Friday, March 11, 2011

संभाजीराजांचा मृत्यू मनुस्मृती प्रमाणे ?

संभाजी राजे
छत्रपती शिवरायांनी स्वकर्तुत्वाने निर्माण केलेल्या स्वराज्याची धुरा छ. संभाजीराजांनी समर्थपणे पुढे नेली. गोरगरीब रयतेच्या सुख-दुःखाची जाणीव संभाजी राजांना असल्याने त्यांनी कोणतेही निर्णय घेताना सर्वसामान्य रयतेचा प्रामुख्याने विचार केला. संभाजी राजे हे अतिशय शूर होते. अतिशय कमी आयुष्य लाभूनही त्यांनी जे कार्य केले, जो पराक्रम गाजवला त्यामुळे अनेक इतिहास अभ्यासक ही थक्क होतात. संभाजी राजांनी ज्याप्रमाणे तालावर गाजवली त्याच प्रमाणे लेखणीही चालवली. 
त्याकाळचा समाज हा अत्यंत धर्मनिष्ठ होता. धर्माच्या माध्यमातून ब्राम्हणांनी बहुजन समाजाला शूद्र मानून अनेक हक्क अधिकारासून वंचित ठेवले होते. बहुजन समाज ज्ञानाच्या पवित्र क्षेत्रापासून लांब कसा राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. बहुजन समाजावर धर्मव्यवस्थेचा पगडा आणि धर्मावर ब्राम्हणांचे वर्चस्व अशी एकंदरीत परिस्थिती होती. त्यामुळे सर्वच बाबतीत बहुजनांची कुचंबना होत होती. अशा परिस्थितीत संभाजी राजांनी चार ग्रंथांचे लेखन केले. नखशिख, नायीकाभेद, सातसतक बुद्धभूषण हे ते चार ग्रंथ. यातील बुद्धभूषण हा संस्कृत व इतर तीन हिंदी भाषेत होते. 

ब्राम्हणी व्यवस्थेने शूद्रांना संस्कृत वाचायला, लिहायला आणि बोलायला बंदी घातली होती. परंतु संभाजी राजांनी ही बंदी मोडली आणि ब्राम्हणांच्या वर्चस्वाला शह दिला. त्यामुळे सनातनी ब्राम्हण संभाजी राजांवर नाखुश होते. त्यात संभाजी राजे प्रत्येक निर्णय घेताना ब्राम्हण मंत्र्यांवर अवलंबून न राहता स्वताच्या बुद्धीने निर्णय घेत असत. त्यामुळे ही ब्राम्हण मंत्री जास्त खवळले आणि त्यांचे संभाजी राजांशी सारखे मतभेद होऊ लागले.

संभाजी राजांना औरंगजेबाने पकडले परंतु लगेच मारले नाही. औरंगजेबाने संभाजी राजांना अतिशय हाल-हाल करून ठार मारले. सर्व शत्रूंना औरंगजेबाने एका घावात ठार मारण्याची शिक्षा दिली, मग संभाजी राजांच्या बाबतीतच अशी शिक्षा का दिली याचं विचार कारणे गरजेचे आहे. मनुस्मृती सांगते, जर शूद्राने संस्कृत ऐकले, बोलले किंवा वाचले तर त्याला हाल-हाल करून ठार मारावे. यासाठी मनुस्मृती मध्ये अनेक कठोर शिक्षा दिल्या आहेत. उदा. कान कापणे, डोळे काढणे इ. त्यामुळे संभाजी राजांना मनुस्मृती प्रमाणे ठार मारले नसेल कशावरून ? मग प्रश्न पडतो की औरंगजेब मुसलमान होता, तो संभाजी राजांना मारण्यासाठी मनुस्मृतीचा आधार कसा घेईल ? औरंगजेब मुसलमान असला तरी त्याच्या पदरी असणार्यामध्ये अनेक ब्राम्हण होते. त्यांनी औरंगजेबाला मार्गदर्शन केले नसेल कशावरून ?  

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी याबाबतीत काय भूमिका घेतली आहे तेही पाहू. कोकाटे सर त्यांच्या शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण ? या पुस्तकात म्हणतात, ‘औरंगजेबाने संभाजी राजांप्रमाणे आजपर्यंत कोणालाही ठार केले नव्हते. राजांना एका घावात ठार मारण्य ऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी ? प्रथम राजांची जीभ कापण्यात आली. यावरून असे अनुमान निघते की संभाजी राजांनी संस्कृत वार प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले होते, म्हणूनच प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राम्हण सल्लागारांनी दिला. नंतर राजांचे क्रमशः कान, डोळे, त्वचा काढण्यात आली. ही निर्दय शिक्षा मनुस्मृती संहिते प्रमाणे देण्यात आली.’ 

या बाबतीत अधिक संशोधनाची गरज आहे. संभाजी राजांच्या मृत्यूविषयी सखोल अभ्यास करून सत्य समोर आणण्याची गरज आहे.

31 comments:

Post a Comment

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes