सोमवार, जानेवारी १७, २०११

कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव

 कराडच्या  आगशिव डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्या
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर'  असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
 (जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. समाजकंटकांकडून त्यातील काही गुंफांचे मूळ पुरातन स्वरूप नष्ट करण्याचे काम अलिकडच्या काळात झाले आहे.- संदर्भ- दै. लोकसत्ता )
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. दरवर्षी ह्या लेण्या पाहायला येणार्यांची संख्या वाढते आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात. आता त्यांची हि श्रद्धा असली तरी त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होते. या बौद्ध लेण्या आहेत हे त्यातील ऐतिहासिक संदर्भ, शिल्पे यावरून दिसून येते. या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग म्हणून या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज मनात रूढ करण्यात आले. आता संपूर्ण डोंगरात कोरलेल्या या ६४ अवाढव्य लेण्या एका रात्रीत आणि तेही केवळ स्वताच्या नखाने कशा कोरणार हा प्रश्नच आहे. बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आगाशिव परिसरातील या लेण्या म्हणजे कराडचे सांस्कृतिक वैभव म्हणायला हरकत नाही.
यापैकी काही लेण्या पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. तरीही बर्याच लेण्या सुस्थितीत आहेत. त्यांचे सरकारने नीट जतन केले पाहिजे. अजंठा-वेरूळ प्रमाणे कराड च्या या लेण्यांचा विकास केला, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित केले तर निश्चितच कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल. त्यादृशीने या आगाशिवच्या  बौद्ध लेण्यांच्या परिसरात एको टुरिझम प्रकल्प राबवण्याची घोषणा सरकाने केली आहे. यासंदर्भातील दै. लोकसत्ता मधील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. परंतु सरकारची हि घोषणा प्रत्यक्ष कृतीत कधी उतरते याचीच वाट कराडची जनता पाहत आहे.
या आगाशिव च्या बौद्ध लेण्यांची काही छायाचित्रे आमच्या ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे. एकूण लेणी ५२ आहेत. त्यापैकी काही लेण्यांचे फोटो देत आहे.बौद्ध धर्मातील सिंहाची मुद्रा

अशोकचक्रबौद्ध भिक्कुंच्या पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात आलेले हौद3 टिप्पणी(ण्या):

Dr Param Anand म्हणाले...

Namo Buddhay !

We have started Nationwide awakening mission called as "Save Buddha Mission". This work is being done through an organisaion "Bharat Leni Sanwardhan Samittee" ..

I will be grateful if you can call me on my cell no 8805460999. or sms me your no I will call you.

Dr Param Anand,
anandparam79@yahoo.com

नवनाथ धांडोरे म्हणाले...

great इन्फ़ो

Rupesh म्हणाले...

पुरातत्त्व खात्याने याकडे laksh द्यायला पाहिजे आता तर स्थानिक गावातील लोकानी बौद्ध लेण्या मध्ये विठ्ठल मंदिर उभारले आहे.. सर्व ना माहीत आहे त्या लेण्या बुद्ध अनुयायी यांनी बांधल्या आहे काही जण त्यांना पांडव लेणी म्हणुन दाखवत आहेत त्याला कोणताही आधार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes