गुरुवार, जानेवारी २७, २०११

इडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येवू दे....

हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग.......
जीवघेण्या संघर्षातही ज्याचे हृदय स्वच्छ आणि मस्तक ताठ राहिले ...
असा तो हिरण्यकशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता...
सात काळजाच्या आत जपून ठेवावा , असा निरागस 'माणूस'...


भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व....
सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षा पूर्वी होऊन गेलेला एक महानायक, महासम्राट,एक महान तत्ववेत्ता..


आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा.....
कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ - निरागस मनाने समोर जाणारा...
पराभवातही पराभूत न होणारा..शांतचित्त तत्ववेत्ता..


हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग.......
इतका जिवलग की , सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग.....बळीराजा.....बळीचे राज्य...
या बळीचा वंश, तो बळीवंश. या बळी वंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे...


त्यांच्या पद्धतीने जगणे हे तर खरे जगणे आहेच, पण त्यांच्या पद्धतीने मरणे हे देखील मरण्याचे सार्थक आहे..
कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये बळी चा अंश आहे....गरज आहे फक्त तो अंश ओळखण्याची....आपल्या तत्वांसाठी बळी राज्याप्रमाणे ताठ उभे राहण्याची...
ह्या मिथ्या जगात सत्य आणि खऱ्या तत्वांना कायमच नावे ठेवली जातात..कायमच सत्य आणि तत्व निष्ठ माणसांना त्रास दिला जातो....


अश्या काळात...गरज आहे ती बळी राजा प्रमाणे लढण्याची..त्याच्या बलिदानामुळेच आज तुमच्या आमच्या मध्ये अजूनही अन्याया विरुद्ध लढण्याची ती ठिणगी आहे..
बळीचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता.. आपल्यातील लहानग्या ठिणगीचे रुपांतर मोठ्या ज्वालेत करूयात ...अन्याया विरुद्ध त्वेषाने उभे राहून ..परत एकदा बळीचे राज्य आणुयात......
ज्या राज्यात..सर्वांना समान न्याय असेल...कष्टाला जिथे नावाजले जाईल..जिथे मिळणाऱ्या फळामध्ये कुठल्याही प्रकारची असमानता नसेल..जसे कष्ट तसेच फळ मिळेल...
हजारो वर्षे ज्यांनी निव्वळ शांत बसण्यात घालवलीत.. आत्ता वेळ आलेली आहे.. उठून क्रांती घडवायची...बळीच्या बलिदानाला जागायची....

आत्ता बळीराज्य आल्या शिवाय शांत बसायचे नाही...आपल्या जिवलगाचे.., बळीचे.... रोज स्मरण केल्या शिवाय राहायचे नाही....बळीचे राज्य आल्या शिवाय आत्ता खरतरं झोपायचेच नाही...
बळी राज्य....लवकरच यावे अशी एका सामान्य बळीवंशजाची इच्छा...

9 टिप्पणी(ण्या):

मधुकर म्हणाले...

प्रकाश,
एकदम भारी.
आता हा बदल झालाच पाहिजे.
असच लिहत रहा.
शुभेच्छा.

Gajanan Shripad Kulkarni म्हणाले...

हा बळीराजा नेमका दिसायला कसा होता? जर दिसणारा असेल तर तो नक्कीच ब्राम्हण असला पाहिजे...!!!!
ढिंच्यांग ढिच्यांग

manu म्हणाले...

बघितलीत मुजोरी? आले पुन्हा त्याच श्रेष्ठत्वाच्या धरतीवर? हा वृथा आव कशासाठी गजाननजी? या मूर्खपणाच्या श्रेष्ठत्वाला काही सीमा नको का?

अनामित म्हणाले...

बळीराजा हा बहुजन असल्यामुळे बामन वामनाने त्याला पाताळात घातले म्हणजेच कपटाने ठार केले. आणि आपणही वामनाची पूजा करून बळी चा धिक्कार करतो. उठा बहुजानानो, जागे व्हा आणि बळीच्या स्मृतीना माविन पालवी फुटू द्या.

अनामित म्हणाले...

Mahatma bali ani vaman he don paraspar virodhi vicharanche, sanskrutiche samarthak ahet. Jar apanala baliraja pujniy asel tar vaman apala dev kasa? Ani vamanachi arya/vaidik/bramhani/sanatan sanskruti apali sanskruti kashi? Baliraja asur hota, mag asurach apale purvaj nahit ka? Vichar kara...

अनामित म्हणाले...

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
-महात्मा जोतीराव फुले.
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||
-महात्मा जोतीराव फुले.

अनामित म्हणाले...

To Gajanan Shripad Kulkarni Are gadhva Bapala visarlas ka.Tumcha baap hota baliraja, kasa disto to vichartos. RSS chya chat jaa. RSS mhanje Ramdasi seva sangh hoy, Mazya mitarane Sudershan la chppal fekun marli hoti.

Saish Dipankar म्हणाले...

ida pida talo; bali rajache rajya yevo !

अनामित म्हणाले...

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील महाबलींचेच राज्य आहे तरी महाराष्ट्राची पिडा जात कशी नाही?

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes