मंगळवार, मे २४, २०११

धोंडेवाडी, ता. कराड येथे अंनिस चा प्रबोधन कार्यक्रम


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे; पण धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा येथील काकडे कुटुंबीयांना ही तफावत ओळखताच आली नाही. वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाले, तरी कोणीतरी 'करणी'च केली, असा समज करून घेऊन हे कुटब देव-देवऋषाच्या मागे धावायचं. करणी, भानामती, मीठ-मिरच्या, लिबू, काळी बाहुली असा खेळ हे कुटब खेळत असे. या खेळातच अखेर चार वर्षांच्या प्रणवचा हकनाक बळी गेला. ज्यांच्या अंगा-खांद्यावर खेळून बालपण व्यतीत करायचं त्याच आजी-आजोबानं प्रणवचा गळा दाबला. आजी-आजोबाच्या या 'करणी'मुळे निरागस प्रणवच्या आयुष्याचा मात्र दुर्दैवी अंत झाला.  

या पार्श्वभूमीवर अनिस चे डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धोंडेवाडी या गावात जावून तेथील लोकांचे प्रबोधन केले. लोकांना वेगवेगळे चमत्कार विविध भोंदू बाबा-बुवा-बापू-अम्मा-साई यांच्याकडून कसे केले जातात ते प्रात्यक्षिकासह दाखवले.

प्रात्यक्षिके दाखवताना अंनिसचे कार्यकर्ते

प्रशांत पोतदार लंगर अडकवून  दाखवताना

प्रशांत पोतदार लंगर  सोडवून दाखवताना

धोंडेवाडी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन 
करताना अंनिसचे प्रशांत पोतदार


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes