मंगळवार, नोव्हेंबर २२, २०११

शिवाजी महाराजांना देव बनवणारा हा गोतिये कोण?

ऐतिहासिक महामानवांना दैवी अवतार वा देवाचाच दर्जा देण्याचा भारतीय वैदिक उध्योग पुरातन आहे. राम-क्रुष्ण या मानवी व्यक्तिमत्वांना अवताराचा दर्जा देवुन बराच काळ उलटला आहे. बुद्ध तर विष्णुचा दहावा अवतार म्हणुन पुराणकारांनी प्रसिद्धच करुन ठेवला. महावीराला मात्र थोडे दुरच सारले...कारण त्याने निर्माण केलेल्या धर्माचा यांना फटका विशेष बसला नसावा. गत सहस्त्रकात शिवाजी महाराज झाले. त्यांना आधी शिवाचा अवतार व नंतर आधुनिक शंकराचार्यांनी विष्णुचा अवतार ठरवण्याचे धोरण राबवले. राजाराम महाराजांनीच पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर
 समुद्रतटकिनारील किल्ल्यात बनवले असे सांगण्यात येते...पण त्या मंदिरातील शिवमुर्ती श्मश्रु रहित आहे आणि आम्ही दाढीखेरीज शिवाजी महाराजांची कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे जशी आम्ही दाढीखेरीज शिवाजीमहाराजांची कल्पना करु शकत नाही तसेच जटाविरहीत पण स्म्श्रुधारी शिवाचीही कल्पना करु शकत नाही. त्यामुळे राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर हे शिवाचे होते कि शिवाजीमहाराजांचे हा प्रश्न उपस्थित होतो.

दै. सकाळ या दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. शिर्षक आहे "फ्रेंच अभ्यासक उभारतोय शिवस्रुष्टी". या बातमीत म्हटलेय कि फ्रांसिस गोतिये नामक फ़्रेंच अभ्यासक शिवैतिहासाने एवढअ प्रभावित झालाय कि त्याने लोहगांव येथे पाच एकरांत शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले असुन पुढील टप्प्यात त्यांच्या पराक्रमांची माहिते देणारे संग्रहालय उभारायला सुरुवात केली आहे. या पाच एकरांच्या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे, दुर्मिळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे.

खरे तर कोणालाही तसा आनंद वाटायला हरकत नाही कि एक परकीय माणुस शिवस्रुष्टी उभारत आहे. त्याला वैदिकत्वाची जोड मिळत असल्याने तर तो आनंद काही समाजघटकांत अद्वितीय असेल यात शंका नाही.

पण माझे प्रश्न आहेत. या शिवमंदिरात शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणा-या आईभवानीचे पहिले ब्रोंझ शिल्प उभारले आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला तो दैवी शक्तीने याचे हे शिल्प म्हनजे प्रतीक आहे आणि जो फ्रांसिस गोतिये ज्या संस्क्रुतीतुन आला आहे त्या सआंस्क्रुतीत हे बसत नाही हे उघड आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला असेल तो त्यांच्या स्वकर्तुत्वाने नव्हे तर दैवी शक्तीने असे सुचवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि त्याचे कवतुक करावे अशी दुर्भावना सुचावी हे आमचे दुर्दैव आहे.

गोतिये यांना एवढेच शिवप्रेम आहे तर हीच स्रुष्टी त्त्यांनी त्यांच्या मायभुमीत निर्माण करायला हवी होती. कधीकाळी योग आला तर आम्हीही फ्रांसला भेट देवुन त्यांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचे आम्ही प्रवासवर्णनात कौतुक केले असते.... पण येथे, याच पुण्यात ज्या पुण्यात दादोजीवरुन नुकताच वाद झाला त्याच पुण्यात आता शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे काय कारण? शिवाजीमहाराजांचे अवमुल्यन करणारे शिल्प वा स्रुष्टी सहन केली जावु शकत नाही.

पण येथील मुठभर वर्गाला पाश्चात्य लोकांबद्दल अधिकच प्रेम असते. येथे जीवनभर शिवप्रेमाबाबत जागे असतात ते निंद्य ठरवले जातात. जे शिवाजी महाराजांच्या आरत्या ओवाळण्यात मागे पडत नाही असे दाखवतात त्यांचे शिवप्रेम हे नेहमीच बेगडी असते. यांना शिवाजी महाराज समजलेलेच नाहीत...त्याच्याच काळात समजले नाहीत तर आता कोठुन?

कोण आहे हा गोतिये? काय अभ्यास आहे याचा शिवाजीचा? दंतकथांना आधार मानत भवानी तलवार देते हे शिल्प उभारायचा त्याचा हेतु काय आहे? कोण आहे त्याच्या मागे? कोणी दिली या महामानवाला लोहगांवला जागा? काय संबंध आहे शिवाजी महाराजांचा वेदांशी? फक्त राज्याभिषेकापुरता...आणि तत्कालीन सामाजिक गरज म्हणुन...एरवी...त्यांनी कोणती वैदिक आद्न्या पार पाडली? आणि हा गोतिये म्हणे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारत त्या शिवस्रुष्टीत वेदांचे माहात्म्य सांगनार आहे...

माझे स्पष्ट मत असे आहे कि शिवाजी अपर्हुत करण्याचा हा नवा डाव आहे. लेनमार्फत जे उरले ते या गोतियेमार्फत पुर्ण करायचा निंद्य हेतु आहे. यांनी शिवाजी वैदिक बनवण्याचा डाव घातला, तसा सतत प्रयत्न केला आणि आता एका पाश्चात्याचे (जो मुळात कोण आहे, त्याची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची लायकी सोडता त्याचा हेतु काय आहे...हे न कळता. याने कोनत्या विद्यापीठात वेदांचे आणि शिवकालीन इतिहासाचे अध्ययन केले?) पण एक पाश्चत्य शिवमंदिर उभारतो या फुका अभिमानापोटी कवतुकाचे फटाके उडवणारे सावध होणार नाहीत याची मला जाणीव आहे. लेनने जे केले त्याची ही पुढची पायरी आहे. जमले तर बदनाम करा...नाहीच जमले तर देवत्व देवुन मोकळे व्हा आणि विसर्जित करुन टाका...गणपतीला नाही का दहाव्या दिवशी पाण्यात टाकुन देत?

हा गोतिये कोण आहे हे प्रथम पहायला हवे त्याखेरीज त्याच्या ख-या प्रेरणा लक्षात येणार नाहीत.
हा फ्रांसिस गोतिये नसुन फ्रन्कोइस गोतिये आहे. हा माणुस मुळचा फ्रेंच. भारतात तो गेली तो आता नुसता भारतीय नाही तर स्वत:ला हिंदु समजतो. त्याचे वडील एक चित्रपट दिग्दर्शक होते. हिंदु धर्माच्या ओढीपोटी तो भारतात आला. पोंडिचेरी येथील आश्रमात रहत असतांना ध्यानधारणेचे धडे गिरवत तो पत्रकारिताही करु लागला. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली असुन "अराईज ओ इंडिया" हे त्याचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याची विस्त्रुत माहिती (व त्याचे लेखही)http://www.francoisgautier.com या वेबसाइटवर आहे. त्यातील त्याचे लेख वाचले कि त्याची विचारधारा कळते. तो कट्टर हिंदुत्ववादी असुन दलित व इस्लामविरोधात आहे. महात्मा गांधींबद्दल संघाला असेल नसेल तेवढा द्वेष याच्या मनात भरलेला आहे हे स्पष्ट होते. याची स्वत:ची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची योग्यता नाही, म्हणजे त्याच्या मागे कोणत्या फ्यसिस्ट शक्ती उभ्या आहेत हे शोधणे क्रमप्राप्त ठरते.

बहुजनीय महात्म्यांना असे नाही जमत तर तसे संपवा असा नवा उद्योग गेली अनेक शतके सुरु आहे. लेनमार्फत शिवाजी महाराजांचे पित्रुत्व हिरावण्याचा घाट घातला गेला होता...आता त्यांचे कर्तुत्व हिरावण्याचा घाट घालण्यात आला आहे ही अत्यंत नेषेधार्ह घटना आहे. शिवाजी महाराज पुज्य आहेत त्याचा असा अर्थ नाही कि त्यांना देवत्व देत कर्मकांडांच्या बंदिस्ततेत अडकवावे. हा अधिकार यांना कोणी दिला? या मागे कोण आहेत? ते मानव होते...त्यांच्यात महत्ता होती आणि त्यांचे अनुकरण होवु शकते. एकदा देवत्व दिले कि शिवाजी महाराजांच्या एकाही पराक्रमाला खरा अर्थ रहात नाही, कारण ती दैवी घटना बनते. मानवी प्रयत्नांचे खरे महात्म्य संपते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे या गोतियेक्रुत मंदिराचा, शिवाजीमहाराजांना देवत्व देण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणुन पाडला पाहिजे...नाहीतर मंदिर होईल, तेथे पुजारी...बडवे रुजु होतील, पुजा...नवस सायास सुरु होतील...अकराव्या अवतारात त्यांची गणना करुन टाकत नवे पुराण लिहिले जाईल...

माणसाची मानवी आदर्शे घेत परिस्थितीशी झुंझण्याची प्रेरणाच नष्ट होईल!

शिवाजीप्रेमींना तरी हे नक्कीच समजावे...आणि हा गोतिये... त्याचा आणि त्याच्या सर्वच हितचिंतकांचा निषेध करावा ही अपेक्षा...!

------संजय सोनवणी

6 टिप्पणी(ण्या):

हेरंब म्हणाले...

च्यायला या माणसाला चांगलं काही दिसतच नाही !! सगळं जग जणु एखाद्या जातीच्या लोकांच्या विरुद्ध उभं आहे असं चित्र निर्माण करायचं उठसुठ. अरे जरा तरी लाज वाटून घ्या भावांनो !!

अनामित म्हणाले...

weda aahe ha.....

Herab tumchya matashi sahamat

Mayur म्हणाले...

copied from misalpav.com :
आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून...........

कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी.

महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत.
माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार...

उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे. महाराज दिवाळी साजरी करीत असताना ही त्यांच्या आसनाखाली टोपली भरून फटाके ठेवते, म्हणजे इतर कोणी फटाके लावले की त्या टोपलीचा मोठा स्फोट होईल....आणि फटाक्याच्या दारूची लाईन तिथपासून समोर लावल्या जाणार्‍या अनार पर्यंत असते (म्हणजे एखाद्या सिनेमात पेट्रोल काडी टाकून पेटवतात आनि त्याची लाईन जळत जाऊन पुढची गाडी वा घर जळते ...तसे टेक्निक !). हा खानही तिथे पाहुणा म्हणून आलेला असतो. मग एकदा राजे, तर एकदा खान त्या आसनवर बसतात .. नेमके स्फोटाच्या वेळी कोण बसलेले असणार्...हा टिपिकल क्लायमॅक्स्...शेवटी खान बसलेला असताना ती दारू पेटत जाते...आणि तीच बाई घागरभर पाणी ओतून पुढचा अनर्थ टाळते. (आणि महाराजांची शाबासकी मिळवते)
(२) हीच बाई सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरेंमधे अनेक गैरसमज - भांडणेही लावत असते (सास बहू स्टाईल)
(३) जिजाबाईंची व्यक्तिरेखासुद्धा सास बहू स्टाईल आहे. त्या आपल्या सुनांना "करम जली" वगैरे म्हणताना दाखवल्या आहेत.
(४) शिवाजी अजून "बाल शिवाजी" आहे ... पण जिजाऊ एकदम वयस्कर आहेत...

मी आजपर्यंत दोनच भाग पाहिले. एका क्षणाचाही आपण सर्वांना माहीत असलेल्या शिवचरित्राशी ताळमेळ लागत नाही. अत्यंत "डिस्टॉर्टेड" असे सारे काही दाखवले आहे.....पुढचा भाग पहायची इच्छा आणि धाडसही झाले नाही.

अशा मालिकांना मान्यता कशी काय मिळू शकते ? आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल काय ?


वाजी आणि सोयराबै यान्ची भेटही अशीच फिल्मी पद्धतीने दाखविण्यात आलेली आहे.... एका कुठ्ल्याश्या "मेल्या"त की बाजारात सोयरा आपल्या मयतरीनीबरोबर हिन्डत असताना एका जोतिषाला हात दाखवून भविष्य विचारते.. तेव्हा तो एक ज्योतिषी तिला सान्गतो, की" तुझं लग्न राजघराण्यातच्च होणार आहे.. आणि तुला पुढे "महाराणी" वगैरे बनण्याचे चान्सेस आहेत.." इ. इ. ते भविष्य ऐकून झाल्यावर सोयरा त्या (भटुरड्या ) ज्योतिषाला पैसे / दक्षिणा/ मुद्रा न देताच तिच्या मयतरेनीबरोबर पळ्ळ काढते... आणि तिच्या मागे तो जोतिषी "मेरी दक्षिणा... मेरी दक्षिणा.." करत येतो...

इकडे शिवाजी आणि त्यान्चे सहकारी शत्रूला चुकवत असताना बाजारात वाट शोधत असतात.. आणि शिवाजी - सोयरा एकमेकांना येऊन धडकतात...आणि धडकल्याबद्दल एकमेकान्ना थोडेफार "कर्सिन्ग" करतात... ("नीट चालता येत नाही का" वैग्रे) Smile आणि मग काही एपिसोडनन्तर त्यान्चे एकमेकान्बरोबर लग्न ठरत असताना.. दोघान्चेही एक्स्प्रेशन वेगवेगळे असतात...

he lok apalech ahet ... yanche kay karnar?

भुरटा म्हणाले...

बरोबर आहे आपण जागे झालेच पाहिजे

Vijay म्हणाले...

Shivaji na dev karun taka mhanaje, tyanche karya kartuvta aapoappach devalat band hote. Bhatani hya lekhache khup manala lawun ghetalele disate.

Prathamesh Patil म्हणाले...

सनातनी मनोवृत्तीशी लढा देताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे ह्या ब्राह्मणशाहीने हजारो वर्षे अनेक वेगवेगळ्या वैचारिक आक्रमणाशी टक्कर दिली आहे. बौद्ध धर्माने तसेच जैन धर्माने काही शतके लढा दिला. परंतु अखेर त्यांचा पराभव झाला. ह्याचे मुख्य कारण हे आहे की ब्राह्मणशाहीने प्रत्येकवेळी समाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या वर्गांना आपल्या ताब्यात ठेवले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपोआपच ब्राह्मणशाही बलवान झाली. जोपर्यंत राजसत्तेचे पाठबळ असते तोपर्यंतच धर्माचा प्रभाव टिकतो. म्हणून जर यांच्याशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर प्रथम राज्यकर्त्या वर्गाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
शिवाजी महाराजांपासूनच्या इतिहासावर जरी नजर टाकली तरी हेच चित्र दिसते. त्यांच्या काळात शेतकरी सुखी होते, स्त्रियांची अब्रू सुरक्षित होती, गुलामी बंद झाली होती, समाजात आत्मविश्वास निर्माण होत होता. त्यानंतर पेशवाईच्या काळात नेमकी उलट परिस्थिती होती. दोनशे वर्षांनी परत एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात शूद्रांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. समाजात नवीन विचारांचे वारे वाहू लागले. पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर परत चळवळ थंडावली. आंबेडकर जरी शूद्रांना राजकीय हक्क मिळवून देऊ शकले तरी राज्यकर्त्या वर्गाची मानसिकता बदलण्यात त्यांना यश आले नाही किंवा शूद्रांना ते खऱ्या अर्थाने राज्यकर्ते बनवू शकले नाहीत. आता पुढच्या पिढ्यांनी हाच वारसा घेऊन राज्यकर्ते होण्याची आकांक्षा ठेवली तरच या देशात खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल. भारतीय समाजाची खरी शोकांतिका हीच आहे की मानसिक गुलामीमध्ये जखडले जाण्यास त्यांना फारसा वेळ लागत नाही पण त्यातून बाहेर पडायला मात्र अनेक शतके लागतात. म्हणून शुद्रांची मानसिकता अशा प्रकारे बदलणे गरजेचे आहे की ब्राह्मणशाहीला त्यांना वैचारिक गुलामीमध्ये जखडून ठेवणे अशक्य झाले पाहिजे आणि त्यांच्या इच्छाशक्तीपुढे राज्यकर्ते झुकले पाहिजेत.
शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जी ठिणगी टाकली होती त्यातून फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी वणवा पेटवला. आता वैचारिक भूकंप घडवून आणून ब्राह्मणशाहीच्या जुनाट मनोऱ्याला हादरे देऊन तो पाडून टाकण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes