बुधवार, डिसेंबर २९, २०१०

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी जातीचे राजकारण चालू आहे ?


दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी हिंदुत्ववादी पक्ष, संघटनाना जातीयवादाचा वास यायला लागला आहे. दादोजी कोंडदेव हे ब्राम्हण असल्यामुळे संभाजी ब्रिगेड व इतर संघटना त्यांच्या पुतळ्याला विरोध करत आहे अशा प्रकारचा चुकीचा समज सामान्य लोकांच्या मनात रुजवण्याचे षडयंत्र पध्दतशीरपणे राबवले जात आहे. त्यामुळे खरोखर दादोजी कोंडदेवच्या आडून सर्व ब्राम्हणांना लक्ष करण्याचा संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा किंवा तत्सम संघटनाचा डाव आहे का ? या प्रश्नाचा निट उहापोह होणे गरजेचे आहे.
इतिहासातील पुरावे काय सांगतात ? तर दादोजी कोंडदेव हे आदिलशहाच्या कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार होते. शिवभारत, जेधे शकावली, बुद्धभूषण, जेधे करीना आदी समकालीन कागदपत्रात दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु आहेत असा साधा उल्लेखही नाही. त्यामुळेच कोणत्याही इतिहासकाराला दादोजी कोंडदेव यांचे गुरुत्व सिद्ध करता आले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे ते शिवरायांचे गुरु नाहीत हेच सिद्ध होते. त्याच बरोबर जेम्स लेन ने लिहिलेल्या पुस्तकातील बदनामीकारक मजकुराच्या पार्श्वभूमीवर दादोजी कोंडदेव याचा अनैतिहासिक पुतळा जिजाऊ आणि बाल शिवाबाबरोबर कशला ? असा बहुजनांचा सवाल होता. जिजाऊंच्या चारित्र्याबद्दल महाराष्ट्रातील कोणत्याही बहुजनाच्या मनात कोणताही किंतु नाही. मग जेम्स लेन च्या लिखाणामुळे दादोजींच्या पुतळ्याला विरोध कशासाठी ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी महात्मा फुले काय म्हणतात ते लक्षात घेणे महत्वाचे ठरेल. फुले म्हणतात, “मासा पाणी खेळे, कोण गुरु असे त्याचा”. त्याच प्रमाणे कोल्हापूर चे राजर्षी शाहू महाराज यांनी क्षात्र जगतगुरू पदाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात ते म्हणतात, दादोजी कोंडदेव आणि रामदास यांना शिवरायाच्या गुरुपदी थोपवण्याचा प्रयत्न ब्राम्हणांनी केला आहे.
त्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटके आदिमधून दादोजी कोंडदेव चा इतका उदो-उदो केला गेला कि शिवरायांचे गुरु दादोजी कोंडदेव हे वैश्विक सत्य होऊन बसले. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटके आदिमधून शहाजीराजांना अनुपस्थित दाखवणे, दादोजी कोंडदेव यांची उपस्थिती दाखवणे इ. गोष्टी याच षडयंत्राचा भाग होत्या. त्यामुळे लोकांना शहाजीराजे कमी आणि दादोजी कोंडदेव अधिक माहित झाले. शिवरायांच्या जीवनात शहाजी राजांचे जे कर्तुत्व होते त्याला अतिशय गौण स्वरूप देण्यात आले. आणि त्यानंतर जेम्स लेन चे वादग्रस्त पुस्तक आले. जेम्स लेन च्या पुस्तकाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संतापाने टोक गाठले आणि बहुजन इतिहास संशोधक कामाला लागले, शिवरायांच्या जीवनात दादोजींचे स्थान नक्की काय ? त्यानंतर अनेक कागदपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज इ. गोष्टींचा अभ्यास करून इतिहास संशोधकांनी दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु नसल्याचे जाहीर केले. त्यांचे पुरावे अजून तरी कोणत्या इतिहासकाराने खोडून काढले नाहीत. मग असे असताना जातीच्या आधारे नाहीतर इतिहासातील पुराव्याच्या आधारे दादोजींच्या पुतळ्याला बहुजनांचा विरोध आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वछ असताना बहुजनांच्या आंदोलनाला जातीयवाद म्हणणे कितपत संयुक्तिक आहे ? पण ज्यांच्या मनात आणि नसानसात जात भिनली आहे त्यांना हे सांगणे म्हणजे आळवावरील पाणी आहे. स्वजातीच्या कोशातून बाहेर येवून सर्वानी विचार करावा. बहुजनानीही स्वताच्या डोक्याने विचार करावा. किती दिवस दुसऱ्याच्या हातातील शस्त्र बनणार. कारण शस्त्राला डोकं नसतं, ते शस्त्र ज्याच्या हातात आहेत ते तो त्याच्या डोक्यानी चालवत असतो. म्हणून बहुजानानो स्वताचा मेंदू वापरा आणि विचार करा. शिव छत्रपतीच्या आणि आई जिजाऊंच्या बदनामीचा निषेध आपण नाही केला तर त्याची किंमत आपल्या भावी पिढ्यांना मोजावी लागेल. कारण अजून खोटा इतिहास त्यांच्या माथी मारला जाणार. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि इतिहासातील विकृतीला विरोध करा.

5 टिप्पणी(ण्या):

Ankur म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
pravin म्हणाले...

brahminism khte kiti bemalun pane pasarawate yacha ha purava.thanyat sena karyakrtyani brigade cha karyakatyanvar halla kela teva brahmani media ne janu kahi shiv sene ne dakuna thopawale asha batmya dilya.amachach lokana tyanche hatyar banvun thevale ahe.

मंदार म्हणाले...

Ramdasala hi dhunganawar lath marun hakla.
yaat galichha jatiyawad disat nahi ka Prakash tumhala?

tumhi mandaleli tatastha bhumika atishay yogya ahe ani dadoji konddeo he guru navate tar tasa putala asanyacha karan nahi.. pan te brahman hote mhanun putala kadhala pahije tar nakki jat madhye yete ahe.
yacha uttam udaharan ha varacha ghanerada pratisad.

मंदार म्हणाले...

एकतर आपले कसे बरोबर आहे हे तरी पटवून द्यावे किंवा चूक होत असेल तर ती स्वीकारून दुरुस्ती तरी करावी. आणि मला वाटते जी चळवळ होणाऱ्या चुकांपासून बोध घेत पुढे जाईल तीच समाजात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणेल.

he tumche vakya mala far jabardast vatale mhanun ithe pratikriya dyavishi vatali.. dhanywad

Prakash Pol म्हणाले...

@Mandar- धन्यवाद मंदार जी, दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते बाब आता सर्वमान्य झाली आहे. दादोजींचे समर्थक असणारे बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंग बलकवडे यांनीही हि गोष्ट मान्य केली आहे. दादोजी प्रकरणाला जातीय वळण लागले हे मान्य करूनही दोन्ही बाजूनी संयमाने वाटचाल करणे गरजेचे आहे. दादोजींचा पुतळा काढण्यामागे ते ब्राम्हण होते हे कारण नाही तर, त्यांच्या तथाकथित गुरुत्वाचा वापर करून काही लोक शिवचरित्राची बदनामी करत होते. पण आता सामोपचाराने तो प्रश्न निकालात निघाला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वरील अंकुर या व्यक्तीने रामदास यांच्याबद्दल जी घाणेरडी कॉमेंट केली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. रामदास यांचे विचार पटो अथवा न पटो, त्यांच्या विचारावर मतभेद होऊ शकतात पण अशा प्रकारे कुणाचीही बदनामी करू नये याच मताचा मी आहे. आणि हे तत्व मी सह्याद्री बाणावर लिहिताना कसोशीने पाळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes