शुक्रवार, जानेवारी १४, २०११

स्पर्धा परीक्षा संमेलन : बौद्धिक मेजवानी

डॉ. विश्वनाथ कराड, विश्वास पाटील, पृथ्वीराज चव्हाण,  डॉ. आनंद पाटील
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तरुणाईत कमालीची क्रेझ आहे. सनदी अधिकारी, सरकारी अधिकारी, त्यानं मिळणारा मन तरुणीला आकर्षित करतो. त्यांच्यात सेवाभावाच बीज रुजवतो. या परीक्षेसाठी कठोर मेहनतही घ्यावी लागते. यासाठी महाराष्ट्रात डॉ. आनंद पाटील यांच्या स्टडी सर्कल ची २२ केंद्र कार्यरत आहेत. ह्यातून दरवर्षी २० हजार प्रशिक्षित परीक्षार्थी तयार होत असतात. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने एप्रिल २००१ मध्ये पाहिलं स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यात झालं. संमेलनासाठी अनेक सनदी अधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे मंत्री वक्ते म्हणून आले होते. या अधिवेशनाचं उद्घाटन डॉ. विश्वनाथराव कराड, पानिपतकार व जेष्ठ सनदी अधिकारी विश्वास पाटील, तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालं. आता दुसरं संमेलन ८ व ९ जानेवारीला औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहात पार पडलं. आयोजक डॉ. आनंद पाटील हे बर्लिन पासून मुंबई पर्यंतच्या मेरेथोनमध्ये हिरीरीने भाग घेतात. त्याचाच दाखला देवून ते म्हणाले कि, ‘तळागाळातून आलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची मेरेथोन जिंकावी, यासाठीच तर संमेलनाचं आयोजन केलंय.’ (संदर्भ- साप्ताहिक चित्रलेखा.)

स्पर्धा परीक्षेविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड आढळतो. स्पर्धा परीक्षेची त्याने इतकी धास्ती खाल्लेली असते कि ‘हे आपलं काम नव्हे...’ अशी त्याची ठाम समजूत झालेली असते. त्याचे कारण म्हणजे शासन किंवा संबंधित यंत्रणा स्पर्धा परीक्षेविषयी जागृती करण्यात कमी पडत आहेत. सुदैवाने अलीकडच्या काही वर्षात स्पर्धा परीक्षांविषयी असणारी ही अनाठायी भीती हळूहळू दूर होत आहे. तरीही ग्रामीण विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेचे पुरेपूर ज्ञान नाही हे वास्तव आहे. समाजातील हे वास्तव ओळखून सडी सर्कलचे प्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी अनोखे स्पर्धा परीक्षा संमेलन आयोजित केले आहे. स्पर्धा परीक्षा संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारे बरेच गैरसमज दूर होण्यास मदत होईल. कारण ऐकीव माहितीच्या आधारे आपण बरीच चुकीची मते बनवत असतो. आणि त्याला खतपाणी घालणारी माणसंही समाजात आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांविषयीचा गैरसमज अधिकच बळकट होतो. परंतु जर स्पर्धा परीक्षा संमेलने झाली तर त्या ठिकाणी अनेक सनदी अधिकारी, अनुभवी व तज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळू शकेल. आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होवू शकतो.  त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेत उज्वल कामगिरी करतील अशी अशा बाळगूया.

स्टडी सर्कल आणि डॉ. आनंद पाटील यांच्या संपूर्ण टीम ला या अनोख्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.

1 टिप्पणी(ण्या):

Swapnil Sawant म्हणाले...

mi pan spardha parikshechi tayari karatoy. mala study circle chi detail havi hoti.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes