मंगळवार, मार्च १५, २०११

मानवतावादी श्लोक

बघुनी खरे तोंड का फिरवावे!
असत्या इथे का फुका आळवावे!!
हिताकारणे सर्व मानव्यतेच्या!
घडावे झटावे सदा धडपडावे!!
 
नको भेदभावा इथे स्थान देऊ!
नको कोणत्याही अन्यायास साहू!!
नको रे अडू शब्दराशीमध्ये तू !
रुचे ना मना ते नको गीत गाऊ!!

किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा!
किती शब्द प्रमाण मानू  तयांचा!!
इथे भ्रष्ट मानव्यता  ज्यानि केली!
कसा मान राखू अशा देवतांचा!!

- कवी मनोज बोबडे

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes