शनिवार, मे २८, २०११

वाघ्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न अत्यंत निंदनीय - रामभाऊ वडकुते, झारगड मामा

वाघ्याचा वादग्रस्त पुतळा
सध्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा वाघ्याचा पुतळा तुकोजीराव होळकरांच्या देणगीतून निर्माण झाल्यामुळे धनगर समाज्याच्या या पुतळ्याबद्दल अत्यंत पूज्य भावना आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा उध्वस्त करण्याची घोषणा केल्यापासून धनगर समाज आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. धनगर समाजाच्या या अस्वस्थतेतून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जे सिद्ध होईल ते सत्य सर्वांनाच स्वीकारावे लागेल. परंतु संभाजी ब्रिगेडने पुतळा उध्वस्त न करता धनगर समाजाशी चर्चा करून विश्वासाने हा प्रश्न सोडवावा. नाहीतर मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले तर बहुजन चळवळीची हानी होईल. वाघ्या कुत्र्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते झारगड मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती सर्वांच्या माहितीसाठी सह्याद्री बाणा वर उपलब्ध करून देत आहे.
- प्रकाश पोळ 
रायगड किल्ल्यावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा घाट संभाजी ब्रिगेडने घातला आहे. केवळ शिवचरित्रात वाघ्य्याच्या आस्तित्वाचे लिखित पुरावे सापडत नाहीत म्हणुन वाघ्याचे उच्चाटन करण्याचे त्यांचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे पत्रक धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते व झारगड मामा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे हे खरे असले तरी दंतकथांना सत्याच्या बीजाचा आधार असतो. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरीं यांनी केवळ कल्पनेच्या जोरावर वाघ्याचे पात्र निर्माण केले असा युक्तिवाद संभाजी ब्रिगेड करत आहे तो ग्राह्य धरता येणार नाही. दुसरे असे कि ज्या जागेवर हे स्मारक उभारले गेले आहे तेथे पुर्वी एक उद्ध्वस्त चौथरा होता. तो चौथरा शिवाजी महाराजांच्या कोणा राणीचे असल्याचाही उल्लेख इतिहासात नाही किंवा तशी दंतकथाही नाही.  अशा स्थितीत वाघ्याचा वाद पेटवून त्यावर राजकारण करून समाज-स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बहुजन समाजामद्धे फुट पाडण्याची ही राजकीय चाल हाणुन पाडली जाईल असा इशारा त्यांनी या पत्रकात दिला आहे.

निधीअभावी  ज्यावेळी शिवस्मारकाचे काम अडुन पडले होते त्यावेळी मदत करायला पुढे सरसावले ते शिवप्रेमी तुकोजी महाराज.ही सर्वात महत्वाची बाब आज मुद्दाम दडवली जात आहे. शिवस्मारकासाठी एकमेव मोठी देणगी तुकोजीमहाराजांची आहे आणि त्या काळी त्यांनी शिवस्मारकाला रु. ५०००/- ची देणगी दिली. ही देणगी मागायला पुण्यातुन श्री. जी.व्ही. काळे आणि श्री ग.वि. केतकर इंदोरला गेले होते. त्याच वेळी  तुकोजीरावांच्या लाडक्या कुत्राचाही दुर्दैवाने म्रुत्यु झाला होता. तुकोजीराव दु:खात होते. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याचेही स्मरण रहावे आणि स्वामीनिष्ठेचा गौरव केला जावा या दुहेरी हेतुने वाघ्या कुत्राचे स्मारक करण्याचे ठरवले गेले. त्यानुसार स्मारक समितीने शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतर त्वरीत आदरपुर्वक वाघ्याचे स्मारक बनवले. हे स्मारक तुकोजीराजांच्या देणगीतुन झाले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या स्मारकावर शिलालेखात आहे. म्हणजे या स्मारकावर पहिला हक्क होळकर घराण्याचा आहे. हे लक्षात न घेता झुंडशाहीने हे स्मारक हटवण्याची भाषा करणे निषेधार्ह आहे.

धनगर समाजासाठी कुत्रा हा दैवतासमान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचा लाडका कुत्रा वाघ्या हाच आहे आणि त्याची पुजा केली जाते. तुकोजीराव हे धनगर समाजातले होते त्यामुळे त्यांना वाघ्याबद्दल आत्मीयता आणी पुज्यभाव असणे स्वाभाविक आहे. जर तुकोजीरावांना आपल्या कुत्र्याचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी त्याचेच नाव स्मारकाला दिले असते. परंतु त्यांनी ते शिवरायांच्या वाघ्याचे स्मारक बनवले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशा स्थीतित वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व धनगर समाजाचा आणि समग्र ओ.बी.सी, भटके विमुक्त व तमाम शिवप्रेमींचा अवमान मानून त्याचा हे सर्व जण प्राणपणाने विरोध करतील असा इशारा आम्ही देत आहोत.

मराठा समाजातील इतिहासकार क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली विस्त्रूत शिवचरित्र प्रकाशित केले. त्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी अनुवादाचे खंड प्रकाशित करतांना त्यांना फार मोठे कर्ज झाले. "इतक्यात इंदोरचे उदार अधिपती श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांच्या कानी क्रुष्णरावांची करुण कहानी गेली. खरोखर त्या काळात क्रुष्णरावांची स्थीति अत्यंत करुणाजनक झालेली होती. इतक्यात इंदोरापधीतिंची २४००० रुपयांची (आजचे सुमारे रु. ६० लाख) उदार देणगी देवून जगातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांस फुकट वाटण्यासाठी इंग्रजी चरित्राच्या ४००० प्रती त्यांनी घेतल्या व त्या मुळ उद्देशानुरुप प्रमुख ग्रंथालयातुन ठेवण्याची व्यवस्था केली. अशा रीतिने क्रुष्णरावजी व्रुद्धापकाळी एका मोटःया काळजीतुन मुक्त झाले." (पहा-छत्रपती शिवाजी महाराज...ले. क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर, {प्रथमाव्रुत्ती...१९०६} ४थी आव्रुत्ती, वरदा प्रकाशन, पुणे-१६, प्रुष्ट क्र. नउ)

म्हणजे शिवचरित्र आणि शिवस्मारक या दोन्हींसाठी शिवप्रेमाने प्रेरीत होवून जे तुकोजीराजे पुढे आले त्यांचा अवमान करण्यासाठीच हा वाघ्याच्झा पुतळा काढुन टाकण्याची मागणी पुढे आली आहे हे लक्षात घेउन समग्र शिवप्रेमींनी याचा प्रतिकार केला पाहिजे. वाघ्याच्या पुतळ्याला हात जरी लावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडुन महाराष्ट्र पेटवू असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

झारगड मामा, रामभाऊ वडकुते.

16 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

तुम्ही मराठा समाजाला बहुजन कसे काय मानता? त्यानीच तर सर्वात जास्त अन्याय केले आहे बहुजनान्वर ..बहुजन तोडून आपण राज्य करने हेच ह्यांचे काम ......

Raju Chiwhane म्हणाले...

वाघ्या कुत्रा हे स्वामी भक्तीचे प्रतिक आहे, त्याला आधार असो वा नसो. त्यामुळे महाराजांचा कोणताही अवमान होत नाही. पण हा पुतळा काढल्यास तो तुकोजीराव होळकरांचा निश्चितच अपमान आहे. संभाजी ब्रिगेड सांगेल तोच इतिहास असे आम्ही का मानायचे, तुम्हाला मंजूर नसेल तर नका माणू वाघ्या होता म्हणून, ज्यांची श्रद्धा आहे त्यांचे तर राहू दे. धनगराचा खरा मित्र कुत्रा. कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी आणि त्याची स्वमिनिश्तेचा प्रतिक असण्याचा हा पुतळा आहे. संभाजी ब्रिगेड हि बहुजन संघटना असेल तर तिच्या अनेक गोष्टीत मराठा हा शब्द का येतो? हे लोक स्वतःला क्षत्रिय मानतात म्हणजे फक्त आम्ही शुद्र. शुद्रन्वरच्या अन्यायाला क्षत्रिय जास्त जबाबदार आहेत. इतिहासापेक्षा वर्तमान अधिक वाईट आहे. पूर्वी होळकर यांच्यासारखे धनगर सरदार होते. पिराजी नाईक सारखे भटके विमुक्त हेरखात्याचे प्रमुख होते. पण गेल्या ५० वर्षात महाराष्ट्र हा केवळ मराठ्यांची दौलत बनून राहिला आहे. आमच्या राजांचे " जाणता राजा " हे बिरूद देखील शरद पवार सारख्या भ्रष्टाचारी नेत्यांना यांनी बहाल केले. संभाजी ब्रिगेड ने आपली हि मागणी त्वरित मागे घ्यावी वा आपण बहुजन संघटना असल्याचे सिद्ध करावे वा सर्व बहुजन एकत्र झाले तर संभाजी ब्रिगेडला पर्यायाने मराठ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल

Kiran Gophane म्हणाले...

Lal Mahalatil Bal shivaji Jijau Masaheb aani Dado Gochivade (kondadev) he smarak jyani shivrayanchya aani samast maharashtrachya matevarti charitrya hanan karnyachya uddeshyane he smarak ubharle hote parantu maharashtratil swabhimani janatene ya smarakatil dado gochivade (kondadevcha) putala prashasanas kapun kadhnyas bhag padale tyamule chidlelya kahi lokanche Dhangar virudhdha Maratha sangharshya ubha karun Maja baghayachi aani foda aani rajya kara ase tya chidlelya lokanche mansube asavet tyamule maharashtratil tamam maratha aani Dhangar samaj bandhvaani aaplya madhdhe fut padel ase kontehi vaktavya aani krutya karu naye hi namra vinanti tyach pramane aaplya samajatil Mahadev Jankar, Purushottam Khedehar, Pravindada Gaikwad aadi netyani ekatra basun samopcharane ha vaad mitvava ashi Mazyasarkya sarva samanya nagrikachi namra vinanti.

Raju Chiwhane म्हणाले...

Mr. Kiran Gophane Saheb, जर आपल्याला हे मराठा विरुद्ध मराठा वाद भडकाविण्यासाठी उभा केलेला मुद्दा वाटत असेल (प्रामाणिकपणे ) तर आपण संभाजी ब्रिगेड च्या नेत्यांना सांगून त्यांना हा पुतळा काढण्यापासून परावृत्त करावे, त्यामुळे बहुजन लोकांचा ह्या संघातानेवाराचा विश्वास वाढेल. पण असे न करता आपण केवळ धनगर समाजबांधवांना एकी राखण्याचा सल्ला देत आहात हा विरोधाभास आहे. प्रवीण दादा गायकवाड यांच्याशी धनगर नेत्यांनी चर्चा जरूर करावी व संभाजी ब्रिगेड वाल्यांना आपल्या भावना नीट समजावून सांगाव्यात, परंतु केवळ मराठा दबावाखाली येऊन माघार घेऊ नये हि विनंती. तसेच संभाजी ब्रिगेड हि जर खरेच बहुजन संघटना असेल तर त्यामध्ये इतर बहुजन समाजातील जसे माली , विणकर , बौद्ध , इतर दलित, धनगर, बंजारा , आदिवासी इत्यादी समजाच्या नेत्यांना नेते पद द्यावे. अन्यथा हि संघटना केवळ मराठा हित पाहते व त्याचा बहुजानांशी काहीही संबंध नाही असा अर्थ होईल

shrawan deore म्हणाले...

वाघ्याला हटवायचे म्हणता? जर तेथे वाघ्या कुत्रा एवजी वाघ्या घोडा असता तर हटवला असता काय?

Shivraj म्हणाले...

श्री प्रकाश पोळजी , आपण आपल्या ह्या लेखाची लिंक फेसबुक वर पोस्ट केली होती, परंतु स्वतःला वैचारिक संघटना म्हणवणाऱ्या ब्रिगेड ने हि पोस्ट काढून टाकली. जो मुद्दा आपल्याला मान्य नाही त्यावर चर्चाच होऊ द्यायची नाही हा लोकशाही मार्ग नव्हे. आपल्यासारख्या बहुजन कार्यकर्त्यांनाही जर मतभेद व्यक्त करू दिल्या जात नसेल तर सामान्य माणसाची काय कथा ? ब्रिगेड दिवसेंदिवस एककेंद्री होत चालली आहे. कुत्रा ठेवणे किंवा काढणे हे महत्वाचे नाही , तर त्यामागच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे.
एखादा मुद्द्यावर मतभेद असतील तर ते चर्चेने सोडविले जावे हि अपेक्षा आहे, पण कोणत्याही गोष्टीत चर्चा न करता निर्णय जाहीर करणे हि एक प्रकारची दंडेलशाही आहे.हि दंडेलशाही कधी नरके साहेबांच्या बाबतीत दिसते, कधी शिवजयंतीच्या तारखेत तर कधी आपली हि पोस्ट काढून टाकण्यात. हि अशीच चालू राहिली तर सामान्य बहुजन ह्या संघटनेपासून दूर जाईल यात शंका नाही.

Ajinkya म्हणाले...

kharach ya prasnavar samajatil jeshth ani abhyasu lokani ekatra basun nirnay ghyava.bahujan samajat phut padta kama naye.
hajar prayatn karun manuwadyana je jamle nahi te ya prashnawarun hou naye.

Ajinkya म्हणाले...

kharach ya prasnavar samajatil jeshth ani abhyasu lokani ekatra basun nirnay ghyava.bahujan samajat phut padta kama naye.
hajar prayatn karun manuwadyana je jamle nahi te ya prashnawarun hou naye.

Milind Chothve म्हणाले...

कृपया दोन्ही बाजूंनी स्वत:च्या 'भुजां'मधील 'बळ' व्यर्थ घालवू नये. नुसतीच टगेगिरी करून 'पावर' दाखवण्यापेक्षा वैचारिक 'नरक' यातना सहन करणाऱ्यांचे म्हणणे ऐकावे. आपली संस्कृती ही मेश्रापोटेमिया पेक्षा नक्कीच पुरातन आहे. तिला कोणी स्वत:ची कवाडे बंद करून 'कोंडू'न ठेवू नये.

अनामित म्हणाले...

Sambhaji briged zindabad.

bammu phonde म्हणाले...

uraleli dhangaranchi asmita sampavnyathi ghahi ata maratha < samboji briged karat ahe. tyancha ha praytna hanun padla pahije.

Vijay G.Gawade म्हणाले...

shivrayanche apurnkary RAYARESHWARAVARIL SHIVLING apalya MATOSHRI AHILYADEVI HOLKAR yanchya hati deun AJINKYA YODHA MALHARRAO HOLKAR yani AURANGJEBANE udhvast ukirada kelela SASKRUTIK BHARAT punarapi ubharala. paha pane chalun itihasachi....
he kary KOLHAPUR GADI,SATARA GADI,PESHAVE, GVLHERCHE SHINDE,BADODYACHE GAYAKWAD ANI KUNICH KELE NAHI he sara maharashtra janato sarv TIRTHKSHETRE, GHAT ,VIHIRI, RASTE, oradun sangat ahet MAHARASHTRABAHER ABHIMAN FAKT DHANGAR HOLKARANMULECH SHIVRAYANCHYA KARYACHE KHARE VARAS FAKT DHANGAR HOLKARACH.....

Vijay G.Gawade म्हणाले...

shivrayanche apurnkary RAYARESHWARAVARIL SHIVLING apalya MATOSHRI AHILYADEVI HOLKAR yanchya hati deun AJINKYA YODHA MALHARRAO HOLKAR yani AURANGJEBANE udhvast ukirada kelela SASKRUTIK BHARAT punarapi ubharala. paha pane chalun itihasachi....
he kary KOLHAPUR GADI,SATARA GADI,PESHAVE, GVLHERCHE SHINDE,BADODYACHE GAYAKWAD ANI KUNICH KELE NAHI he sara maharashtra janato sarv TIRTHKSHETRE, GHAT ,VIHIRI, RASTE, oradun sangat ahet MAHARASHTRABAHER ABHIMAN FAKT DHANGAR HOLKARANMULECH SHIVRAYANCHYA KARYACHE KHARE VARAS FAKT DHANGAR HOLKARACH.....

प्रदीप पोवार. Pradeep Powar म्हणाले...

समजा वाघ्या हा छ. शिवरायांना प्रिय होता असा निष्कर्श निघाला तर त्याचे अतिभव्य असे स्मारक व्हावे. आणि जर तो अस्तित्वातच नव्हता असे सिध्द झाले तर शिवरायांच्या "नसलेल्या" पण आम्ही मानत असलेल्या "स्वामिनिष्ठेचे प्रतिक" वाघ्याचे स्मारक जपले जावे. जगाला दाखवू की आम्हाला शिवरायांची प्रत्तेक चीज प्रत्तेक गोष्ट तितकीच प्रिय आहे. "शिवरायांचा असलेला" आणि "शिवरायांचा नसलेला" वाघ्याही तितकाच प्रिय आहे. मंदिरातल्या कासवाचे प्रतिक म्हणजेच शिवरायांचा वाघ्या आहे. आम्ही सगळेच शिवरायांचे वाघ्या आहोत. वाघ्या म्हणजे आम्हा मावळ्यांचे प्रतिक आहे. होय ना?

Aanand Kokare म्हणाले...

अफजल खानाची कबर का काढुन टाकत नाही ब्रि्गेडी?
त्याला सुफी संताचा दर्जा का देतात?
का तो देशभक्त होता?
वाघ्या हटवुन कशाला स्वत्ता्च्या पायावर कुर्हाड हानुन घेता
धनगर समाजाच्या रागाला बळी पडु नका

Aanand Kokare म्हणाले...

अफजल खानाची कबर का काढुन टाकत नाही ब्रि्गेडी?
त्याला सुफी संताचा दर्जा का देतात?
का तो देशभक्त होता?
वाघ्या हटवुन कशाला स्वत्ता्च्या पायावर कुर्हाड हानुन घेता
धनगर समाजाच्या रागाला बळी पडु नका

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes