शुक्रवार, डिसेंबर ३१, २०१०

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी दै. पुण्यनगरीने घेतली सामाजिक न्यायाची बाजू

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी बहुतेक सर्व प्रसारमाध्यमे प्रतिगामी लोकांच्या बाजूने एकवटली असताना दै. पुण्यनगरीने मात्र आपण छ. शिवरायांची आणि जिजाउची बदनामी खपवून घेऊ शकत नाही हे सिद्ध केले. जेम्स लेन प्रकरण उद्भावाल्यापासून दै. पुण्यनगरीने नेहमीच न्यायाची आणि सत्याची बाजू मांडली होती. 
संभाजी ब्रिगेड चा भांडारकरवरील हल्ला जरूर निषेधार्ह आहे परंतु जिजाउ आणि शिवरायांची बदनामी निषेधार्ह नाही का ? हा रोखठोक सवाल फक्त पुण्यनगरीनेच विचारला होता. आत्ता दादोजी कोंडदेव पुतळ्या प्रकरणी सेना-भाजप-मनसे आक्रमक आंदोलन करत असताना जेम्स लेन वेळी ही आक्रमकता का दाखवता आली नाही असा प्रश्न फक्त पुण्यनगरीनेच विचारला.

सत्य इतिहास समोर यावा म्हणून प्रयत्न करणार्‍या आणि सामाजिक न्यायाची बाजू घेणार्‍या दै. पुण्यनगरीचे सर्व शिवप्रेमी मार्फत  आभार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes