बुधवार, जून ०८, २०११

ओबीसींसह सर्व मागास विद्यार्थ्यांवर आय.आय.टी. प्रवेशात अन्याय

न्यायालयीन लढाईसाठी संघटित होण्याचे प्रा. देवरेंचे आवाहन

प्रा. श्रावण देवरे
चालू वर्षी आय.आय.टी. प्रवेश पात्रतेपरिक्षेत ओवीसींसकट सर्वच मागासवर्गीय विद्यार्थांची फसवणुक झाली असून अन्यायग्रस्त विद्यार्थांनी संघटीतपणे प्रतिकार करण्याचे आवाहन ओबीसी सेवा संघाचे महासचिव प्रा. श्रावण देवरे यांनी एक पत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत विस्ताराने माहीती देतांना पत्रकात पुढे म्हटले आहे की, या वर्षी 1540 ओबीसी, 122 एससी व 33 एसटी विद्यार्थांनी स्वतःच्या उच्च गुणवत्तेच्या जोरावर जनरल गुणवत्ता यादीत निवडले होते. त्यांना जनरल  (51 टक्के) कोट्यातूनच प्रवेश देणे कायद्याने बंधनकारक असतांना मागासवर्गीयांच्या कोट्यातून प्रवश देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. परीणामी पात्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परंतू प्रवेश न मिळालेल्या 1540 ओबीसी, 122 एससी व 33 एसटी विद्यार्थांवर अन्याय झालेला आहे.  

गेल्या वर्षी एम्स प्रशासनाने अशाच प्रकारचा अन्याय ओबीसी विद्यार्थ्यांवर केला असतांना दिल्ली हायकोर्टाने अशाप्रकारच्या कृत्याला बेकायदेशीर ठरविले व प्रवेश वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास भाग पाडले होते.
उपरोक्त विद्यार्था त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या आधारे खुल्या वर्गातून प्रवेशित झाले असते तर तेवढ्याच संख्येचे ओबीसी, एससी व एसटी विद्यार्थी अधिक प्रवेशित झाले असते. ज्या विद्यार्थ्यांना पात्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रवेश मिळाला नसेल त्यांनी प्रा. श्रावण देवरे यांच्याशी 94227 88546 या मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Print Page

2 टिप्पणी(ण्या):

shrawan deore म्हणाले...

Prakashji Satyashodhak Chhatrapati Dnyanpith has organized two state level examinations on the syllabus of Fule-Ambedkarike books. Both exams will be conducted all over Maharashtra on 300 exam centers on 28 August 2011. I have pulished some news related to this issue. It is my request to you pl. publish these matter on your eminent website. Thanks.
-------- Sau. Shobhatai Shrawan Deore
mobile - 9422788546
Email- satyashodhak.university@gmail.com

Prakash Pol, Karad. म्हणाले...

@shrawan deore

thik aahe sir. mi ti information sahyadri bana var publish karato.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes