गुरुवार, जानेवारी २७, २०११

महाराष्ट्राचा बिहार होतोय ?

यशवंत सोनवणे
खरंतर महाराष्ट्राची बिहारशी केलेली तुलना अनेकांना आवडणार नाही. परंतु गेली अनेक वर्षे बिहार मध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे तथाकथित माफिया आणि धनदांडग्या लोकांकडून काढले जात होते ते पाहता आता महाराष्ट्रात हि बिहार सारखी परिस्थिती निर्माण होते कि काय असे वाटू लागले आहे. २५ जानेवारी रोजी सर्व देश   दुसर्या दिवशीच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना नाशिक जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. मालेगाव चे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांची माफियांनी जिवंत जाळून हत्या केली.
एकीकडे प्रजासत्ताक भारताचा गौरव करत असताना प्रजासत्ताक भारतामध्ये राज्य प्रजेचे आहे कि या माफियांचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोनावणे यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी आहे. रॉकेल-डीझेल माफियांच्या टोळीवर कारवाई करायला गेलेल्या सोनावणे यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्या माफियांच्याकडे इतके धैर्य कशामुळे आले ? त्यांच्या मागे कोणकोणत्या शक्ती आहेत त्याचा तपास झाला पाहिजे. कारण चार-दोन लोकांना पकडून त्यांना शिक्षा झाली म्हणजे सोनावणे यांना न्याय मिळाला असे होणार नाही. सोनावणे यांनी जी भेसळ रोखण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वताच्या प्राणाचे बलिदान दिले ते ध्यानात घेवून भेसळ करणाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे.


आज देशात सर्वत्र वाळू तस्करी, रॉकेल-डीझेल भेसळ, शस्त्रास्त्र विक्री या माध्यमातून गब्बर झालेल्या लोकांचा एक वर्ग निर्माण झाला आहे. या अनैतिक मार्गाने भरपूर पैसा आणि सत्ता मिळत असल्याने हे लोक मुजोर झाले आहेत. त्यांना न कायद्याची भीती ना पोलिसांचा धाक. बर्याच लोकांना राजकीय वरदहस्त असल्याने ते काळे धंदे करूनही समाजात ताठ मानेने वावरत असतात. पैसा आणि सत्ता यांची एक नशा अशा  लोकांना चढलेली असते. ती नशा उतरवण्याचे काम खरेतर पोलीस आणि न्यायालय यांचे आहे. अशा नालायक लोकांना वेळीच लगाम घातला नाही तर ते डोक्यावर बसतात आणि मग अशा लाजिरवाण्या घटना घडतात. पोलिसांनी वेळीच अशा कृत्यांना पायबंद घातला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधींनी  सहाय्य केले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचा तथाकथित बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

18 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

maharashtrachi vatchal biharchya dishene chalu ahe. bihar sudharala pan maharashtrachi parishtiti ajun bighadat chalali ahe. asha ghatana ghadalya ki jivan nirarthak vatu lagate.

Pramod म्हणाले...

mafiya lokana bhar chaukat chabakane fatake marale pahijet. Sarkar la laj vatayla pahije eka collector la jivant jalun marale jate tehi divasa.

एक सामान्य मराठी माणूस म्हणाले...

मला एक कळत नाही की महाराष्ट्रात अशा घटना घडायला लागल्या तर आपल्या राज्याची काय इज्जत राहिली ? पोलीस आणि महाराष्ट्र सरकारने अशा लोकांना अजिबात दया-माया दाखवता काम नये. या नालायक माणसाना फाशीची शिक्षाही कमी पडेल.

अनामित म्हणाले...

ASHA NARADHAMANA FASHICHI SHIKSHAHI KAMI PADEL. TYANA SWARGAT TAR NAHICH PAN NARAKAT HI JAGA MILANAR NAHI. MAHARASHTR SARKAR ANI POLICE PRASHASAN YANCHI DESHBHAR NACHAKKI ZALI AAHE. AATATARI PRASHASANANE LAKSH DEVUN YA MAFIYANCHYA MUSAKYA AVALAVYAT.

Prakash Pol, Karad. म्हणाले...

शहीद यशवंत सोनावणे ह्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात नाही ह्याचे दुख वाटते - शहीद यशवंत सोनावणे ह्यांची पत्नी.

परंतु भीमसेन जोशी ह्यांच्या अंत्यविधीला मात्र शासकीय राईफल मधून फुकटच्या गोळ्या हवेत फायर केल्या, का तर म्हणे राष्ट्रपदी पदक मिळाले होत .........
शहीदांपेक्षा बक्षिसं मिळालेले गायक मोठे वाटतात ह्या सरकारला !!
ह्यातून सरकार काय .........आदर्श ठेवत आहे ??

राकेश कुलकर्णी म्हणाले...

अहो पोळ साहेब, काय बोलता हे . तुम्हाला पंडित जी ची अलर्जी का ? जरातरी लाज बाळगा. की कमरेचे काढून डोक्याला गुंडाळण्याची सवय आहे.

Prakash Pol, Karad. म्हणाले...

कुलकर्णी साहेब, तुम्हाला राग लगेच येतो...भीमसेन जोशींना सन्मान मिळाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. उलट तसा सन्मान शहीद यशवंत सोनवणे यांना का मिळाला नाही असा आमचा सवाल आहे. या दोन्ही लोकांचा मृट्यू च्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन यांनी कसा भेदभाव केला आहे ते आम्ही सांगतोय. बाकी शहीद सोनवणे सरांच्या पत्नीनेही ही खंत बोलून दाखवली की शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. आपल्या देशात खऱ्याखुऱ्या हिरोंना काहीही किंमत नाही हेच आपल्या प्रशासनाने दाखवून दिले.

अनामित म्हणाले...

sonawane na maarnare kon hote te ka naahi bolat tumhi lok, naahitar marathyache madake phutel na. aamhi dalit aahot mhanoon tumhi maratha vatel tase aamchyavar julum karata. are tya bamanaparis tumhi lok harami haat. eetke dis satta chatali aata besharampane kota boltaay, tumchya saarkhya marathyanich vaat lavali saglyanchi.

प्रकाश पोळ, कराड. म्हणाले...

@Anonymous-
ज्याअर्थी आपण निनावी प्रतिक्रिया दिली त्याअर्थी आपण आपली ओळख लपवत आहात हे दिसून येते. चुकीच्या नावाने किंवा निनावी प्रतिक्रिया देवून बहुजन समाजात गैरसमज पसरवायचे हे आपले धंदे आहेत आणि ते आम्हाला चांगले माहित आहेत. यशवंत सोनावणे यांच्या हत्येप्रकरणी कोणीही दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कुणाच्या मताची गरज नाही. सोनावणे यांचे मारेकरी बहुजन असोत वा आणखी कुणी, त्यांनी जो अपराध केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचा मी आहे.

Harshwardhan म्हणाले...

@ प्रकाश
यशवंत सोनावणे यांच्या बलिदानाचा सगळ्यांना आदर वाटलाच पाहिजे. त्याबद्ल कोणाचेहि दुमत असु नये. पण त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करताना एका व्यक्तीवर फक्त त्यांचे आडनाव जोशी आहे म्हणुन का अनाठायी टीका करावी? ् होम मिनिस्टर तर ब्राम्हण नव्हते ना? तुम्ही त्यांना का
जाब विचारत नाही?

prathamesh patil म्हणाले...

सोनावणे यांची हत्या जरी बहुजनांनी केली असली तरी त्यापाठी जातीय द्वेष नव्हता हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बहुजनांमध्ये जी भांडणे होतात ती फक्त तात्कालिक कारणांवरून होतात. पिढ्यानपिढ्या जातीय द्वेष निर्माण करत राहणे आणि तो इतरांच्या डोक्यात भिनवत राहणे ही कामे बहुजनांची नव्हे तर ब्राह्मणांची आहेत. म्हणूनच हिंदुत्वाचा वापर करून "जोशी" मुख्यमंत्री बनतात, "सोनावणे" बनत नाहीत.

Harshwardhan म्हणाले...

@prathamesh patil
जोशी मुख्यमंत्री किती वर्ष होते?. साडे चार. बाकीचे सगळे कोण होते आणी आहेत? चव्हाण, पाटिल, शिंदे, देशमुख, पवार, नाईक किती काळ मुख्यमंत्री होते? मंत्रिमंडळात किती ब्राह्मण मंत्री आहेत?

प्रकाश पोळ, कराड. म्हणाले...

@Harshwardhan -
Bhimsen Joshi yana sanman milala mhanun ajibat vaait vatat nahi he mi aadhich lihile aahe. sonawane aani joshi yanchya mrutyuchya ghatana ekach kalat ghadalya asalyane tulana keli itakech. mazi aadhichi pratikriya vacha....भीमसेन जोशींना सन्मान मिळाला म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. उलट तसा सन्मान शहीद यशवंत सोनवणे यांना का मिळाला नाही असा आमचा सवाल आहे. या दोन्ही लोकांचा मृट्यू च्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन यांनी कसा भेदभाव केला आहे ते आम्ही सांगतोय.

Samir म्हणाले...

Hello Prakash,
i think you are not following Yaswant sonawane case.CBI reported recently that Popat shinde and Yashwant sonawane were having nexus in Oil theft. and yashwant sonawane become greedy and popat shinde burnt him in anger. its good that he didnt receive state honour cremation.
Samir Deshpande

shrawan deore म्हणाले...

प्रकाश जी,
आपण सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ साठी आपण सह्लाद्री बाणासारखी वेबसाईट बनण्यासाठी मदत करावी

अनामित म्हणाले...

Prakash,

what are your comments about this news?

http://www.dnaindia.com/mumbai/report_cbi-frowns-on-yashwant-sonawane-victim-tag_1597831

If this news is true, then your point is no longer valid.

अनामित म्हणाले...

AS MAHARASHTRAT PANCHAYATIPASUN /MANTRIMANDALAPARYNAT GELI 60 WARSHE MARATHA SAMAJ APLI POLI BHAJUN GHET AHE.
ITAR JATI ATA SATTET WATA MAGU LAGLYA AHET.MARATHA WA MARATHETAR SANGHARSHA ATA TIWRA HONAR AHE.
MARATHYANA ITAR LOKANA SATTA DYAWI LAGEL.
(BAHUJAN SWATALA MHANAWATA PAN MUKHYAMANTRI/UPMUKHYAMANTRI MARATHACH KA LAGTO?)

KRUPAYA OBC/DALIT/BRAHMAN/MUSALMAN YANI EK YEUN

MAHARASHTRAT MARATHA SAMAJALA PURYAY NIRMAN KELA PAHIJE

(EK OBC TARUN)

अनामित म्हणाले...

MARATHA HATAW MAHARASHTRA BACHAW.

KAHI WARSHA MARATHYANI SATTA SODUN DALIT /OBC NA

SATTA DYAWI.MUG BAGHA KASHI SHANTATA YEIL.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes