गुरुवार, मार्च ३१, २०११

'लंकादहन ' शब्दप्रयोग कशासाठी ?

भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडणी

मंगळवार, मार्च २९, २०११

भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे

बुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी ? भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.

मंगळवार, मार्च २२, २०११

‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू

प्रा. हरी नरके
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर

गुरुवार, मार्च ०३, २०११

महात्मा फुले यांचे मामा परमानंद यांस पत्र.

मामा परमानंद यांस पत्र.....................
मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर

......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही

मंगळवार, मार्च ०१, २०११

महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?

महात्मा फुले
महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले. 

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes