मंगळवार, जुलै ०५, २०११

महाराष्ट्राचे आराध्य श्री विट्ठल म्हणजे कोण?

महाराष्ट्राचे आराध्य श्री विट्ठल हे आजवर रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24 अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठुन आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेवून संशोधकांनी श्री विट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरे तर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्री विट्ठलाचे मुळ चरित्र दडलेले आहे यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्री विय़्ट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसुन पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणुन पुजतो आहोत.भजतो आहोत.

खरे तर संशोधकांनी पंढरपुरच्या पांडुरंग विट्ठलाचे मुळ शोधायचे असेल तर सर्वप्रथम पांडुरंग, पंढरपुर, पौन्ड्रिक क्षेत्र आणि पुंडरीक या शब्दांवर, त्यांच्या व्युत्पत्तींवर सर्वप्रथम विचार करायला हवा होता. श्री विट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निर्देश होत असला तरी विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा क्रुष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी ते त्याच्या मुळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे असे मत माणिकराव धनपलवार व डा. रा.चिं.ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मीणीची समजुत काढायला गोपवेषात आलेला क्रुष्णच आहे अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणुन विट्ठलाचे आगमण झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणुन जी समाधी आज आहे ते प्रत्यक्षात शिवालय आहे हेही डा. ढेरेंनी सिद्ध करुन दिले आहे. स्थलपुराणात पंढरपुरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणुन येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव "पांडुरग माहात्म्य" असे आहे, "विट्ठल माहात्म्य" नव्हे हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पौंड्रिक क्षेत्र म्हणुन पुरातन काळापासुन प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपुर हे स्थलनाम यावरुन मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. "पांडुरंग" ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपुर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ते पौंड्रिक...या शब्दातच दडली आहे.

पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद्र मानले गेले असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनीही दक्षीण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.

पंढरपुर हे पौंड्रपुरचे सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षीणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपुर अशी आहेत. बंगालमधील पौंड्रांनी पुंड्रपुर येथुन राज्यकारभार चालवला होता असे ह्यु-एन-त्संगने नोंदुन ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडीत असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षीण भारतात वसाहती केल्या हे यावरुन सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पुर्वीचा, म्हनजे किमान इसपु पाचव्या शतकापुर्वीचा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील, पंढरपुर (मूळ पौंड्रपुर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती हे यावरुन स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे हे आता सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.

श्री विट्ठलाची विशेष उपाधी आहे...पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे.. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणुन राजा होता. तो "पौंड्रंक वासुदेव" या नावाने ओळखला जात होता. तो क्रुष्णाचा प्रतिस्पर्धी असून त्याला पुढे क्रुष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला "पौंड्रंक" अशी उपाधी लावत होते हे यावरुन स्पष्ट होते. "पौंड्रंक" या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे "पांडुरंग" होय. "पौंड्रंक" विट्ठलाचेच पुढे "पांडुरंग विट्ठल" असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता.

याचा साधा सरळ अर्थ असा कि पौंड्र समाजातील, जे पशुपालक, धनगर, कुरुब होते, त्या समाजातील विट्ठल नामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मुर्ती आहे. तो स्वता: विष्णुही नाही कि क्रुष्नही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादव काळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करतांना त्याचे गोपवेषधारी क्रुष्णाशी तादात्म्य साधले गेले असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे क्रुष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले हे मी वर लिहिलेच आहे.) मुलच्या अवैदिक देवतास्वरुप मानल्या गेलेल्या शुद्रवंशीयाचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तीमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मुळ अवैदिक स्वरुप त्यांना बदलता आले नाही म्हणुन आपण आज सत्यापर्यंत पोहोचु तरी शकतो.

पौंड्र, औंड्रादि मंडळी हे शिवभक्त होते. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही कारण येथील मुळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणुनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा केला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते तसेच पौंड्रिकेशाचे संक्शिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही "विट्ठलेश्वर" नव्हते, याचा दुसरा अर्थ असा कि तो शिव केवळ विट्ठल या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपुर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्री विट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.

विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासुन वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतुन इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत पंढरपुरच्या एका "जयद्विठ्ठ" नामक ब्राह्मणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हनजे तोवर विठ्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हनजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असुन दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातुन आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्याचा संबंध दिसत नाही, कारण तो पुरातन आहे. विट्ठलमुर्ती अनादि आहे अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुरानता पहाता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणुन स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या 24 अवतारांतही नाही वा विष्णु सहस्त्रनामातही नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही, पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या तेथे मात्र विट्ठलाच्या मुर्ती मिळालेल्या आहेत. यावरुन विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)

थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपुर तथा आजचे पंढरपुर. या पौंड्रांचा, जे वर्णव्यवस्थेत पुराणांतरीही शुद्र मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून 11 व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मुर्ती हे दुय्यम स्थान होते हे आता लक्षात येईल. शके 1111 च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपुरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले असे नोंदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्म्रुतीत गेलेल्या महानायकाची पुजा तत्पुर्वीही उघड्यावर होतच होती. त्याच्या मुर्तीसाठी मंदिर बनवणारा सुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मुर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमाग्रुह)

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानने व विट्ठलाला विष्णू/क्रुष्णरुपी मानने हे अनैतिहासिक आहे हे यावरुन सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण/वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या त्यामुळे मुळ सत्यावर जळमटे पडली होती...पण आता तरी नवीन द्रुष्टीकोनातुन त्याकडे पहावे. 
लेखक- संजय सोनवणी 

24 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

अतिशय छान विवेचन केले आहे संजय सोनवणी यांनी. एक वेगळ्या दृष्टीकोन आणि संशोधनाने सोनवणी यांनी हे सिद्ध केले आहे कि विठ्ठल अथवा पांडुरंग हा मुळचा शैव असणाऱ्या पौंड्र वंशातील होता. त्याचा विष्णू किंवा कृष्णाशी तसा संबंध नाही.
विठ्ठलाला कानडा का म्हणतात ? त्याचा कर्नाटक शी काय संबंध आहे त्याविषयी काही विवेचन करता आले तर आपल्या ब्लॉग वर प्रसिद्ध करावे.

प्रकाश पोळ म्हणाले...

संजय सोनवणी यांचे "शोध विठ्ठलाचा" हे पुस्तक वाचावे. विठ्ठलासंबंधी अजून माहिती मिळेल.

Omkar pawar म्हणाले...

vitthalachya angavar janave ka ghalatat. jar vithal ha bahujan cha dev asel tar tyache pujari braman ka ani tyachya angat janave ka ? krupaya mazya ya prashnanchi uttare milatil ka ?

अनामित म्हणाले...

खुपच छान

अनामित म्हणाले...

He baman lok jite jatil tithe Hinduvad pasravat astat.Vitthalalahi purn baman rup deun takley. Sadhya-bholya lokanatar Vitthal ha devacha avtar kiva brahman vatoy :P
Lokana kitihi fasavle tari saty ughdayche rahnar nahi.

अनामित म्हणाले...

wah! wah!
chhan mahiti milali. mi far aadhi sanjay sonavaninche "shunya mahabharat" he pustak vachaley. ani ashwatthama hi. mastach!

-Apurva Pathak

अनामित म्हणाले...

Sant Namdev, Sant Tukarm, Sant Eknath, Sant Bahinabai yanchya mate Vitthal he Buddharup ahe. Ata he tumhi navin khul kuthun kadhale ahe mahit nahi? Ajunhi bahutek thikani vishnuchya navavya avatatanchya chitrat Budhhachya thikani Vitthal dakhavitat. Vichar tar karal? Jara abhang vachnyachi tasadi ghyal?

अनामित म्हणाले...

‘Pandharicha Vithoba, pandhari mahatmya vacha. Tyat kiti tathyansh ahehyanche varnan kara. Hya devsthanapasun lokanchya jivanchi, dravyanchi va, udyaganchi kiti hani hot ahe yachi kalpana kara. Vithoba ha bouddhavtar manila ahe. Vithobache mandir Bouddha lokanni bandhalele ahe. Tyat buddhachi murti sthapit keleli hoti. Jenvha Arya dharma santhapakani te devul balakavun tya murtila Vithoba nav dile’. (Paha “Sarvajanik Satyadharma”, Jotirao Phuley, Prasthavana : Dr. Vishram Ramji Ghole)
Sant Namdev : Maddhe zale moun dev nije dhyani I Bouddha te mhanoni naverup I (2105)
Sant Tukaram : Bouddh avtar maziya attashtha I Mounya mukhe nishtha dhariyeli I

Sant Eknath : Navava baise sthirrup I taya nam Bouddharup I sant taya dari I Tishthatati nirantari I (Abhang 2560)
Bouddha avatar hovun I vite samacharan thevun Pundarik divata pahun I Tayache dwari gondhal mandila I baya dar lav I Boudhai baya dar lav I (3911)
Bodhuni sakalahi loka I Bodhe nele vividh tapavo I Bouddha rupe nandasi I Bolevina bolane ek vo I Sadhak badhak jethe ekpanechi bodhvisi vo I udo mhana udo I bodhai maulicha ho I (3920, Sakharekrut sakalsantgathetil eknathanchya ovya)
Lok dekhoni unmatta I Daranni asakta I Na bole Bouddharup I Thevile jaghani hat II........Dharma lopala I adharma jahala I He tu na pahasi I ya lage Bouddharupe pandhari nandasi II

Sant Janabai : Hovuniya Krushna Kans vadhiyela I ata Buddha zala sakha maza I (344)
Gokul avataru I Solan sahastranvaru I apan Yogeshwaru I Bouddharupi I (1053)
Vratbhangasathi Bouddha avatar I Zala digambar avaniyeI (1096) Yesa kashthi houni Bouddha rahilasi I (1098)

Mahipatibuva Taharabadkar : Ani kaliyugi pratyaksha pashanrupi I Bouddharupe asata shripati I Janansi dakhvuni nana prachiti I Vadhavili kirti Santanchi I (Bhaktavijay-57-90)
Kaliyugamaje sachar I asatya vachan zale far I yastav Bouddha avatar I deve satvar ghetala I (Santvijay adhyay 10)

Sanjay Sonavani : Yacha vichar karal kay?

Vivek Patil

अनामित म्हणाले...

संजयजी खालील मुद्दे सुद्धा विचार करावयास लोवणारे आहेत!

‘पंढरीचा विठोबा , पंढरी महात्म्य वाचा . त्यात किती तथ्यांश आहेः यांचे वर्णन करा . देवस्थानापासून लोकांच्या जीवांची , द्रव्यांची व उद्यागांची किती हानी होत आहे याची कल्पना करा . विठोबा हा बौद्धावतार मानीला आहे . विठोबाचे मंदिर बौद्ध लोकांनी बांधलेले आहे . त्यात बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती . जेंव्हा बौद्ध धर्मानुयाई लोकांचा मोड झाला ; तेंव्हा आर्य धर्म संथापाकानी ते देवूळ बळकावून त्या मूर्तीला विठोबा नाव दिले ’. (पहा “सार्वजनिक सत्यधर्म ”, जोतीराव फुले , प्रस्थावना : डॉक्टर . विश्राम रामजी घोले )

संतवचने :
संत नामदेव : मद्धे झाले मौन देव निजे ध्यानी I बौद्ध ते म्हणोनी नावेरूप I (२१०५ )
संत तुकाराम : बौद्ध अवतार माझिया अत्ताष्ठ I मौन्य मुखे निष्ठा धरियेली I
संत एकनाथ : नववा बैसे स्थिररूप I तया नाम बौद्धरूप I संत तया दारी I तिष्ठताति निरंतरी I (अभंग २५६० )
बौद्ध अवतार होवून I विटे समचरण ठेवून पुंडरीक दिवटा पाहून I तयाचे द्वारी गोंधळ मांडीला I बया दार लाव I बौद्धई i बया दार लाव I (३९११ )
बोधुनी सकळही लोक I बोधे नेले विविध तपावो I बौद्धरूपे नांदसी I बोलेविना बोलणे एक वो I साधक बाधक जेथे एकपणेची बोधविसी वो I उदो म्हणा उदो I बोधाई माऊलीचा हो I (३९२० , साखरेकृत सकाळसंतगाथेतील एकनाथांच्या ओव्या )
लोक देखोनी उन्मत्त I दारांनी आसक्त I न बोले बौद्धरूप I ठेविले जघनी हात II........धर्म लोपला I अधर्म जाहला I हे तू न पाहसी I या लागे बौद्धरूपे पंढरी नांदसी II

संत जनाबाई : होवूनिया कृष्ण कंस वधियेला I आता बुद्ध झाला सखा माझा I (३४४ )
गोकुळ अवतारू I सोळा सहस्त्रांवरू I आपण योगेश्वरू I बौद्धरूपी I (१०५३ )
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार I झाला दिगंबर अवनीये I (१०९६ ) ऐसा कष्ठी होऊनी बौद्ध राहिलासी I (१०९८ )
महिपतीबुवा ताहाराबादकर: आणि कलियुगी प्रत्यक्ष पाषाणरूपी I बौद्धरूपे असता श्रीपती I जनांसी दाखवुनी नाना प्रचीती I वाढविली कीर्ती संतांची I (भक्तविजय -५७ -९० )
कालीयुगामाजे साचार I असत्य भाषण फार झाले I यास्तव बौद्ध अवतार I देवे सत्वर घेतला I (संतविजय अध्याय १० )

संजय सोनवणी : याचा विचार कराल काय?

विवेक पाटिल.

अनामित म्हणाले...

होय पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच :

कवी जयदेव हा बाराव्या शतकात झाला. त्याने पुराणांच्या आधारावर नववा अवतार म्हणून बुद्धाचे गुणगान केले. मराठी संतांनी आपले आराध्यदैवत विठ्ठल यालाच बुद्ध मानले आहे. संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानताना म्हणतात, ’लोकांना उन्मत व धन-दारात आसक्त पाहून हे विठ्ठला, तू बुद्धरूप धारण करून, कमरेवर हात ठेवून, बौद्धावतार घेऊन विटेवर उभा आहेस’
याच संदर्भात ‘पद्मपुरणाच्या ’ उत्तर खंडात दिलेली विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती लक्षात घेतली पाहिजे. त्यातील पाचव्या अद्ध्यायाचा विसावा श्लोक असा :
विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाति गृन्हानि या स्वयम I
तस्मात विठ्ठल मी नामत्वं ध्यायस्व मुनीश्वर II
विदा म्हणजे ज्ञानाने; ठाण म्हणजे अडाणी लोकांना, पतितांना, अपराध्यांना, लाति म्हणजे जवळ करतो. जो पतित लोकांना ज्ञान देवून जवळ करतो तो विठ्ठल (संत, पंत आणि तंत, माटे). भारतीय अध्यात्मिक साधनेच्या इतिहासात पतितांना ज्ञान देवून जवळ करणारा बुद्धाशिवाय दुसरा कोण महापुरुष झाला बरे? यातून बुद्धाचाच बोध होतो असे म्हणणे अत्युक्त वाटू नये. आणि संत जेव्हा बुद्धाला विठ्ठलच म्हणतात, तेंव्हा या संदर्भात विठ्ठल शब्दाचा उपरोक्त व्युत्पत्तीला खास अर्थ आहे हे नाकारता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि, बुद्धाने पंचवर्णीय भिक्षुंना आषाढी पौर्णिमेला प्रथामोपादेश केला. ह्या पौर्णिमेला गुरु पोर्णिमा म्हणतात (भागवत : सिद्धपुरुष व त्यांचा संप्रदाय , चिपळूणकर). आणि पंढरपूरला आषाढी पौर्णिमेलाच यात्रा भरते. या दृष्ठीकोनातून पंढरपुरचे विठ्ठल, पितांबर आणि गुरु-महात्म्य हे बौद्ध परंपरा व इतिहासाशी जुळत असल्याचे बौद्ध प्रभावाचेच द्योतक आहे, हे लक्ष्यात घेतले पाहिजे. अशा प्रकारे महायान धर्मातीलच न्हवे तर मूळ बौद्ध धर्मातील अनेक तत्वांचा आणि बौद्ध विहार व मूर्तींचा शैव व वैष्णव संप्रदायात समावेश करण्यात आला. पंढरपूर व तेथील विठ्ठल हे बौद्धधाम व बुद्धरूप असल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अ रा कुलकर्णी यांचीमते सर्वश्रुतच आहेत. खुद्द संत नामदेव आणि एकनाथ विठ्ठलाला बुद्धच मानतात .

अरुण सावंत

अनामित म्हणाले...

चित्र आणि शिल्प या माध्यमातून विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा प्रकट होते. दीर्घकालपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर दशावताराची चित्रे छापत. या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापलेले असते. या चित्रावर बुद्ध असे नावही आढळते.

दशावतारात बुद्धाच्या जागी विठ्ठल असलेली दोन शिल्पे आढळतात १. तासगाव येथे गणेशमंदिराच्या गोपुरावर आढळते. २. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातील एका ओवरीत आढळते.

विठ्ठलाच्या बौद्धात्वाचे पुरावे :
१. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
२.विठ्ठलाचा इतिहास कोठेच दिसत नाही. रामाचा रामायणात, कृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात; मग विठ्ठलाचा इतिहास का आढळत नाही?
३.विठ्ठल मूर्ती एकटीच का? शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी (?) विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्याच मंदिरात आहे. संन्याशाचे (श्रमण) स्त्री असणे असंभवनीय होय. विठ्ठल हा एकटाच असल्याने बुद्ध असणे संभवनीय आहे.
४.विठ्ठलाचा हात कमरेवर , हातात शस्त्र नाही.
५.मूर्तीचे सूक्ष्म अवलोकन केले तर तीत बुद्धत्वाच्या खुणा दिसतात. विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धासारखे लांब दिसतात. विठ्ठल पितांबरधारी आहे. बौद्ध श्रामाणांची वस्त्रे ‘पीत’ असतात.
६.वारकरी (मूळ शब्द्द वारीकारी) ह्या संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (तुळशीची माळ घालताना) शपथ घ्यावी लागते. हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय. १) मी प्राण्याची हिंसा करणार नाही. २) मी चोरी करणार नाही. ३) मी व्यभिचार करणार नाही. ४) मी खोटे बोलणार नाही आणि ५) मी अपेयपान करणार नाही, हे ते पाच नियम होत.

पंढरीच्या वारीला निदान पंढरपुरापुरते स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून एकत्र गोळा होतात. चातुर्मासात वारी हे वैदिक संप्रदायाप्रमाणे अयोग्य होय. बुद्ध हा जातिभेदा विरुद्ध होता. जातीव्यवस्ता व अस्पृश्यताविरोध हे बौद्धधर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

पंढरपूरचा विठ्ठल बुद्धच आहे, अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे होय. विट + ठल. विट हा मराठी तर ठल हा पाली शब्द्द आहे. ठल या पाली शब्दाचा अर्थ स्थळ असा आहे. विट आहे स्थळ ज्याचे तो विठ्ठल. सम्राट अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली, त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रशिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या “Memoior of the Cave Temple” या ग्रंथात हे मंदिर बुद्ध मंदिर असल्याचे म्हटले आहे (धर्मपद, अ रा कुलकर्णी या ग्रंथाचे परिशिष्ठ पाहावे). म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल हा शैव वा वैष्णव आहे असे म्हणणे चुकीचे ठरणारे आहे.

अलोक चोपडे

अनामित म्हणाले...

ही अंतिमत: जगण्या-मरण्याची लढाई आहे. त्यासाठी निमित्त म्हणून कधी विठ्ठल, कधी शिवाजी, कधी होळकर, कधी बळी अशी प्रतीके वापरली जातात. But ultimately its a struggle for survival.

अनामित म्हणाले...

Well job done by Mr. Vivek, Mr. Arun and Mr. Alok along with references. Keep it up. Mr. Sanjay, please rectify why these point not considered during book writting.

Mr. Suhas Mane

अनामित म्हणाले...

panduranga ubha vitevari,
vit sthit mhanje vit thal (apabhranshta roop)
ashi viththal navachi vutpatti asavi,

अनामित म्हणाले...

मुस्लिमांनी अनेक हिन्दू मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा उर्फ वैदिकांचा एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत असतात.
भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला सगळ्यात जूने अवशेष हे बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात. खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत, ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत. याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मूळ बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत.
बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील ब्राम्हणांच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीत.
बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे बौद्ध मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही पांडव लेणी पांडवांनी एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या मूळच्या बौद्ध लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.

अनामित म्हणाले...

Sanjay Sonavani tumhi mug gilun gapp ka basalele ahat. Kara dhadas ani liha navin pustak, ki pondra pondrach karit basanar ahat te tari sanga.

अनामित म्हणाले...

संजय सोनवणी वेडयाचे सोंग घेवून पेडगावला गेले आहेत हेच खरे. तुमची दातखिळी का बसली आहे ते तरी सांगा राव. लिहा आणि द्या पुरावे तुमच्या विठ्ठला बद्दलच्या खोट्या संशोधनाचे. घाई करा!

अनामित म्हणाले...

Sanjay Sonawani zopala ahat kay? Utha ani khotya savshodhanala kontya shaivane (Shiv bhaktane)madat (arthik) keli te tari sanga.

Unknown म्हणाले...

sanjay Sonawani varil utkrushtha pratikriyanvar dya na ek comment!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

tushar म्हणाले...

vittal hech krishna sanga ya gadhavala (sanjay sonavane)
me hindu chambhar

Unknown म्हणाले...

good work

अनामित म्हणाले...

संजय सोनावनी इतिहासाचे विद्रुपीकरन करत आहेत __ काही ही। मन की। बाते लिहुन__ कारण। पंढरपुर पूर्वी चे बुद्ध विहार। आहे। ।। हे खुप सत्य अन स्पष्ट आहे।

SUNIL GAWAI म्हणाले...Sunil "विश्वास ठेवा, विचार करू नका !' असे हिंदू -वैदिक धर्माने भारतीयांच्या समाजमनात जाणिवपुर्वक हजारो वर्षांपासून ठासून ठासून भरवले त्यामुळे येथील समाज विचारशून्य बनून राहिला. आपणांसारखे काही चिकित्सक( संशोधन सिद्ध नसले तरी !) आप ल्या जाणीवबुद्धीचा वापर करताय ना ?

Unknown म्हणाले...

विट्ठल यांच्या गुरुजी चे नाव काय आहे

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes