सोमवार, नोव्हेंबर ०७, २०११

वेदा आधी तू होतास...

वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे  ‘  ऋचा 
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.
-----------
बाबूराव बागूल

4 टिप्पणी(ण्या):

Hindushakti म्हणाले...

या कवितेत वेदांच्या बरोबरीने कुराण आणि बायबल हे शब्द घालून पोस्ट करून दाखवा. म्हणजे आधुनिक धर्मनिरपेक्ष भारताचे दर्शन त्यातून घडेल.

Admin म्हणाले...

या कवितेत वेदांच्या बरोबरीने कुराण आणि बायबल हे शब्द घालून पोस्ट करून दाखवा.>>

हिंदु शक्ती,
तुम्ही प्रेषित हा शब्द कधी वाचलेला दिसत नाही वाटं. नायतर असा प्रश्न केलाच नसता.

-----------
एम. डी. रामटेके.

अनामित म्हणाले...

या प्रेषितांच्या यादीत बुद्ध आहे का?

Vikas म्हणाले...

प्रेषिटच्या यादीत बुद्ध नाही कारण बुद्ध हे प्रेषित नावते तर सामन्या माणूस होते.............त्यांचा चमत्कारवर विश्वास नव्हता.......त्यानी स्वर्ग नाकारले, नरक नाकारला ,देव आणि मूर्ती पूजा पण नाकारली आणि अर्थातच वेद पण नाकारले..............बुद्ध हे एक मीरा आणि तत्वदण्ानी होते की ज्याना जगण्याचा खरा अरता कळला होता आणि तो त्यानी जगाला सांगून लोकांची धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयातना केला..............

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes