बुधवार, फेब्रुवारी १६, २०११

संस्कृतीच्या ठेकेदारांची विकृती

सध्या फेसबुक वर प्रबोधन या शब्दाचा विसर पडलेले काही महाभाग सर्रास शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर करू लागले आहेत. बहुजन समाजातील तरुणांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित असलेली क्रांतीची, समाजपरिवर्तनाची चळवळ चालू केली आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला धक्का पोहचेल या भीतीने संस्कृतीचे ठेकेदार बिथरले आहेत. एकदा का माणूस बिथरला की मग तो विचार मांडत नाही तर विकृती निर्माण करतो. आणि याचाच प्रत्यय सध्या फेसबुकवर येत आहे.

फेसबुक वर फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांचा एक गट आणि सनातन हिंदू धर्माचा कट्टर पुरस्कर्ता असा दुसरा गट आहे. या दोन गटामध्ये नेहमी विविध विषयावर चर्चा होत असते. परंतु बऱ्याच वेळा चर्चेची जागा शिव्या आणि अश्लील विकृतीने घेतली जाते. आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या जातात. जातीयवादी टीकाटिप्पणी केली जाते. ज्या शिवरायांनी स्त्रियांना मातेचा दर्जा दिला त्या शिवरायांचे नाव घेवून स्त्रियांचा अश्लील भाषेत उपमर्द केला जातो. अनेक लोक खोटया फ्रोफाईल बनवून त्याद्वारे अशा प्रकारची कामे करत आहेत. आतातर सरळ-सरळ खऱ्या नावानेही शिव्या द्यायला चालू केल्या आहेत. आपण काहीही केले तरी आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही ही गुर्मी निर्माण झाल्यामुळे ते अतिशय खालच्या थराला गेले आहेत. 

बहुजन समाजातील मित्रांना एक विनंती आहे की कुठेही चर्चा किंवा प्रबोधन करताना शिव्या किंवा अश्लील भाषा वापरू नका. कारण तुम्ही शिव्या द्याव्यात यासाठीच जाणीवपूर्वक ही व्यूहरचना केली जात आहे. बहुजन समाजातील लोकांनी रागाने शिव्या द्याव्या, संतापाच्या भरात काहीतरी वेडेवाकडे कृत्य करावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बहुजन बांधव सुज्ञ आहे. काही अपवाद वगळता बहुजन त्याकडे दुर्लक्ष करतो आहे. परंतु अजून आपले काही लोक विनाकारण वाद घालत बसतात. चर्चा करणे वेगळे आणी शिव्या देणे वेगळे. ज्यांना विचार आणि विकृती यातला फरक कळत नाही त्यांच्या नादाला बहुजनांनी लागू नये. कारण तुम्हाला सतत चेतवून शिव्या देण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही लोकांची खास नेमणूक केली गेली आहे. त्यातून त्यांना जे समाधान मिळायचे ते मिळो मात्र त्यांच्या या विकृतीत काही बहुजन मात्र फसत आहेत. सध्या फेसबुक वर शिव्या देणारे किंवा अपप्रचार करणारे जे ग्रुप अथवा पेजेस आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.  

या लेखाचा मुख्य उद्देश आहे तो जे स्वताला आजपर्यंत संस्कृतीचे ठेकेदार समजत होते आणि समाजात मात्र आपल्या विकृतीचे प्रदर्शन करत होते, त्यांची तथाकथित संस्कृती सर्वाना दाखवणे. संभाजी ब्रिगेडवर तर यांचा फार राग आहे. खेडेकर साहेब, कोकाटे सर, प्रविनदादा ही मंडळी यांच्या हिटलिस्ट वर आहेत. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जोपर्यंत हटवला नव्हता तोपर्यंत हे महाभाग शांत होते. कारण यांना वाटत होते की बहुजन कितीही कोकलले तरी पुतळा हटणार नाही. याचे कारण म्हणजे आज पर्यंतचा अनुभव यांच्या पाठीशी होता. एखादी गोष्ट ब्राम्हणांच्या विरोधात जाते हे लक्षात आल्यानंतर सगळे ब्राम्हण जागे होतात. मेडीयाला हाताशी धरून बहुजनाविरुद्ध वातावरण निर्मिती केली जाते. मुख्य मुद्द्याला बगल देण्यासाठी त्याला फाटे फोडले जातात. उदा. दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी मराठा विरुद्ध ब्राम्हण अशा तथाकथित वादाचे चित्र निर्माण केले गेले. वास्तव हे होते की या आंदोलनात सर्वजातीय बहुजन समाज सामील होता. परंतु मराठा समाजाला टार्गेट करून बाकीच्या बहुजनांना त्यांच्यापासून तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या दुर्दैवाने ते प्रयत्न फसले आणि लाल महालातून दादोजी हटले. ही घटना त्यांच्या इतकी जिव्हारी लागली की त्यातून ते अजून सावरले नाहीत. एक प्रकारचे मानसिक नैराश्याने त्यांना घेरले आहे. अशा परिस्थितीत दारू पिलेला माणूस ज्याप्रमाणे तोंडाला येईल ते बरळत असतो त्याच प्रमाणे यांनी फेसबुक वर आपली गटारगंगा निर्माण करायला सुरुवात केली. यांच्या तडाख्यातून बाबासाहेब आणि महात्मा फुलेही सुटले नाहीत. यांनी बहुजन स्त्रियांची आणि मुलींची अश्लील पातळीवर बदनामी केली.  त्या शिव्या किंवा अश्लील संबोधणे उदाहरणादाखल देणेसुद्ध किळसवाणे आहे. परंतु स्वताला उच्च समजणारे, सुसंस्कृत समजणारे आणि जगातील चांगले संस्कार फक्त आपण आणि आपणच उगाळून प्यायलोय असा अहंकार असणारे किती खालच्या पातळीला जावू शकतात त्याची काही उदाहरणे देतो. बहुजनांनी फक्त यांचा खरा चेहरा ओळखावा. 
ही पहा ब्राम्हण एनकाउंटर स्पेशालिस्ट लोकांची लिस्ट. बहुजनांचा आवाज आता शास्त्राच्या नाही तर शस्त्राच्या बळावर दाबला जाईल. तशी धमकीच
आहे आणि बहुजनासाठी इशाराही

 
ही पहा शिव्याविवाहाची पत्रिका...यांची गटारगंगा किती खालच्या पातळीवर जाऊन विकृतीचा आनंद घेवू शकते, त्याचे हे उदाहरण.. 
कोकाटे, खेडेकर यांच्यावर जोक मारून आणि त्या जोक मधून पुरंदरेना मोठे करून काय उपयोग...आज पर्यंत पुरंदरे स्वत कधी आले नाही चर्चेला...कोकाटे सरांचे जाहीर आव्हान आहे...


 
संभाजी ब्रिगेड तर यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष.....

1
2
यांनी महात्मा फुलेनांही सोडले नाही. ज्या महामानवाने आम्हाला स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त केले त्यांच्याबद्दल यांची ही मानसिकता....


बाबासाहेब आणि दलितांचा उपमर्द करण्यातही हे मागे नाहीत. फेसबुक वरील बाबासाहेबांची बदनामी करणारे पेज याचेच उदाहरण आहे.
 
बहुजन स्त्रियांबद्दल यांचा दृष्टीकोन......


 
संस्कृती रक्षकांची विकृती....

या  शिव्या अतिशय घाणेरड्या आणि लाजिरवाण्या आहेत हे ठावूक असूनही मी आपल्या माहितीसाठी दिल्या आहेत. मनुवादी किती खालच्या पातळीला जावू शकतात ते पहा. शेवटी बहुजन बांधवाना एकच विनंती....दुश्मन की चाल समझो....


27 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes