बुधवार, जानेवारी १२, २०११

जिजाऊ वंदना

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात् वात्सल्य नामी||
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या सावूली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी||
जिजा माऊली गे ...
तुझ्या धाडसाचे धड़े हे आम्हाला,
तुझ्या विचारांचे घड़े सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही||
जिजा माऊली गे ...
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दु:ख कोणास काही नसू दे;
नसू दे; अनारोग्य अंधार यामी||
जिजा माऊली गे ...
तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ व्हावा;
घडो अंत तो शांत सफल्यगामी||
जिजा माऊली गे ...
जय जय जिजाऊ - जय जिजाऊ


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes