बुधवार, डिसेंबर २९, २०१०

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे आधी पुरावे द्या !

लाल महालातिल दादोजी कोंडदेव यांचा हाच  तो वादग्रस्त पुतळा हटवला आहे.

दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून सध्या जो काही गदारोळ सुरु आहे ते पाहता महाराष्ट्रातील सामान्य माणसाने शरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती आहे. कारण दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु असल्याचा एकही पुरवा पुरंदरे, बेडेकर, बलकवडे, मेहेंदळे यांना सादर करता आला नाही. तरीही दादोजी कोंडदेव हेच शिवरायांचे खरे गुरु आणि मार्गदर्शक आहेत असे त्यांचे ठाम मत आहे.
२००५ साली पुण्यातील मराठा विकास परिषदेने दादोजी कोंडदेव यांचे शिवरायांच्या जीवनातील स्थान ठरवण्यासाठी एका जाहीर परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या इतिहास संशोधकांना निमंत्रित केले होते. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु अथवा मार्गदर्शक नाहीत असे मानणार्यापैकी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे, जेष्ठ विचारवंत हरी नरके, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रविणदादा गायकवाड इ. लोक होते. तर दादोजी हेच शिवरायांचे खरे गुरु आहेत असे मानणार्यापैकी बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे आदी लोकांना निमंत्रित केले होते. पण बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे हे परिसंवादाला आले नाहीत. त्यामुळे  इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे, जेष्ठ विचारवंत हरी नरके, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रविणदादा गायकवाड यांनी दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु अथवा मार्गदर्शक नाहीत हे इतिहासातील पुराव्यानिशी सिद्ध केले. जर दादोजी हे शिवरायांचे गुरु असल्याचे खरोखर पुरावे असतील तर पण बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, गजानन मेहेंदळे यांनी ते पुरावे का सादर केले नाहीत ?
त्यांचा मुख्य आक्षेप होता कि मराठा बहुजन संघटनाच्या लोकांना इतिहास कळत नाही. आता ज्यांना इतिहास कळत नाही त्यांच्याशी इतिहासाची चर्चा काय करणार ? म्हणजे हि पळवाट काढण्याची लक्षणे होती हे परिसंवादाला जमलेल्या हजारो लोकांच्या लक्षात आले.
दुसरा आक्षेप असा कि सुरक्षा. कारण संभाजी ब्रिगेड चा आक्रमक पवित्रा पाहून त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटली. संभाजी ब्रिगेड ने सांगितले कि तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही येवून पुरावे सदर करा, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. पण तरीही ते आले नाहीत. त्यानंतर संभाजी ब्रिगेड ने जाहीर केले कि तुम्हाला आमच्या विचारपिठावर यायचे नसेल तर तुम्ही असे परिसंवाद आयोजित करा, तुमच्या विचारपिठावर आम्ही येवू. तरीही त्यांनी असे परिसंवाद आयोजित केले नाहीत.
त्यानंतर दै. पुण्यनगरीने अग्रलेख लिहून सडेतोड भूमिका घेतली कि आम्ही (दै. पुण्यनगरी) अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित करू दोन्ही बाजूच्या इतिहासकारांनी आमच्या स्टेजवर यावे. दै. पुण्यनगरीच्या या प्रस्तावाला हि या नावाजलेल्या इतिहासकारांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या.
पळवाट काढण्याचा यांचा स्वभाव गेल्यावर्षी महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार संदर्भात समिती नेमली त्यावेळीही दिसून आला. महाराष्ट्र सरकारने तत्कालीन शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत जयसिंगराव पवार, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रविणादादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, गंगाधर बनबरे, बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर आदींचा समावेश होता. मात्र बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर यांनी समितीत काम करण्यास नकार दिला. का तर म्हणे समितीत घेतलेल्यांना इतिहास कळतो का ? यांना मोडी, उर्दू येते का ? म्हणजे सारा इतिहास हेच कोळून प्यायलेत. दुसरे मुर्ख. त्यांना काहीच येत नाही. जगातील जे काही ज्ञान असेल ते यांच्याच ठिकाणी आहे. हि जी वर्नवर्चस्ववादी मानसिकता आहे ती अतिशय घातक आहे. यांना काहीही करून समितीतून अंग काढून घायचे होते. ते त्यांनी पद्धतशीर काढून घेतले. पण त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एकाच संदेश गेला तो म्हणजे ज्या अर्थी हे इतिहासकार इतिहासातील सत्यापासून पळ काढताहेत त्या अर्थी नक्कीच कुठेतरी पाणी मुरतेय. बाकीच्या इतिहास संशोधकांनी योग्य त्या पुराव्यानिशी दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नव्हते हे सिद्ध केले. परिणामी महाराष्ट्र सरकारला त्यांच्या नावाचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रद्द करावा लागला.
इतिहासातील प्रश्न हे चर्चा करून सोडवायचे असतात. पण ज्यांना चर्चाच मान्य नाही ते काय इतिहासातील प्रश्न सोडवणार ?

1 टिप्पणी(ण्या):

Ashish Patil म्हणाले...

Farach chhan aahe ha lekh. kharokhar bramhan dadoji kondadev sandarbhat purave devu shakale nahit hi khari gosht ahe. nirbhid ani saty likhanabaddal dhanyavad.
jay jijau

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes