गुरुवार, जुलै १४, २०११

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुंबई मध्ये दादर, झवेरी बझार आणि ओपेरा हाऊस या ठिकाणी झालेल्या स्फोटाने अख्खी मुंबई हादरली. २६/११ च्या जखमा अजून ताज्या असतानाच दहशतवाद्यांनी मुंबईला पुन्हा टार्गेट केले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेक उद्योगांचे केंद्र आहे. मुंबईने करोडो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे. अशा मुंबईलाच आपल्या दहशती कारवायांनी छिन्न-विच्छिन्न करून टाकण्याचे मनसुबे दहशतवादी आखत आहेत आणि आपल्या दुर्दैवाने त्यांचे मनसुबे यशस्वी होतानाही दिसत आहेत.
धार्मिक भावना भडकावून त्याचा वापर समाजात दहशत माजवण्यासाठी करण्यात येतो. समाजातील विघ्नसंतोषी लोक काही लोकांच्या मनात असुरक्षिततेची, नैराश्याची भावना निर्माण करून, त्यांना कट्टर धर्मवाद शिकवून अशा कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. परंतु त्यात निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी जातो. काल मुंबईत झालेल्या स्फोटात १०-१५ जण ठार झाले. जवळ-जवळ दीडशे लोक जखमी झाले. अजून अशा पद्धतीने इतर ठिकाणी  घातपाती कारवाया करण्याचा डावही असू शकेल. त्यामुळे सारी मुंबई भीतीच्या छायेत वावरत आहे.
आज देशाला भ्रष्टाचार, दहशतवाद, महागाई या प्रश्नांनी अगदी जखडून ठेवले आहे. या प्रश्नातून योग्य तो मार्ग काढण्याची सरकारची प्रामाणिक भावना आहे का हा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण आजपर्यंत भारतात अनेक वेळा अनेक ठिकाणी दहशती कारवाया झाल्या. या कारवायासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा का होत नाही ? अफजल गुरु आणि अजमल कसाब इतके निर्घृण कृत्य करूनही अजून त्यांच्या फाशीचा निर्णय होत नाही. दहशत माजवणाऱ्याना जर कायदाच जरब बसवू शकत नसेल तर या दुर्दैवी घटना कशा थांबवायच्या ?
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात अनेक कारवायात असल्याचे अनेक वेळा उघड झाले. परंतु त्याबद्दल पाक वर काहीच कारवाई होऊ शकत नाही का ? अमेरिका पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान किंवा आणखी कुठेही सरळ घुसून दहशतवादी लोकांना मारू शकते तर अशी धडक कारवाई करताना भारताला का अडचण यावी ? अशी कारवाई करण्यासाठी तीव्र राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती अजून आपल्या सरकारकडे दिसत नाही. पकडलेल्या दहशतवाद्यांना शिक्षा करण्यात, त्याची अंमलबजावणी करण्यात आपण कमी पडतोय. त्याचा गैरफायदा हे दहशतवादी घेताना दिसत आहेत. कारण बॉम्बस्फोट करा, पकडले तर जेल मध्ये जा, आणि फाशीची शिक्षा झाली तरी तुरुंगात बसून आरामात दिवस काढा अशा पद्धतीने दहशतवादी या गोष्टींकडे बघत आहेत. आजघडीला जेल मध्ये किती दहशतवादी आहेत ? शिक्षा होऊनसुद्धा त्या शिक्षेची अंमलबजावणी का होत नाही ? या प्रश्नांची उत्तरे समाजाला मिळायला हवीत.
जोपर्यंत भारत सरकार खंबीर भूमिका घेवून दहशतवादी कारवाया आणि एकूणच दहशतवादाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करणार नाही तोपर्यंत या कारवाया सुरूच राहणार. कारण दहशती कारवाया झाल्या कि त्याचा संबंध पाक शी जोडला जाणार आणि पाकिस्तान तर अमेरिकेच्या पाठबळामुळे इतके शिरजोर बनले आहे कि ते या गोष्टींकडे कधीही गांभीर्याने पाहत नाहीत असेच आजपर्यंत दिसून आले आहे. भारताने वेळप्रसंगी अमेरिकेलाही खडसावले पाहिजे कारण अमेरिकेला दहशतवादाचा फटका बसला तर मात्र ते कडक भूमिका घेतात. आणि भारत मात्र अशी भूमिका घेवू शकत नाही, याचे कारण स्पष्ट आहे. अमेरिका पाकिस्तान ला पाठीशी घालत नसती तर भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची पाकिस्तानची हिम्मत झाली नसती. परंतु अमेरिकेसारखा बलाढ्य देश आपल्या पाठीशी असताना भारतच काय, कोणीही आपले काहीही वाकडे करू शकत नाही, हे पाकिस्तानला पक्के माहित आहे.
चांगुलपणा, उदारता ही नेहमी चांगलीच असते पण या चांगल्या गुणांचा अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणामही आपणाला भोगावे लागतात. अफजल गुरु, अजमल कसाब यांनी दहशती कारवाया केल्याचे सिद्ध होवून आणि त्यांना फाशीची शिक्षा होवूनही  ते अजून जेलमधेच आहेत हे कशाचे लक्षण आहे.
हे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी सरकार, नागरिक, पोलीस या सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सामान्य नागरिकांनीही पोलिसांना योग्य ते सहकार्य केले पाहिजे. लहान-सहन गोष्टीत काही संशयास्पद आढळले तरी त्वरित पोलीस आणि संबंधित लोकांना त्याची माहिती दिली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांनी दहशती कारवायांविरुद्ध ठोस उपाययोजना करावी म्हणून सरकारवर दबाव आणला पाहिजे.
कालच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे.

8 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

prakash kharech rajakiy ichashakti chya abhavi apan khup mar khat ahot. apale rakarani svatachi tumbadi bharun ghenyat vyast ahet. Desh dahshatvadane pokharun nighala tari yana kahi soyarsutak nahi. tyana apala paisa swiss banket kasa vadhel yachich kalaji lagali ahe. ata tarun vargane pudhe yevun krantikrari paul uchalanyachi garaj ahe. sarakar kinva he pudhari kahi karatil yavar sadhya amzatari vishavas nahi. to afjal guru ani kasab he kay sarakarache kinva tithe basalelya liokanche javai ahet kay asa prashn mala padalela ahe. asha ghatana ghadalyanantar thode divas tyache bhandaval karun ekmekavar chikhalfek karayachi aani thodyach divasat ya goshtikade purnapane durlaksh karayache ase sarakarache ani rajakiy lokanche vartan ahe.

Dattatray म्हणाले...

मुंबई जी आमच्या दृष्टीने अभिमानाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे तिच्या ठिकऱ्या उडताना पाहून अतिशय दुख होत आहे. या अतिरेक्यांना आवर घालायला कठोर पावले उचलली पाहिजेत. प्रथम म्हणजे जे लोकप्रतिनिधी अशा बाबतीत गंभीर नाहीत त्यांना पहिल्यांदा पदावरून लाथ मारून हाकलून काढले पाहिजे.

अनामित म्हणाले...

प्रकाश आणि दत्तात्रय, मी तुमच्या मताशी सहमत आहे. या राजकीय लोकांच्या अछाशाक्तीच्या अभावीच अशा घटना वेगाने वाढताना दिसत आहेत. याला जबाबदार कोण आपण कि आपण निवडून दिलेले सरकार कि सरकारच्या दबावाखाली काम करणारे सारे प्रशासन ?
राहुल गांधी तर म्हणतात अशा शाधारण घटना होत राहणार ....आता का करायचे अशा लोकांचे ?

अनामित म्हणाले...

बोंब स्फोट करणाऱ्यांना आधी फाशी द्याला हवी.

Mumbai म्हणाले...

मुम्बई ब्लास्ट के बादकी कुच दुखी लोगो की statements:
राहुल गान्धी : एसी घटनाये होती ही रहेगी
राज ठाकरे : एसी घटनाओ के लिये उत्तर भारतसे आये हुवे लोग जिम्मेदार हे.
लालक्रुश्ण आडवाणी : एसी घटनाओ पिचे पाकीस्थान.........
अरेरे कितने दु:खी हे ये सब !

अनामित म्हणाले...

झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झाले स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा मुंबईवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांचे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ला मुंबईवर नाही तो देशावर झाला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

आशिष झेंडे म्हणाले...

मुंबईत दुर्दैवी हल्ला झाल्यांनतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपापल्या भूमिकेला पोषक असे हल्ल्याचे विश्लेषण केले. सत्ताधारी कॉंग्रेस सरकार असे हल्ले रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे त्यामुळेच राहुल गांधीना या हल्लाचे इतके गांभीर्य वाटत नसावे. त्यामुळे ते म्हणतात ऐसी घटनाये तो होती रहेगी.
राज ठाकरेंना हा हल्ला परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे झाला आहे असे वाटते. परप्रांतीय लोकांचे वाढते लोंढेच अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे.
तर बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांनी आता सरकारवर अवलंबून न राहता स्वताच हातात शस्त्रे घ्यावीत असे आवाहन केले आहे. म्हणजे थोडक्यात काय तर जो तो आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. त्यांना मुंबई हल्ल्यात म्रीत्युमुखी पडलेल्या लोकांची थोडीशी काळजी असती तर २४ तासाच्या आत अशी बेजबाबदार विधाने करण्याचे धाडस त्यांना झाले नसते.
पण तसे केले नाही तर अशा घटनांचा राजकीय लाभ कसा उठवण्यात येईल.

अनामित म्हणाले...

YA ATIERKYANCHE AJIBAT LAAD KARATA KAMA NAYE, AAJ YANA DAYA DAKHAVALI TAR TYACHE GAMBHIR PARINAM PUDHIL KALAT APALALA DISUN YETIL. TYMULE SAVADH HOVUN ATACH APAN KATHOR UPAY YOJANA KELI PAHIJE. PAKISTANLA DHADA SHIKAVATANA AMERIKECHA ADASAR AHE HE KHARE AHE. AMERIKA SHAKTISHALI AHE TYAMULE APALE KAHI CHALAT NAHI. JAGACHYA RAJKARANAT BAI TO KAN PILI HA NIYAM CHALU AHE. TYALA ILAJ NAHI. YA SAMASYETUN MARG KADHAYCHA ASEL TAR ADHI APAN SAMARTH BANANE GARAJECHE AHE. BHARATAKADE ASE KAHITARI ASALE PAHIJE KI TYAMULE AMERIKA PAKISTANACHA NAAD SODUN BHARATALA MADAT KELI PAHIJE. APALYA DESHAKADE MANUSHYBAL AHE, BUDDHI AHE TYACHA VAPAR KARUN GHEVUN APAN PUDHE GELE PAHIJE. COMPUTER CHYA KSHETRAT APAN BARICH PRAGATI KARU SHAKATO. EKEK KHSETR APAN KABIJ KARAYALA PAHIJE. AANI AMERIKELAHI JANIV KARUN DYAYALA PAHIJE KI AMHIHI KAHI KAMI NAHI.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes