रुत्ये पार पाडनारा माणुस म्हणुन नव्हे. शिवाजी महाराजांना भावानी मातेने तलवार दिली हे काव्यात्मक उल्लेख इतिहास ठरवणारा हा इतिहास संशोधक कसा असु शकतो?

मुळात पुण्यतील वर्तमानपत्रातील बातमीत आणि या डीएनए मधील लेखात गोतिये यांनी आव असा आणला आहे कि जणु ते आजही फ्रेंच आहेत, जे खरे नाही. शिवाजी महाराज व भारतीय संस्क्रुती याचा आपला गाढा अभ्यास आहे हे ते म्हणतात तेही खरे नाही, ते कसे हे आपण त्यांच्याच डीएनए दैनिकातील त्यांच्याच स्पष्टीकरणातुन स्पष्ट करुन घेवू.

त्यांच्या प्रत्युत्करात्मक लेखात ते म्हणतात कि शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणुन पुढे आणायला हवे. म्हणजे आधीच शिवाजी महाराज हे भारतीय जनतेचे महानायक नव्हते आणि आता स्व-क्रुत शिवाजी-मंदिरामुळे ते महानायक ठरतील असे त्यांचे म्हणने आहे.
ही त्यांची सरळ सरळ लबाडी आहे.

त्यांनी लेखात अजुन केलेली लबाडी अशी आहे कि, ते म्हणतात, "हा देश भवानी भारती, भारत वा इंडिया या नांवाने ओळखला जात असला तरी शिवाजी महाराज निधर्मी होते...." आणि पुढे हेच सद्ग्रुहस्थ म्हणतात "मला खात्री आहे कि शिवाजी महाराज हे हिंदु होते जसे आजचे मराठा वा तमिळ असतील..." आता मला या सद्ग्रुहस्ताला प्रश्न विचारायचाय कि जर महाराज निधर्मी होते, जे सत्यच आहे, तर मग ते गोतिये म्हणतात याप्रमाणे कट्टर हिंदु कसे असु शकतील? किंबहुना सर्वांना महाराजांबद्दल जो आदर आहे तो ते खरेखुरे निधर्मी असल्याने.

मला येथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. भवानीमातेला आम्ही जगद्जननी म्हणुन पुरातन काळापासुन ओळखतो. भव म्हणजे विश्व, ते निर्माण करणारी ती भवानी. भारती ही मात्र ऋग्वेदातील एक दुय्यम देवता आहे. अदितीएवढेही स्थान तिला ऋग्वेदात नाही. दुसरे असे कि ऋग्वेदाला मुर्तीपुजा मान्यच नसल्याने एकाही ऋग्वैदिक देवतेचे मंदिर भारतात आजही नाही. मग भवानी आणि भारतीची सांगड घालण्याचा गोतिये यांचा प्रयत्न नेमका कशासाठी आहे? त्यांच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत? शिवाजी महाराज निधर्मी होते असे सांगतांनाच ते "हिंदु" होते हे सांगण्यामागील कारंण काय आहे?

भारत माता आणि भारती माता यातील फरक या तथाकथित विद्वानाला समजलेला दिसत नाही, किंबहुना ते या बाबतीत वेड्याचे सोंग घेत पेडगांवला जात आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागते.

पुढे हे विद्वान ग्रुहस्थ श्री अरबिन्दो घोष यांचा दाखला देत म्हनतात कि "आम्ही शिवाजी महाराजांना देव मानत नसुन "विभुती" मानतो." यांना भारतात २०-२५ वर्ष राहुनही भारतीय संस्क्रुती शुन्य समजली आहे असाच याचा अर्थ. विभुती म्हणजे दैवी शक्तीचे अंशता: वा पुर्णावतरण...अवतार. विभुती या चमत्कारांशी संबंधीत असतात. त्यांच्या सर्वच क्रुती या चमत्कारांत जातात,,,,त्यांना कसलाही मानवी प्रयत्नांचा, अलांघ्य मार्ग आक्रमिण्यामागील प्रेरक मानवी स्त्रोतांचा संबंध नसतो. त्या फक्त दैवी इच्छेने घडणा-या घटना असतात.

म्हणजे मग या सद्ग्रुहुस्थांना माझा आक्षेप समजलेलाच नाही. यांनीच आई भवानी...( आता ते तिला एकाएकी भवानी भारती म्हणायला लागले आहेत...) शिवाजी महाराजांना तलवार देते असे शिल्प आधीच सिद्ध करुन ठेवले आहे. पुण्यातील एका प्रमुख व्रुत्तपत्राने यांच्याच मुलाखतीनुसार हे शिवाजी महाराजांचे मंदिर व शिवाजी महाराज आणि वेदांचे संग्रहालय आहे असे प्रसिद्ध केले आहेच. त्याबाबत या उत्तरात गोतिये महोदय एक शब्दही लिहित नाहीत. त्याचे एकही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट कांगावा करतात कि हिंदुंचे खरे शत्रु हे हिंदुच आहेत. त्यासाठी ते मिर्झाराजे जयसिंहांचे उदाहरण देतात. पण मला दाट शंका आहे कि २०-२५ वर्ष भारतात राहुन आणि हिंदुत्वाचे धडे गिरवुनही या ग्रुहस्थांना भारतीय इतिहास माहितच नाही. कारण यांना हे माहित नाही कि औरंगझेब ते आदिलशहाच्या दर्बारात जसे हिंदु सरदार होते तसेच शिवाजी महाराजांच्याही सोबत बहाद्दर आणि जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार आणि सेवक होते. हा लढा, गोतिये समजतात तसा, हिंदु आणि मुस्लिमांतील नव्हता तर, अन्याय करणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे यांच्यातील होता. यांना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चश्म्यातुन बाहेर पडुन इतिहासाचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. हिंदुंचे शत्रु हिंदु असतील असे एक वेळ मान्य करु, मग मुस्लिमांचे शत्रुही भारतात मुस्लिम नव्हते कि काय? हे गोतियेंना बहुदा कोणी शिकवलेले नसावे. किंवा त्या माहितीची दखल त्यांना घ्यावी असे वाटले नसेल.
मला स्पष्टपणे वाटते ते हे कि श्रीयुत गोतिये यांना भारतीय संस्क्रुती वा शिवाजी महाराजांचा कसलाही इतिहास माहित नाही. त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. फाउंडेशन अगेन्स्ट कन्टिन्युंग टेररीझम (FACT) ही त्यांची संघटना, जी हे मंदिर आणि संग्रहालय बनवत आहे ती इस्लामविरोधी संस्था आहे हे कोणीही वेबवर सम्शोधन करुन समजावुन घेवु शकतो. विजत्यनगरमद्धे यांच्याच FACT या संस्थेने उभारलेले संग्रहालय का उद्ध्वस्त केले गेले हे ते सांगत नाहीत, उलट लिंगायत समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे करतात.


पण सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा या घडत असलेल्या मंदिररुपाने कोणीही आजवर एवढा घोर अवमान केला नसेल. मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे म्हणजे महाराजांचे खरे अपहरण होय...शिवाजी महाराजांचे अपहरण मी नव्हे तर गोतिये व त्यांचे कडवे समर्थक करत आहेत. मी त्यांचा येथे पुन्हा एकदा स्पष्ट निषेध करतो.

 श्रीमान गोतिये, भवानी भारती म्हणोत कि भारत माता, शिवाजीराजांना तलवार देत आहे हे मध्यवर्ती शिल्प जेंव्हा पुढाकार घेत उभारतात तेंव्हा त्यांना त्या क्रुत्याचा मतितार्थ समजला पाहिजे. मानवी प्रेरणा आणि दु:सह संकटे झेलण्याची भारतीय मानसिकता यांचेच ते अपहरण करण्याचा डाव रचत आहेत हे स्पष्ट दिसते. मानवी महानायकांचे हे दैवतीकरण आजचा समाज सहन करु शकत नाही हे त्यांना व त्यांच्या छुप्या पाठिराख्यांना समजावुन घावे लागेल. अकारण सामाजिक असंतोष उत्त्पन्न करण्यापेक्षा त्यांनी त्यांना हवे तसे संग्रहालय उभारावे, त्यात वेदांची महत्ता गा वा अन्य कशाची, फक्त शिवाजी महाराजांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणुन प्रोजेक्ट करण्याचे तात्काळ थांबवावे. महाराजांचा स्वतंत्र पुतळा उभारावा, न उभारला तरी काही एक फरक पडत नाही. पण भवानी भारती नामक अद्न्यात देवतेच्या हातुन महाराज तलवार स्वीकारत आहेत हे शिल्प/मुर्ती ही सर्वच शिवप्रेमींच्या ह्रुदयावरील घाव असेल हे क्रुपया समजावुन घ्यावे. शिवाजी महाराजांचे हे वैदिक अपहरण आता तरी थांबवावे.

-संजय सोनवणी

12 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

The hijacking of Shivaji Maharaj by vested interests
Francois Gautier
Marathas should not only be proud that Chhatrapati Shivaji Maharaj was a Maratha, but they should also acknowledge that he has had a lasting influence on the Marathi psyche, which makes their people more nationalistic and self confident than those of many other Indian states.

At the same time, Shivaji should be elevated to the status of a ‘national hero for modern India’, for he embodied all the qualities that are so badly needed in today’s Indian politicians: Shivaji was fearless and his courage was extraordinary. He was devoted to his own country, call it Bharat or Bhavani Bharati, or India. He was truly secular, never harming his enemies’ wives and children and though he was a devoted Hindu, he never destroyed a mosque.

He was a great administrator; whatever he conquered, he saw to it that it was justly administered. He was absolutely free of corruption and cared little for his own comfort. He had great vision and wanted to unify India. Because of his sacrifice, India’s culture, spirituality and social fabric is better preserved from Mumbai to Kanyakumari.
There are a few who have tried to hijack Shivaji and bind him for their own purposes. One such is Marathi writer and activist Sanjay Sonavani, who wrote a piece in Lokmat on November 19, attacking the Foundation Against Continuing Terrorism for building a shrine and a museum in Pune. First, the article is full of glaring errors: the Foundation has erected a shrine dedicated to Bhavani Bharati, not Shivaji; second, FACT is trying to build a museum of Indian history named after Shivaji and which honours him, but Shivaji’s history will only be a part of the museum.

Sonavani attacks FACT on three counts: he says FACT is trying to make a god out of Shivaji; he objects to the fact that Shivaji is associated to Bharat Mata; and he says FACT is trying to link Shivaji to the Vedas. But FACT never said Shivaji was god, we only quoted Aurobindo Ghosh who wrote that he was a Vibhuti. A Vibhuti is not god but an instrument of god. Sri Aurobindo had also written that Napoleon was a Vibhuti and that he was the first one who had a vision of a unified Europe. Nobody ever protested that.

अनामित म्हणाले...

Then, as far as Shivaji’s connection, or non-connection with Mother India or Bharat Mata, there are two undisputed facts: that Shivaji was extremely devoted to his own mother, who played an important influence in his life; secondly that he was as devoted to his own country, and that he wanted to rid her of her enemies. If that is not love for Mother India, then what is? That Hindus have, since time immemorial, chosen to associate their country to the feminine element is highly laudable. The Romans had done the same: Patria.

I am a Frenchman brought up in the ideals of liberty, equality, fraternity and to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was. He was an extraordinary being. It matters not either, whether he related himself to the Vedas or any Hindu scriptures. I doubt it: he was a warrior who wanted to preserve his culture and protect his people. What is for sure is that he was a Hindu, as are a billion Hindus today, whether they are Marathas or Tamil. The theory of the Aryan invasion has been proved false by numerous recent discoveries, it has been opposed by every saint, whether Sri Aurobindo, Swami Vivekananda or Sri Sri Ravi Shankar; yet it is still used today by Christian missionaries, Marxist historians and Muslim scholars to divide India between South and North, Hindi and Dravidian, Brahmins and Shudras. Sanjay Sonavani plays into their hands.

Finally, the biggest enemies of Hindus are Hindus, not Muslims or Christians. India could never have been conquered if Hindus had not betrayed Hindus. The last great Hindu empire, Vijaynagar, which was so extraordinary that its history will have pride of place in FACT’s museum, could not have been razed by Muslims if the Lingayats had not betrayed their brothers and sisters. Shivaji’s most dangerous opponent was a Hindu, Jai Singh who served Aurangzeb. It is sad that even today Hindus are so divided, undermining each other and the few supporters of their great history and spirituality. It is also a great shame that in the town of Chhatrapati Shivaji Maharaj, one cannot find a single museum worth the name to honour his memory and the spiritual and martial inheritance he left behind him. FACT only wants to remedy to that.

francoisgautier26@gmail.com
The writer is editor-in-chief of the Paris-based La Revue de l’Inde and author of A New History of India

हेरंब म्हणाले...

आ आणि व आणि रा !!!!!!!!!!!!!!!!!!

Maharashtra Navnirman Sena म्हणाले...

तुमचा लेख फेकमत मध्ये मी वाचला तेंव्हा इथे (पश्चिम अमेरिका ) १९ तारखेची दुपार होती.

Vitthal Khot म्हणाले...

छत्रपती शिवाजी महाराज हे गवळी-धनगर समाजातील होते. हे १३ वर्ष संशोधन करून डॉ.रामचंद्र ढेरेणी हा निष्कर्ष काडला होता, बर मोलोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांच्या समकालीन
जयराम पिंडे या संस्कृत कवी ने पण राजा बळीप आणि मोलोजी भोसले हे गवळी -धनगर कुळातील होते असे लिहून ठेवले आहे. आता अपहरण कोणी आणि कसे केले आहे ते तुमच्या सारख्या लेखकाला काय सांगणार.
पण हा मुद्दा ऐरणी वर आणल्या बद्दल धन्यवाद

Vitthal Khot म्हणाले...

छत्रपती शिवाजी महाराज हे गवळी-धनगर समाजातील होते. हे १३ वर्ष संशोधन करून डॉ.रामचंद्र ढेरेणी हा निष्कर्ष काडला होता, बर मोलोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांच्या समकालीन
जयराम पिंडे या संस्कृत कवी ने पण राजा बळीप आणि मोलोजी भोसले हे गवळी -धनगर कुळातील होते असे लिहून ठेवले आहे. आता अपहरण कोणी आणि कसे केले आहे ते तुमच्या सारख्या लेखकाला काय सांगणार.
पण हा मुद्दा ऐरणी वर आणल्या बद्दल धन्यवाद

kapil म्हणाले...

mi tumchya researsh mule prabhavit zalo.

Rohankumar R. Jadhav म्हणाले...

फ्रांसुआ गोतिये यांचे FACT हे प्रदरशन तुम्ही पाहिलयं का ? त्यात फ्रांसुआ गोतिये यांनी काश्मीरमध्ये हिँदूंवर इस्लामी आतंकवाद्यांनी केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे . मुसलमानांची वकिली करण्याआधी हिँदूंवर होणारे अत्याचार बघा. इस्लामी आतंकवाद, लव्ह जिहाद, धरमांतरण, मंदिरांवरील आक्रमणे, इ. अनेक संकटे हिंदू धर्मावर आहेत.पहिल्यांदा हे सर्व माहित करून घ्या आणि मग बोला.

अनामित म्हणाले...

Sambaji Brigade Maratha Mahsangh ani Prakash Pol yanchsarke lok Kashasathi Chh Shivaji Mahrajananchi Tyana Dharmnirpeksh tharven tyanch Badnami Karta? Engraj Ithihaskar Chh Shivaji Maharajanche Lutaruncha Sardar Ase varan kartatta. Tyana Dharmanirpeksh tharvun Tumhi tyas dujora deth ahat. Tyapeksha Saral Musalman Vah nah. Aplya ashya vrituumulecha aj Muslimanchi sankhya 14% geli ahe

narayan म्हणाले...

Prakash Pol, jar Chh Shivaji Maharaj Dhrmanirpeksh Hote ase jar tumche sangne asel tar Engraj Etihaskar yancyhya sangane pramane Shivaji Maharaj hee Lutmar karne Khandani Vasul karnare yanche Sardar Hote yas tumhi Dujora det ahet. Tumala Ani Sambahji Brigadela phar Musalamancha Pulka et asel tar saral Musalman Vha.Tumhi Mentally POL dista.Mansache sharir aslene fakta Sharirik Pol nahi Pan Mansik Pol dista

Prakash Pol म्हणाले...

@narayan-
शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते म्हणजे ते लुटारू होते हे आपले विधान तर्कविसंगत आहे. शिवरायांना इंग्रजांनी जरी लुटारू म्हणून संबोधले असले तरी सत्य काय आहे ते सर्वाना माहित आहे. इंग्रजांचे सोडा, आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून "सुरतेची लुट" असाच अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ? ही शिवरायांची बदनामी नाही का ?
शिवराय धर्मनिरपेक्ष होते हेच सत्य आहे. कारण ते कोणत्याही एका धर्माला झुकते माप देत नव्हते. ते सर्व धर्मांचा आदर करणारे राजे होते. कुणाच्याही धार्मिक भावना त्यांनी दुखावल्या नाहीत. अनेक मुसलमान सरदार शिवरायांच्या दरबारात होते. ते शेवटपर्यंत शिवरायांशी प्रामाणिक राहिले याची नोंद घ्यावी.

Datta's Thoughts म्हणाले...

श्री.रा.चिं.ढेरे यांनी केलेले संशोधन फार छान आहे.
त्यांचे पुस्तक मुळात किती जणांनी वाचले आहे कुणास ठाऊक .
"शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव "हे एक महान संशोधन आहे.
प्रत्येकानी संग्रही ठेवावे असे आहे.आणि वाचन करावे - मनन करावे
ज्यांना छ.शिवाजी आणि भोसले घराण्याची सिसोदिया घराण्याशी -एक प्रकारे राजपूतांशी नाळ जोडण्याची घाई
झाली आहे त्यांना ही फार जबरदस्त चपराक आहे.श्री ढेरे यांचे जेव्हढे सत्कार करावेत तितके कमीच !
कुठूनतरी उत्तर हिंदुस्थानाशी नाते जोडल्याशिवाय आत्मा शांतच होत नाही काही लोकांचा.
दक्षिण म्हणजे कमी प्रतीचे ,अशा विचारामुळे ते घडत असेल तर त्यांची कीव करावीशी वाटते.
(जसे आर्य उत्तरेतून आले तसे आम्ही ९६ कुळी पण उत्तरेतून आलो हे दाखवण्याचा हा आटापिटा तर नाही ना ?)
एवढे विजय नगराचे साम्राज्य काय उत्तरेशी नाते जोडत होते काय ?
आद्य शंकराचार्य ,राजा कृष्ण देवराय , अशी कितीतरी उदाहरणे आहेत.जे दक्षिणेचे आहेत.
गणित,काव्य शास्त्र ,भूमिती,तर्कशास्त्र ,अशा अगणित विषयात दक्षिण सरस होती आणि आहे.
प्रांतीय अस्मिता हा आजचा कळीचा मुद्दा होत चालला आहे.प्रेरणा देणारे कोण ? तर फक्त जे लढाई लढले ते का ?
ते ज्या धर्मासाठी लढले ,तो टिकवण्यासाठी ज्यांनी आपल्याच लोकांचे अत्याचार सहन केले,
ज्यांनी हा धर्म टिकवला ,त्यांचे काय ?ज्ञानेश्वरांनी इतका अत्याचार होऊनही ,पसायदान मागताना
" जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात "असे मागणे देवाकडे मागितले.
मला एक सांगा - तुकाराम आणि ज्ञानेश्वर आणि इतर अठरा पगड संत तलवारी घेऊन का नाही उतरले रणांगणात ?
शिवाजी एकतारी-वीणा, आणि चिपळ्या घेवून का नाही फिरला जावळीत आणि त्याच्या जहागिरीत ?
त्याचे उत्तर असे नाही कि नियतीने त्यांची नेमणूक त्या त्या कामासाठी केली होती.
उत्तर असे आहे कि तो त्या त्या प्रत्येकाचा पिंड होता.
विसोबा खेचर नरहरी सोनार नामदेव हे आपापली कामे करत करतच अभंग रचना करत होते , कीर्तन करत होते,
त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन अहिंसक होता.छ.शिवाजी महाराज हे मूलतः जहागीरदाराचे पुत्र.सत्ता त्यानी जवळून पहिली होती .
त्यांना स्वतंत्र राज्य स्थापना हे उत्तर सापडले होते.
छ.शहाजी यांना जे जमले नाही ते यांनी केले. स्वराज्य हा शब्द नंतरचा (आपली स्वतंत्र जहागीर हाच मूळ उद्देश ) आणि ही बांधणी दोन पिढ्यांची होती.
आपण दुसऱ्या समोर झुकण्यापेक्षा आपल्यापुरती एक जागा आपण निर्माण करू शकतो हा विश्वास शिवाजीत निर्माण होण्यास शहाजीला संपूर्ण आयुष्य त्याच वेडाने
पछाडून घालवावे लागले,कधी ताठ मानेने तर कधी अपमान सहन करत.
आणि ते स्वप्न पूर्ण करताना आपली सुरक्षितता म्हणून त्याने इंतर जहागीरादाराना त्यांच्या वाडावस्तीच्या बाजूने तटबंदी करण्यास मज्जाव केला.ते हिंदू असले तरी
स्वराज्याचे नाव घ्यायचे आणि स्वतःचे स्थान भक्कम करायचे हाच खरा उद्देश.शिवाजीने हिंदू राज्याचे स्वप्न लोकाना विकून स्वतःचे भले केले.
सांगायचा मुद्दा - म्हणजे ,महाराष्ट्राची अस्मिता मांडताना कायम एक आणि एकच व्यक्ती समाजापुढे ठेवणे यात जातीयता दिसते.
मला एका प्रश्नाचे कुणी उत्तर देईल का ? समजा संभाजी वर जो प्रसंग आला तो शिवाजीवर आला असता तर त्याने मुसलमान धर्म स्वीकारला असता का .?
आणि उत्तर नाही असेल तर का नाही .
संभाजीने धर्म न बदलता मरण पत्करले .शिवाजीने नेताजी पालकरांचे परत हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतले त्यातून असे म्हणता येईल का
कि त्यांच्यावर जर तशी वेळ आली असती तर ते मुसलमान धर्म स्वीकारून नंतर परत हिंदू झाले असते.
नाहीतरी आजच्या तथाकथित इतिहास संशोधकांच्या म्हणण्यानुसार महाराज निधर्मी होतेच - नाही का ?
बरेच काही अजून लिहिता येण्यासारखे आहे.मोरे घोरपडे सुर्वे यांची शिवाजी बद्दलची तक्रार अगदीच फालतू नव्हती.
आणि शिवाजीने सूरत लुटली नाही तर तो काय तिथे गणपतीची वर्गणी मागायला गेल्यासारखं स्वराज्याच्या नावाने पावती पुस्तक घेऊन गेला होता का ?
त्याच्या उद्योगासाठी त्याला पैसा कमी पडत होता म्हणून त्याने सूरत लुटली.त्यात गैर काय आहे ? लुटली या शब्दाला इतका निषेध का ?
आज महाराज असते तर ते पण म्हटले असते कि अरे बाळानो, मी सूरत लुटली होती - काय म्हणणे आहे तुमचे ?
आजच्या शिक्षण सम्राटा प्रमाणे ही लूट समजू नका .मी स्वराज्यासाठी हे केले .
शिवाजीला larger than life मोट्ठे करण्यात इथल्या लोकांना धन्यता का वाटते काही काळात नाही.त्याला दैवीपणा जोडून आपण त्याचा अपमानच करत आहोत .
त्याची मंदिरे बांधणे म्हणजे मूर्खपणाच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes