शनिवार, फेब्रुवारी १९, २०११

शिवरायांचा आठवावा विचार...


छ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”.

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०११

शैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्यांची उपेक्षा कशासाठी ?
सावित्रीमाई
तर मित्रानो आजचा विषय तसा गंभीर आहे.  म्हटले तर गंभीर नाहीतर मानवतेला, बुद्धिवादाला ख़तपानी घालणारा  आहे.  बर्याच वेळा आपण आपला मुद्दा पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.  त्यामुले काहीजणांचा  गैरसमज होण्याची शक्यता असते.  तसे पाहिले तर प्रतेक विषय हा बुद्धिवादाच्या कसोटितून घासून पुसून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु  समोरची व्यक्ति त्याच तळमळिने तो विषय समजुन घेतेच असे नाही.  त्यामुळे   गैरसमज निर्माण होऊन दोष माझ्यावर येणार याची जाणीव असून ही मी तो

बुधवार, फेब्रुवारी १६, २०११

संस्कृतीच्या ठेकेदारांची विकृती

सध्या फेसबुक वर प्रबोधन या शब्दाचा विसर पडलेले काही महाभाग सर्रास शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर करू लागले आहेत. बहुजन समाजातील तरुणांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित असलेली क्रांतीची, समाजपरिवर्तनाची चळवळ चालू केली आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला धक्का पोहचेल या भीतीने संस्कृतीचे ठेकेदार बिथरले आहेत. एकदा का माणूस बिथरला की मग तो विचार मांडत नाही तर विकृती निर्माण करतो. आणि याचाच प्रत्यय सध्या फेसबुकवर येत आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०११

लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा

कालच अंधश्रद्धेवर टीका करणारा एक लेख लिहिला. वानखेडे स्टेडियम वर झालेल्या सत्यनारायण पुजेसंदर्भात सदर लेख लिहिला होता. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले तर निश्चितच समाजात चुकीचा संदेश जाईल. 

येडीयुराप्पा
लगोलग अंधश्रद्धेवर हा दुसरं लेख लिहायला घेतलाय त्याचे कारण म्हणजे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या अंधश्रद्धाळू स्वभावाच्या चर्चा जनमानसात होवू लागल्या आहेत. येडीयुरप्पा यांना आपल्यावर काळ्या जादूचा वाईट परिणाम झाला असल्याने अनेक संकटे येत आहेत असे वाटत आहे. त्या काळ्या जादूचा प्रभाव संपवण्यासाठी येडीयुराप्पानी एक नामी शक्कल शोधून काढली आहे. अर्थातच त्यांना ही युक्ती त्यांच्या एखाद्या मांत्रिकाने सांगितली असेल. येडीयुराप्पानी लगेच ते प्रमाण मानून तीन दिवस विवस्त्र अवस्थेत फरशीवर झोपणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आपल्यावरील काळ्या जादुंमुळे आलेले संकट निघून जाईल असे येडीयुराप्पाना वाटते. यापूर्वीही येडीयुराप्पांच्या अंधश्रद्धांची काही प्रकरणे

गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०११

अंधश्रद्धांचे उदात्तीकरण


हल्ली माणसाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगता यायचे नाही. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि त्याविरुद्ध कुणी बोलले, लिहिले कि आमच्या भावना दुखवल्या म्हणून बोंब मारायची हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे माणसांच्या भावनांचा कितपत विचार करायचा याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही कि माणसाच्या भावनेला, त्याच्या श्रद्धेला काहीच किंमत नाही. चांगल्या गोष्टींबद्दल समाजात अनेक जणांची चांगली भावना असते. त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. परंतु समाजातील एखाद्या अनिष्ट रूढीचे, प्रथेचे समर्थन समाज करू लागला तर अशा वेळी मात्र त्यांच्या या भावनेचा विचार करून त्या अनिष्ट रुधीविरुद्ध कुणी बोलायचे, लिहायचे नाही हे कोणत्याही सुज्ञ  माणसाला पटणार नाही.

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes