शुक्रवार, ऑगस्ट १२, २०११

मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?

आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.

बुधवार, ऑगस्ट १०, २०११

'आरक्षण' चित्रपट आणि मेडीयाचा पक्षपात

दिनांक ८ ऑगस्ट २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टार न्यूज या वाहिनीवर आरक्षण या चित्रपटाच्या निमित्ताने 'नोकरीमध्ये आरक्षण असावे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रकाश झा, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सहभागी झाले होते. याच दिवशी आय. बी. एन. लोकमत वाहिनीवर 'आरक्षण चित्रपटाला विरोध योग्य आहे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा. हरी नरके (विभागप्रमुख- महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ), हेमंत देसाई (पत्रकार आणि समीक्षक), संजय पवार (लेखक), रामदास आठवले (अध्यक्ष- आरपीआय) आणि प्रकाश झा (चित्रपट निर्माता) इ. लोक सहभागी झाले होते. या दोन्ही चर्चा पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या चर्चांचे स्वरूप आणि विषय आरक्षणाबद्दल मनात किंतु ठेवून ठरवले गेले होते असे वाटते. 'आरक्षण' या बहुचर्चित चित्रपटाच्या वादावरून हे दोन्ही विषय चर्चेला आणले होते. परंतु या विषयांच्या ऐवजी 'आरक्षणाला किंवा मागास घटकांच्या विकासाला विरोध करणे योग्य आहे का ?' किंवा 'मागास समाजाची बदनामी चित्रपटाच्या माध्यमातून करणे योग्य आहे का ?' अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांना का करता येत नाहीत हा प्रश्नच आहे.

मंगळवार, ऑगस्ट ०२, २०११

क्रांतिसिंह नाना पाटील


क्रांतिसिंह नाना पाटील
सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.
क्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes