शुक्रवार, डिसेंबर ३१, २०१०

विवंचना

काय होतास तू ? काय झालास तू ?
गतवैभवाच्या खुणा लक्षात घे,
काळाच्या पुढे धावण्या समर्थ हो,
अपयशाने खचू नकोस,
सामर्थ्य मिळवण्यासाठी धडपडायला कमी पडू नकोस,
यश वाटते तितके सोपे नसते,
घाम गळायला मात्र विसरू नकोस,
आहे तुझ्यातही ती कुवत,
फक्त जिद्द सोडू नकोस,
हं, त्या जिद्दीला प्रयत्नांची जोड मात्र दे.
दाखवशील कर्तुत्व जगाला,
तरच समाज तुला सलाम करेल,
अपयशी ठरलास तर काडीचीही किंमत उरणार नाही,
हे मात्र लक्षात ठेव.
"असतील शिते तर जमतील भुते" हा जगाचा नियम लक्षात ठेव,
कर्तुत्वहीन व्यक्ती फेकल्या जातात,
जगाच्या एखाद्या कोपर्यात,
आणि म्हणूनच कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडायला हवे याचीही जाणीव ठेव,
करू नको अपव्यय वेळेचा आणि तुझ्यातील क्षमतेचा,
वापरला नाहीस मेंदू तर अवघे जीवनच सडून जाईल,
आणखी एक गोष्ट लक्षात ठेव,
प्रत्येक व्यक्तीत असते महानता,
फक्त ती सिद्ध करून दाखवण्याचा अवकाश असतो,
ठरलास यशस्वी तुझ्या प्रयत्नात,
तरच सार्थकी लागेल जीवन,
अन्यथा......
किडे मुंग्याही जगतातच कि ?
परंतु मानवी आयुष्य लाभले आहे तुला,
तेही सार्थकी लाव,
जगू नको स्वतासाठी,
जरा दुसर्यांचाही विचार कर,
स्वताचे हसू पाहण्यापेक्षा दुसर्यांचे आसू बघ,
शोध दुखाचे कारण,
आणि प्रयत्न कर त्याचा निचरा करण्याचा,
दुसर्यांच्या चेहऱ्यावर फुलवशील हास्य,
तरच माणूस म्हणून जगायला लायक ठरशील,
हसू आणि आसू यात फार कमी अंतर असते,
ते मात्र ओळखायला शिक,
चांगल्या वाईटाची जाण असुदे,
चांगले ते घेवून वाईटावर मात करायला शिक,
फक्त तुझीच नाही तर बर्याच जणांची आहे हि विवंचना,
त्यानाही आधार देण्याचा प्रयत्न कर,
आणि लक्षात ठेव.....
आयुष्यात थांबला तो संपला,
म्हणून थांबू नकोस,
प्रगतीच्या वाटेवरचे काटे वेचून पुढे जायला शिक.
कर विचार चिंतन आणि मनन,
बरेच काही शिकायला मिळेल,
झालेल्या चुकापासून बोध घेवून,
पुढे जायला शिक......

2 टिप्पणी(ण्या):

manu म्हणाले...

प्रकाशजी तुम्ही पोस्त केलेली...., अब्राहम लिंकन यांच्या पत्र शैलीने लिहिलेली विवंचना हि कविता
मानवतावादी मार्गावर चालण्याचा मार्मिक संदेश देणारी आहे. अतिशय अर्थपूर्ण अशी कविता.....
प्रकाशजी मला जर माझी कविता इथे पोस्त करायची असल्यास काय कराव ते जरा कलवा!!
आणि मराठीत मध्ये कसे लिहायचे हेही मला माहित नाही..जरा कळवal तर आभारी असेन!!

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद manu. आपणाला जर या ब्लॉगवर कविता प्रकाशित करायची असेल तर prakashpol6@gmail.com आणि info@sahyadribana.com या इमेल वर पाठवा.

मराठीत लिहिण्यासाठी गुगल चे Google Transilater हे सोफ्टवेर वापरा. हे सोफ्टवेर डाऊनलोड करून तुमच्या संगणकावर इन्स्टाल करा. किंवा तुम्ही ऑनलाईन ही टाईप करू शकता. त्यासाठी ही लिंक वापरा.

http://www.google.com/transliterate/Marathi

अजूनही काही अडचण आल्यास मला ९६६५३३१९१० वर संपर्क करा.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes