गुरुवार, सप्टेंबर २२, २०११

23 टिप्पणी(ण्या):

Rahul Sable (Patil) म्हणाले...

Yeshwantrao holkar हे योद्धा होते त्यांच्या पराक्रमाचा आदर आहे. पण त्यांची तुलना शिवरायांशी नको. छत्रपती शिवाजी राजे हे एकमेव उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांची तुलना होळकर शिंदे कुणाशीच करू नये. रयतेसाठी राज्य उभे करारे शिव - शंभू राजे कुठे व आपला वारसा हक्क इंगाजांनी नाकारला म्हणून सत्तेसाठी इंग्रजांना आव्हान देणारे होळकर किंवा लक्ष्मिबाइ झाशीवाली हे कुठेही बसू शकत नाही. होळकर यांच्याविषयी आदर आहे पण तुकोजी होळकर याने सईबाईंच्या समाधीवर कुत्रा बसवला व एका मुसलमान मुलीला पळविण्याच्या आरोपाखाली इग्रजांनी शिक्षा दिली म्हणून देश सोडून पळाला व आपले पूर्ण आयुष्य विदेशात घालवून शेवटी तेथेच मृत झाला.
अहिल्याबाई होळकर ह्या खूप मोठ्या होत्या त्यांचे कार्य महान आहे, पण हे येशवंत तुकोजी ची तुलना महाप्रतापी छात्रापातींबरोबर करू नका एवढेच सांगतो.
Jai Mulnivasi.

Sunny. A म्हणाले...

Jai Rashtriya Samaj,

" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला

महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला

नव इतिहासाचा नवा सत्य दाखला

अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...

यशवंतराव होळकर बोला,

चांगभल बोला !!!!! "

-- शाहीर अमर शेख

जय शिवाजी ! जय यशवंत !! जय तुकोजी !!!! जय अमर !!!!!

प्रकाश पोळ, कराड. म्हणाले...

छ. शिवराय आणि शंभूराजे एकमेवाद्वितीय होते आणि राहतील. शिवारायांच्या कार्याचा आणि विचारांचा समस्त बहुजन समाजाला अभिमान आहे. म्हणूनच शिवरायांचे नाव जरी घेतले तरी आपली मान आदराने झुकते. यशवंतराव होळकर हे शिवरायांच्या स्वराज्य विचारांचेच प्रणेते होते. दुर्दैवाने यशवंतराव यांचा इतिहास जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आला. जातीवादी भूमिकेतून इतिहास लेखन करणाऱ्या नतदृष्ट लोकांनी यशवंतरावाना माथेफिरू ठरवले. त्यांच्यावर पुणे जाळल्याचा आरोप केला गेला. आज यशवंतराव होळकर यांच्याबद्दल कुणालाच फारशी माहिती नाही. तत्कालीन संस्थानिकांनी कोणतीही मदत न करताही यशवंतराव स्वराज्य उभे करण्यासाठी झटत होते. आपले वारसा हक्क नाकारले गेले म्हणून १८५७ चा उठाव करणाऱ्या स्वार्थी संस्थानिक टोळक्यात होळकर सामील झाले नव्हते हे आपण ध्यानात घ्यावे. आणि होळकरांच्या या भूमिकेमुळे महात्मा फुल्यानीही त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे होळकर आल्या स्वार्थासाठी जगत/झटत होते हा हे आपले म्हणणे वास्तवास धरून नाही.
यशवंतराव होळकर यांचा बहुमान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आम्ही आमच्या पद्धतीने ते पार पडत आहोत. आम्हाला शिवराय, शंभूराजे, मल्हारराव, यशवंतराव या सर्वांबद्दल आदर आहे. आणि तो कायम राहील. यात कुणाचीही बदनामी किंवा तुलना केलेली नाही हेही ध्यानात घ्यावे.

प्रकाश पोळ, कराड. म्हणाले...

होळकर यांच्याविषयी आदर आहे पण तुकोजी होळकर याने सईबाईंच्या समाधीवर कुत्रा बसवला व एका मुसलमान मुलीला पळविण्याच्या आरोपाखाली इग्रजांनी शिक्षा दिली म्हणून देश सोडून पळाला व आपले पूर्ण आयुष्य विदेशात घालवून शेवटी तेथेच मृत झाला.
अहिल्याबाई होळकर ह्या खूप मोठ्या होत्या त्यांचे कार्य महान आहे, पण हे येशवंत तुकोजी ची तुलना महाप्रतापी छात्रापातींबरोबर करू नका एवढेच सांगतो..>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आजपर्यंत बहुतांशी इतिहासाचे जातीनिष्ठ लेखन करण्यात अनेकांनी धन्यता मानली आहे. बहुजन समजतील अनेक महापुरुषांचे विकृत चित्रण कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट या माध्यमातून केले गेले आहे. आजपर्यंत संभाजी राजानाही व्यसनी आणि स्त्रीलंपट म्हणून रेखाटले गेले होते. साडेतीनशे वर्षे या महामानवाचा इतिहास बदनाम स्वरूपातच आपण वाचत राहिलो. आता संभाजी राजे कलंकित इतिहासातून मुक्त झाले आहेत कारण नव्या दमाच्या बहुजन इतिहास संशोधक आणि वा. सी. बेंद्रे यांचेसारखे चिकित्सक इतिहास अभ्यासक यांनी संभाजी राजांचा खरा इतिहास बाहेर काढला आहे. तोच प्रकार यशवंतराव होळकर यांच्याबाबतीत झाला आहे. आता यशवंतराव होळकर यांच्या बदनामीचे सत्यशोधन करणे हे आमचे कर्तव्य आहे. इथून पुढे या महान व्यक्तीचा चिकित्सक इतिहास समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. कुत्र्याच्या समाधीचा आपण केलेला उल्लेख आणि मुसलमान मुलीला पळवण्याचा प्रकार यामागची खरी कारणे लवकरच समोर येतील. आपण जे काही म्हणत आहात त्याला योग्य संदर्भ दिले असते तर बरे झाले असते. मोघम बोलून महान व्यक्तींवर चिखलफेक करू नका.

Rahul Sable (Patil) म्हणाले...

हा घ्या संदर्भ http://www.indiankanoon.org/doc/582073/ तुका होळकर याच माणसाने मुमताज चा खून केला. हा माणूस स्वतःला इंदोर चा महाराजा आहे म्हणून माझ्यावर केस चालवायचा अधिकार नाही माझे न्यायदान मीच करतो असा मुर्खासारखा युक्तिवाद करीत होता, जेव्हा न्यायालयाने ह्याला शिक्षा सुनावली तेव्हा हा देश सोडून पळून गेला गादीवरून काढून टाकण्याचा अधिकार इंग्रज सत्तेनं वापरण्याच्या आधीच त्यांनी गादीचा त्याग केला आणि युवराज यशवंतराव त्यांच्या जागी गादीवर आरूढ झाला. हा माणूस पुढे अमेरिका - फ्रांस असा फिरत राहिला. देश स्वतंत्र झाला तरी तुका होळकर परत कधी परतला नाही. शेवटी २१ मे १९७८ ला प्यारीस (फ्रांस) येथे मरण पावला. कुठे सुभेदाराच्या सुनेला आदराने वागवणारे राजे आणि कुठे हा हलकट स्त्रीलंपट संस्थानिक. जय शिवराय !

Rahul Sable (Patil) म्हणाले...

अधिक माहितीकरता गुगल वर bawla murder case Emperor vs Ranchhod Bawla असे सर्च करा.

Sunny.A म्हणाले...

@ Rahul Sable (Patil),

सर्व प्रथम वरील लेख कोणासाबंधी व कशासाठी आहे, हे समजून न घेता विषय सोडून, आपण दुसरा विषय ( जे की तुम्हाला हवे होते, आणि ते आपण आणले हि... ) आणून टीका करणे, तुलना करणे, फुट पाडणे, शिव्या घालणे, तेड निर्माण करणे, विषमता निर्माण करणे हेच आपले मूळ हेतू आहे, हे मात्र नक्की दिसून आले आणि आपण केलेला Jai Mulnivasi हा किती मर्यादित - संकुचित आहे, याचेही दर्शन झाले.

वास्तविक लेखात कुठेही तुलना नाही, हे आपणास सुद्धा चांगले माहित आहे.... आपण पुनः एकदा वरील लेख वाचावे ....लेखाचा मूळ अर्थ समजून घ्यावे. पण तुम्हालाच तुलना हवे आहे आणि आपण ते केले हि आहे, शिव - शंभू राजे कुठे व हे येशवंत तुकोजी असे करून....

हे येशवंत तुकोजी ची तुलना महाप्रतापी छात्रापातींबरोबर करू नका एवढेच सांगतो. रयतेसाठी राज्य उभे करारे शिव - शंभू राजे कुठे व आपला वारसा हक्क इंगाजांनी नाकारला म्हणून सत्तेसाठी इंग्रजांना आव्हान देणारे होळकर किंवा लक्ष्मिबाइ झाशीवाली हे कुठेही बसू शकत नाही >>>>
यासारख्या वाक्यातून / शब्दातून होळकरांविषयी तुमचे काय मत आहे, हे हि चांगलेच दिसून आले . पण हे हि तुमचे दुखणे नाही, तुमचे दुखणे काय आहे ? व कशासंबंधी आहे ? हे तुम्हासहि व आम्हासही चांगले ठावूक आहे....

महाराज यशवंतराव होळकरांचा 200 वा स्मृतिदिन लवकरच येत आहे.... आपण कशासाठी जळत आहात व आपले पोट कशासाठी दुखते आहे, हे मात्र आम्ही नक्की हेरले आहे.

----------------

...असे करून, किती हि फुट पाडा...तेढ निर्माण करा ... मुखवटा घालून विषमता आणण्याचा प्रयत्न करा ... असे विष ओतण्याचे / कालवण्याचे काम करणाऱ्यास बस आम्ही एव्डेच सांगू इच्छितो की, असे कुटील डाव / घाणरडे खेळ खेळणारे .... मग तो कोणी हि असो, त्यांचा हा डाव आम्ही हाणून पडणाराचं...आम्ही समता आणणारचं !

Rahul Sable (Patil) म्हणाले...

तुका होळकर सारख्या क्रिमिनल माणसे महान होती असे तुम्ही कसे म्हणता ? मी समतेच्या विरोधात नक्कीच नाही. समता हि आलीच पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे असे मी आधीच सांगितले आहे, पण खून खटल्यात आरोपी असणाऱ्या लोकांना महान का म्हणावे. यशवंत होळकर दोन होते. एक तुका होल्कारचा मुलगा, जो १९२५ वर गादीवर आला. हे येशवंत होळकर आधीचे, ते इग्रजांच्या विरोधात लढले ते चांगलेच आहे, पण लक्ष्मि बाई किंवा होळकर हे जनतेसाठी लढलेले लोकक नाहीत. जोपर्यंत त्यांचे राज्य शाबूत होते तोपर्यंत संथानिकांनीच इग्रजाजांना मोठे केले. इंग्रज चांगले नाहीत हे शिवाजी महाराजांनीच पूर्वीच ओळखले होते, म्हणून त्यांनी भक्कम आरमार उभे केले. पण हे हलकट संस्थानिक जेव्हा त्यांच्या सनदी रद्द झाल्या / दत्तकविधान नमन्जूर झाले तेव्हा इग्रजांच्या विरोधात उतरले म्हणजे त्यांचा लढा स्वार्थाचा होता कल्याणाचा नाही. शिवरायांचे राज्य हे जनतेचे राज्य होते तर संस्थानिकांचे (यात सर्वच आले, फक्त होळकर नाही) हे स्वार्थासाठी माजलेल्या धनाढ्य वंश्पार्म्पारागत हल्कातांचे राज्य होते.

Rahul Sable (Patil) म्हणाले...

तुका होळकर सारख्या क्रिमिनल माणसे महान होती असे तुम्ही कसे म्हणता ? मी समतेच्या विरोधात नक्कीच नाही. समता हि आलीच पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे असे मी आधीच सांगितले आहे, पण खून खटल्यात आरोपी असणाऱ्या लोकांना महान का म्हणावे. यशवंत होळकर दोन होते. एक तुका होल्कारचा मुलगा, जो १९२५ वर गादीवर आला. हे येशवंत होळकर आधीचे, ते इग्रजांच्या विरोधात लढले ते चांगलेच आहे, पण लक्ष्मि बाई किंवा होळकर हे जनतेसाठी लढलेले लोकक नाहीत. जोपर्यंत त्यांचे राज्य शाबूत होते तोपर्यंत संथानिकांनीच इग्रजाजांना मोठे केले. इंग्रज चांगले नाहीत हे शिवाजी महाराजांनीच पूर्वीच ओळखले होते, म्हणून त्यांनी भक्कम आरमार उभे केले. पण हे हलकट संस्थानिक जेव्हा त्यांच्या सनदी रद्द झाल्या / दत्तकविधान नमन्जूर झाले तेव्हा इग्रजांच्या विरोधात उतरले म्हणजे त्यांचा लढा स्वार्थाचा होता कल्याणाचा नाही. शिवरायांचे राज्य हे जनतेचे राज्य होते तर संस्थानिकांचे (यात सर्वच आले, फक्त होळकर नाही) हे स्वार्थासाठी माजलेल्या धनाढ्य वंश्पार्म्पारागत हल्कातांचे राज्य होते.

अनामित म्हणाले...

Divide and rule is the ONLY WAY to rule

Sunny.A म्हणाले...

@ Rahul Sable (Patil)

होळकर घराण्यात अनेक यशवंत, तुकोजी झाले आहेत....आम्ही येथे ( प्रथम ) महाराज यशवंतराव होळकर (१७७६-१८११ ) बद्दल चर्चा घडवून आणत आहे....पण आपण वारंवार कारण नसतानाही, सारखे तुकोजी होळकर का करीत आहात.... पुनः एकदा सांगत आहे की, येथे महाराज यशवंतराव होळकर हा विषय आहे .

आम्ही शिव फुले आगरकर शाहू आंबेडकर विचारांना मानणारे आहोत. महाराज यशवंतराव होळकर-प्रथम (१७७६-१८११) यांनी इंग्रज फ्रेंच या परकीय राजवटी विरुद्ध युद्ध पुकारले. त्यांना रणांगणावर पराभूतही केले. हा देश एक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. अशा महाराज यशवंतराव होळकर संबंधी हा विषय आहे.

आणि....
संस्थानिकांचे (यात सर्वच आले, फक्त होळकर नाही) हे स्वार्थासाठी माजलेल्या धनाढ्य वंश्पार्म्पारागत हल्कातांचे राज्य होते >>>>
हे तुम्ही असे कसे म्हणू शकता ?

स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आमच्या शिवरायांची ही बदनामी केली होती. शंभू राजांची ही बदनामी केली होती. याच प्रकारे महाराज यशवंतराव होळकर यांची बदनामी तर केली जात नाही ना ? यांचा शोध सदर लेखा द्वारे केला जात आहे. अशा वेळी आपल्या सारख्या विचार करणाऱ्या माणसांचा पाठींबा अपेक्षित असताना, आपण पुन्हा पुन्हा विषयांतर का करीत आहात.

Sanjay Sonawani म्हणाले...

@ Rahul, पहिली गोष्ट म्हनजे तुकोजीरावांना आरोपी बनवलेले नव्हते. ज्यांनी मुमताजचा खुन केला त्यापैकी दोघांना फाशी तर दोघांना जन्मठेप झाली होती. या संपुर्ण खटल्यात तुकोजीरावांना साध्या साक्षीसाठीही बोलावलेले नव्हते. दुसरे असे कि यशवंतरावांची तुलना शिवाजी महाराजांशी का करु नये? यशवंतरावांना इंग्रजांनी वारसा नाकारला म्हणुन त्यांनी इंग्रजांशी युद्ध केले हे आपले म्हनने निव्वळ अद्न्यानाधारित आहे, कारण तेंव्हा मुळात इंग्रजांचे राज्य यायचे होते. ते आले ते दौलतराव शिंद्यांच्या स्वार्थलोलुपतेमुळे आणि दुस-या बाजीरावाच्या नालायकीमुळे. तेंव्हाच इंग्रजांचा धोका ओळखुन त्यांनी शिंदे व भोसलेंना एकत्र येवुन इंग्रजांशी निर्णायक लढा द्यायची तयारी केली होती...पण एप्रिल १८०३ मद्धे दौलतराव शिंद्यांनी यशवंतरावांचा पुन्हा विश्वासघात केला व मसलत फसली...आणि हे शिंदे-भोसले इंग्रजांचे चाकर बनले. शेवटपर्यंत इंग्रजांशी लढुन आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा सा-या भारतातील एकमेव राजा म्हनजे यशवंतराव. शिवाजी महाराजांशी तुल्ना अशासाठी कि यशवंतरावांनी पेशव्याने व शिंद्याने गिळलेले, संपवलेले राज्य पुन्हा त्यांनी भिल्ल-पठाणांच्या जोरावर जिंकले आणि वैदिक राज्याभिषेक करुन घेतला....अगदी शिवरायांप्रमाणेच. त्यांनी जेवढे इंग्रजांचे पराभव केले कि लोर्ड वेलस्ली ते जनरल लेक त्यांना हादरुन असत. वरील लेखात ज्या तुकोजींचा उल्लेख आहे ते यशवंतरावांचे वडील...आता तिस-या तुकोजीराजांना तुम्ही अकारण क्रिमिनल म्हनत आहात...मग सातारकर जेंव्हा खुनाच्या आरोपात असतात त्याला आपण काय म्हणाल? तुलना करतांना साधक बाधक विचार करावा व मुळ विषयाशीच संबंधित निकोप चर्चा व्हावी ही अपेक्षा प्रकाश पोळ यांची आहे. धन्यवाद.

Rahul Sable (Patil) म्हणाले...

सातारकरांवर कोणत्या खुनाचा आरोप झाला आहे ? त्याचा कृपया संदर्भ द्या. बाकी मुद्यांवर नंतर चर्चा करूच. माझा विरोध यशवंत होळकर यांचा अपमान करणे नव्हता, पण शिवराया मागे होळकर 'फक्त एकला' हे आगाऊ वाटले. चूक असेल तर सोडून द्या. शिवरायांचा वारसा आजकाल हल्ली कुणीही सांगतो, पण शिवराय एकटे होते. बाकी नंतर अनेक महान लोक महाराष्ट्रात झाले व तेही मूल्यवान आहेत.

SACHIN SHENDGE म्हणाले...

१७ व्या शतकात मुगल साम्राजापासून किती धोखा आहे हे ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जसे एकमेव होते अगदी त्याचप्रकारे १९ व्या शतकात ब्रिटीश साम्राज्यापासून भारताला किती धोखा आहे हे ओळखणारे महाराजा यशवंतराव होळकर हे एकमेव होते. शेवटपर्यंत मुगलाशी लढुन आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा सा-या हिदुस्तानातील एकमेव राजा म्हनजे शिवराय आणि शेवटपर्यंत इंग्रजांशी लढुन आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा सा-या भारतातील एकमेव राजा म्हनजे यशवंतराव.

Sunny.A म्हणाले...

@ Rahul

.....तुम्हांस उत्तर मिळाले आहे....

लेख, कमेंटस जरा पुन्हा एकदा वाचावे / तपासावे ..... आणि पुनः एकदा सांगत आहोत जे की तुम्हांस आगावू वाटते, ते शाहीर अमर शेख यांचा पोवाडा आहे आणि त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. इकडचे - तिकडचे असे करून गोंधळ वाढवू नये !

प्रकाश पोळ, कराड. म्हणाले...

राहुल साबळे-पाटील -
" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! " हा शाहीर अमर शेख यांचा पोवाडा आहे. त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहिले आहे. यशवंतराव होळकर यांचा उपेक्षित इतिहास पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे. शिवारायांसारखा महान कर्तुत्ववान माणूस पुढील काळात जन्माला येणार आहे हे जर शिवरायांना माहित असते तर त्यांना सुद्धा किती आनंद झाला असता. पण आपण भारतीय असे नतदृष्ट कि व्यक्तीपुजेत इतके गढून जातो कि त्या व्यक्तीचे मूळ विचार कार्य सर्व काही विसरून जातो. शिवरायांचे विचार कधी अंमलात आणणार नाही, पण शिवाजी महाराज म्हटले कि छाती काढून जय म्हणणार. शिवारायंची जयंती आम्ही न चुकता साजरी करू, परंतु त्यांच्यावरील बदनामीचे, अपमानाचे दाग धुवून काढण्यासाठी प्रयत्न करणार नाही. आणि कुणी एखाद्या महान व्यक्तीचे शिवरायांशी साम्य दाखवले कि तुलना केली म्हणून बोंब ठोकणार...साम्य आणि तुलना याचा फरक लक्षात घ्या...शिवराय श्रेष्ठ कि यशवंतराव अशा अर्थाने कुणीही कुठेही काहीही लिहिलेले नाही. यशवंतरावाचे कार्याची खरी ओळख करून देण्यासाठी त्यांना शिवरायांशी साम्य दाखवले आहे शाहीर अमर शेख यांनी.
आणि आपण प्रथम यशवंतराव पहिला, दुसरा, तुकोजी पहिला दुसरा या सर्वांचा कार्यकाल आणि चरित्र यांचा अभ्यास करावा. आम्ही यशवंतराव पहिले यांच्याबद्दल बोलत असताना आपण नाहक शेवटच्या तुकोजींचा विषय काढून मूळ विषयाला बगल दिले. परंतु ठीक आहे, आपला तो हेतू असेल तरी काही हरकत नाही. परंतु स्वतःची खरी ओळख दिली असती तर बरे झाले असते.
तुकोजी (शेवटचे) यांच्याबद्दल आपला जो आक्षेप आहे त्याला संजय सोनवणी सारणी उत्तर दिलेच आहे.
आता आपला दुसरा आक्षेप आहे कि होळकर स्वार्थी होते. एकीकडे आपण म्हणता कि होलकरांबद्दल आदर आहे आणि दुसरीकडे आपण म्हणता, “पण लक्ष्मि बाई किंवा होळकर हे जनतेसाठी लढलेले लोकक नाहीत. जोपर्यंत त्यांचे राज्य शाबूत होते तोपर्यंत संथानिकांनीच इग्रजाजांना मोठे केले.” >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>यशवंतराव होळकर अखेरपर्यंत इंग्रजांशी संघर्ष करत होते. सर्व संस्थानिकांना एकत्र करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्नही केले, परंतु इतर अनेक संस्थानिकांनी त्यांना दाद दिली नाही. १८५७ च्या उठवपासूनही होळकर अलिप्त राहिले होते, कारण १८५७ चा उठाव प्रामुख्याने उच्चवर्णीय जमीनदार, सावकार आणि स्वार्थी संस्थानिक यांचा होता. होळकरांच्या या भूमिकेचे महात्मा फुल्यांनी कौतुक केले आहे हे आपण लक्षात घ्यावे.

SACHIN SHENDGE म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
SACHIN SHENDGE म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
SACHIN SHENDGE म्हणाले...

राहुल त्या काळात मनुवादयानी केवळ महाराजा तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी केली नाही असे नाही तर छत्रपती शाहू महाराज यांची सुद्धा बदनामी करण्यासाटी काही अफवा उटवलया किंवा आरोप सुधा केले होते पण त्यांचावरील आरोप काही सिद्ध झाले नाहीत. मनुवाद्याविरुद्ध समस्त बहुजन समाज एकत्र यावा यासाटी शाहू महाराज यांनी स्वत:च्या पुतणीचा विवाह तुकोजीराव होळकर यांचा मुलगा म्हणजे यशवंतराव होळकर यांच्याशी शाहू महाराजांनी करून दिला. जर तुकोजीराव होळकर खरेच वाईट असते तर शाहू महाराज यांनी असे केले असते का?
आणखी एक गोष्ट म्हणजे महाराजा तुकोजीराव होळकरांचे शिवराय प्रेमींवर अन्य अनंत उपकार आहेत. रायगडावरील शिव-स्मारक व वाघ्याचे स्मारक तुकोजीराव होळकर यांच्या देणगीतुन झाले आहे. श्री, क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली पहिले गद्य शिवचरित्र सिद्ध केले. पण या प्रकरणात त्यांना रु. २०,०००/- चे कर्ज झाले. हे कर्ज छत्रपतींच्या वारसदारांनी नव्हे तर खुद्द तुकोजी होळकरांनी फेडले...एवढेच नव्हे तर त्याचे अनेक भाषांत भाषांतर करवून घेवुन जवळपास ४५०० प्रती जगभरच्या ग्रंथालयांना पाठवल्या. एखादी वाईट व्यक्ती असे सामाजिक कार्य करेल का? उलट त्यांना उत्तरेतील स्थानिक लोक त्यांच्या दानशूर पनाबद्दल त्यांचा आदर करतात. त्यामुळे मनुवाद्यानी तयार केलेल्या अफवास बळी पडू नकोस.

मराठा म्हणाले...

अतिशय चांगला लेख आहे.

हे कोण जे साबळे पाटील आहेत त्यांनी चर्चा करण्यासाठी कृपया "सह्याद्रीबाणा" च्या लेखकांशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधावा. कारण माझ्या मते सध्या सुरु असलेल्या "बहुजन तोडो" नीतीचा भाग म्हणून खोटया नावाने प्रतिक्रिया ते देत आहेत. बहुजन समाजातील बहुतेक पराक्रमी पुरुषांचा इतिहास हा जाणीवपूर्वक दडवण्यात आला किंवा विकृत करण्यात आला. म्हणून निकोप चर्चा आवश्यक आहे. आणि खरा इतिहास बाहेर येणे गरजेचे आहे.

तुकोजी होळकरांनी तो पुतळा बसविलेला नाही, पुढील लेख वाचा : http://wp.me/pVid4-at

आणि सोनवणी साहेब तुम्ही मराठ्यांच्यावर गरळ ओकण्याची एकही संधी सोडू नका आणि मराठा-बहुजन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत राहा. पण तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. कृपया सर्वांनी लक्षात घ्या कि साबळे पाटीलने मुद्दा उपस्थित केला ज्याचे उत्तर सोनवणींकडे "तयार" होते!

सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

वरील लेखात तुलना झालेली नाही तर शिवरायांचा जनकल्याणकारी वारसा समर्थपणे यशवंतरावांनी कसा चालवला हे सांगितले आहे. उगाच कोणी फाटे फोडू नयेत.

Rahul Sable (Patil) म्हणाले...

माझ्या बहुतेक शंकांचे समाधान झाले आहे. तरी काही बाकी आहेत. यशवंत होळकर - तुकोजी होळकर हे २-३ होऊन गेले याची कल्पना होती. पण पुतळा बसवणारे होळकर व खुन्प्रकारानातले होळकर एकाच आहे असा माझा समाज होता/आहे पण माझी माहितीत गल्लत आहे , हे मी कबूल करतो. श्री, क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली पहिले गद्य शिवचरित्र सिद्ध केले. पण या प्रकरणात त्यांना रु. २०,०००/- चे कर्ज झाले. हे कर्ज छत्रपतींच्या वारसदारांनी नव्हे तर खुद्द तुकोजी होळकरांनी फेडले...एवढेच नव्हे तर त्याचे अनेक भाषांत भाषांतर करवून घेवुन जवळपास ४५०० प्रती जगभरच्या ग्रंथालयांना पाठवल्या. हि नवीन माहिती मिळाली. चांगले वाटले. मी मधून मधून ब्लोग वाचतो नेहमी नाही. पण शिवराय हे मी दैवत समजतो व (कदाचित चुकीने ) त्यांची तुलना संस्थानिकांशी केल्यामुळे मी चिडल्यासारखा झालो. पण मला बहुतेक सर्व मुद्दे पटले. सोनवणी यांचा प्रतिसाद अभ्यासपूर्ण वाटला, पण त्याचे रेफरन्स कळले नाहीत. गुगलावरही फार काही मिळाले नाही. मी जातीयतेच्या उद्देशाने लेखन केले नाही. मला कोणताही चांगले कार्य करणारा व्यक्ती चांगला वाटतो व मी त्याचे कौतुक करतो. अहिल्याबीन्विषयी मी पहिलेच आदर व्यक्त केला. तरी मराठा यांच्या प्रतीसादाताबाबत वाईट वाटले. माझे नाव राहुल आहे याविषयी त्यांना शंका आहे, पण त्यांचे नाव मराठा नक्कीच नसावे, मग तुम्ही खोट्या नावानेच प्रतिसाद देता असे मी म्हणू शकतो. तुम्ही दिलेला रेफारांस्सुद्धा एका ब्लोग वरचा एक लेख आहे त्याला पुरावा कसे म्हणावे. प्रकाश, सोनवणी, सचिन, यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण होते . त्याबद्दल धन्यवाद. Jai Shivrai!

अनामित म्हणाले...

ch

अनामित म्हणाले...

झुंज कादंबरी वाचा

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes