गुरुवार, मार्च १०, २०११

जागण्याचे युग

   जागण्याचे युग! आले आले जागा!
    विवेकाशी दगा! देऊ नका !!


   पिचाल्यांनो आता! दाखवा प्रताप !
   फुका पश्चाताप! सोडोनिया!!

   चेतव ते बळ! अंतरीचे सारे!
    विकृत धुमारे! छातावया!!

   विधी निषेधाचे! संस्कार कुंपण!
   पुढे या त्यागून! स्वत्वासाठी!! 

   झाले बहु झाले! गुलामीत जीणे!
   आता म्हणा गाणे! स्वातंत्र्याचे!!
  
   न्याय समतेला! आपलेसे करा!
   जातीचा पसारा! जाळा त्वरे!!


                     कवी ...मनोज बोबडे

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes