गुरुवार, मार्च ३१, २०११

'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी ?

भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडणी करताना आपण थोड्या संयमाने मांडणी केली पाहिजे. परंतु बहुतांशी लोकांनी या सामन्याला 'लंकादहन' हा शब्दप्रयोग वापरला आहे. त्यात भरीसभर म्हणजे अनेक प्रसार माध्यमानीही 'लंकादहन' असा शब्दप्रयोग वापरून श्रीलंकेचा अपमान केला. जर त्या देशातील लोकांनी किंवा प्रसार माध्यमांनी अशा प्रकारे भडक मांडणी केली तर आपणाला ते रुचेल काय ? मग आपण का दुसऱ्याचा अपमान करणारी, भडक मांडणी करायची. याबाबतीत सर्वानी संयम राखायला हवा. जर ते आपणाला जमणार नसेल तर तर आपण आपल्या महान संस्कृतीचा (?) टेंभा मिरवता कामा नये. 

2 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes