शनिवार, नोव्हेंबर १९, २०११

रेणुका, कार्तवीर्य आणि कर्ण यांच्यावर परशुरामाकडून अन्यायच....

हा परशुराम होता तरी कोण ? हा यशवंत रायकर यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रिया वाचली. धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे. मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. त्यात रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्

शनिवार, नोव्हेंबर १२, २०११

भारतातील पहिल्या महिला संपादिका : तानुबाई बिर्जे

कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद 1906 ते 1912 या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या संपादिका ठरल्या. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तानुबाईंची ही ओळख..

बुधवार, नोव्हेंबर ०२, २०११

प्रस्थापित व्यवस्था, क्रांती आणि क्रांतीचे प्रणेते : एक प्रतिक्रिया

सह्याद्री बाणा वर प्रसिद्ध केलेल्या समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा या लेखावर Jidnyasu यांनी खालील प्रतिक्रिया दिली होती. आजपर्यंत अनेकांनी शिव्या देत, असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अशापैकी एक अतिशय सभ्य आणि छान प्रतिक्रिया आणि त्यावर माझे स्पष्टीकरण....

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes