शनिवार, जानेवारी २२, २०११

बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज

बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब  पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे संपादक प्रा. ज्ञानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.

मी साधारणपणे पाच वर्षापूर्वी पुरंदरेची कादंबरी प्रथम वाचली. पुरंदरेच्या कादंबरीत इतकी शक्ती आहे मी मुस्लिमद्वेषाने पेटून उठलो. पुरंदरेची कादंबरी वाचणारी व्यक्ती मुस्लिमाना शिव्या घाताल्याशिवाय राहणार नाही, इतका या कादम्बरीत मुस्लिमद्वेष भरला आहे. शहाजी राजाना बाजुला ठेवून जिजाऊ, शिवराय आणि दादू कोंडदेव हे एक समीकरण पुरंदरेनी तयार केले आहे. शहाजी राजाना नेहमी गैरहजर दाखवायचे आणि दादू कोंडदेवाला जिजाऊ शिवरायासोबत दाखवणे यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप होते? जेम्स लेनने जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्याच्या आधी त्याची बीजे पुरंदरेनी आपल्या कादंबरीत रोवली होती. जेम्स लेनद्वारे जिजाऊ-शिवरायांची बदनामी म्हणजे पुरंदरेच्या त्या बीजाचा वृक्ष होउन त्याला लागलेली नासकी फळेच होत. 

सोलापूर येथे जेम्स लेन चे कौतुक
सोलापूर येथे झालेल्या जनता बँक व्याख्यान मालेत जेष्ठ शिवशाहीर (?) बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन चे कौतुक केले होते. जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार पुरंदरे यांनी काढले होते. जेम्स लेन ने शिवराय आणि जिजाऊ यांच्याबद्दल जो गलिच्छ मजकूर लिहिला तो पुरंदरे यांना दिसला नाही का ? पुरंदरे यांनी हिंदू किंग : इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक न वाचताच त्याची तरफदारी कशी काय केली ?


राजा शिवछत्रपती कादंबरीत पुरंदरेनी उधळलेली मुक्ताफळे-
 
" शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... "

मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) (संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/  )

हे लिखाण म्हणजे पुरंदरे यांच्या मनाच्या कल्पना नाहीत का ? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का ?उलट हे विकृत लिखाणाचा पुरावा नाही का ? 

पुरंदरेंचा माफीनामा
शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबासाहेब पुरंदरे होते. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब्रुवारी हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली. याच पुरंदरेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साळगावकरांना पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद बाबा साहेब  पुरंदरेनीच लावला .देशभर जगभर एकदाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरंदरेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला . त्याबद्दल त्यांना संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर तालुका अध्यक्ष अमरजीत पाटील यांनी विचारणा केली असता पुरंदरे यांनी  माफी मागितली.

 

 

 बाबासाहेब पुरंदरे बद्दल नामवंत इतिहासकारांचे मत-

बाबासाहेब  पुरंदरेबद्दल नामवंत इतिहास करांचे म्हणणे मी संदर्भासहित देत आहे आपण सर्वांनी त्याचा शांत मनाने विचार करावा.

१)सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र नेमाडे "शिवाजी महाराजांसोबत नुर्बेग ,दौलतखान सिधीहीलाला मदारी मेहतर इब्राहीम खान हि मंडळी होती.मात्र बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडात यांचे कधी नाव आलेच नाही. पैसे मिळतील म्हणून जसा मुद्रांक छापायचा प्रकार जसा त्याला संरक्षण देणाऱ्याच्या अंगावर उलटला इतिहास लेखनात झालेले प्रकारही असेच उलटतील शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने बांधलेली हि चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे, अशा गोष्टी दूर केल्याशिवाय आता आपल्याला महासत्ता होता येणार नाही"
संधर्भ -नेमाडे भालचंद्र 'चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यावर भिंत कोसळत आहे '
लेख दैनिक लोकसत्ता ,दिनांक १ जाने 2004

 
२)प्रसिद्ध प्राच्यविद्यातज्ञ व मार्क्स फुले आंबेडकरवादी विचारवंत कॉ. शरद पाटील "एका बाजूला शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून भाबड्या शुद्रतीशुद्राना नादाला लावायचे आणि दुसर्या बाजूला शिवाजी महाराजांना बदनाम करायचे. यात सर्वात वाकबगार शिवशाहीर पुरंदरे आहेत " 
संदर्भ-पाटील शरद ,'शिवाजीचे पितृत्व व अब्राम्हनी विमोचन संघर्ष 'शोधनिबंध पान
 
३)सुप्रसिद्ध इतिहास संशोध्कार सेतुमाधवराव पगडी यांनी पुरंदरेला इतिहास संशोदक ठरविनार्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे ते म्हणतात "आता मला लोक विचारतात, काय हो
पुरंदरेच्या शिवचरित्र बद्दल तुमचे काय मत आहे ?त्याला मी एकाच उत्तर देतो. पुरंदरे स्वतः म्हणतात कि'हे शिव्चारीरा म्हणजे इतिहास न्हावे ऐतिहासिक साधनावर आधारलेली बखर आहे,आणि मी शाहीर आहे .' असे असून सुधा आपण त्यांच्या मागे लागतो इतिहाससंशोधक काय म्हणतात म्हणून . हा त्यांच्यावर अन्याय आहे"
संदर्भ- पगडी सेतू माधवराव पूर्वोक्त पान 11

४)थोर इतिहासकार त्र्यं. श. शेजवलकर
पुरंदरेचे लिखाण अतिशयोक्त असल्याचे सांगून 'ब मो पुरांदारेचे राष्ट्रीय स्वयंसेवकी विचार 'या शिर्षकाखाली पुरंदरेच्या विचारसरणीवर प्रकाश टाकतात
संधर्भ - शेजवलकर त्र्यं. श.पूर्वोक्त पान ५०३
असे बरेच इतिहासकार आणि विद्वान यांच्या विचारावरून
पुरंदरेची विचार सारणी व दर्जा सर्वांना समजू शकतो 

प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या कादंबरीला " भटी शिवचरित्र " म्हटले आहे. 

---------------------------------------
   
(संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/  )
 

पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.

१. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
२. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
३. दादोजी कोंडदेव पुरस्करासंदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर करू शकले नाहीत?
४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
5. जेम्स लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसण्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या विषयावर परिसंवाद ठेवला होता.  यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वतः समविचारी संघटनांच्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?

अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.

बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा , उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे सत्य धक्कादायक असेल. वाचकानी आपल्या प्रतिक्रया जरुर द्याव्यात.

79 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes