शनिवार, डिसेंबर २५, २०१०

अखेर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटणार....

संभाजी ब्रिगेड चा लढा सामान्य माणसाचा जीव घेण्यासाठी नाही तर सामान्य माणसाला स्वाभिमानी, आत्मसन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे हे आहे. शिवरायांचे नाव घेताना आपणाला अभिमान वाटतो, पण इतिहासातील इतर वाद सोडवायचे म्हटले कि मग जाती-पतीचे राजकारण आडवे येते. दादोजी कोंडदेव कोण होते हे मुळीच महत्वाचे नाही का ? वर्तमान जगण्यासाठी ज्यांनी भूतकाळ दुर्लक्षिला ते कधीच विजयी होऊ शकले नाहीत हा इतिहास आहे.
याचा अर्थ असा नाही कि भूतकाळात आणि इतिहासात गुरफटून राहायचे. पण निदान ज्यांना आपण आदर्श मानतो अशा महामानवांची बदनामी झाली तर त्याचा निषेध तरी करावा. पण त्या ऐवजी आपणाला दादोजी कोंडदेव चा पुतळा अधिक प्रिय वाटतो. शिव छत्रपतींची बदनामी झाली तरी आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो.


दादोजी कोंडदेव चा पुतळा तो ब्राम्हण आहे म्हणून काढला जातोय हा गैरसमज प्रथम दूर करा. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचा एकाही पुरावा महाराष्ट्र शासन, पुणे महापालिका, इतिहासकार यांच्याकडे नाही. मग दादोजी कोंडदेव जर शिवरायांचे गुरु नसतील तर जेम्स लेन च्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कुजबुजीच्या पार्श्वभूमीवर तो वादग्रस्त पुतळा जिजाऊ आणि बाल शिवाबाबरोबर कशाला ? कुणाच्या आईचा फोटो त्याच्या गुरूबरोबर लावला आहे ? फोटो असला तर तो आई, वडील आणि मुलगा असा असला पाहिजे ना ? मग शिवरायाच्या बाबतीतच आई, मुलगा आणि तथाकथित गुरु  असे का ?


मुळात कसे असते, संभाजी ब्रीगेड चा लढा हा सर्व बहुजनासाठी आहे. पन  बहुजन समाजाला अजून गुलामगिरीची जाणीव झाली नाही. गेल्या काही दिवसापासून जातीवादाच्या नावाने ओरड करणाऱ्या तथाकथित विद्वानांना  समाजातील खरा जातीवाद अजून दिसत नाही. एकाच जातीच्या लोकांचा नाहक उदो-उदो करून ठेवला आहे. बर, त्याकाळी समाज अशिक्षित होता त्यामुळे त्यांच्या लबाड्या पचल्या . पण आता सर्व शिकू लागले आहेत. माणूस हा चिकित्सक प्राणी आहे. तो अभ्यास करतो, विचार करतो, आणि जे पटते तेच स्वीकारतो. (काही अपवाद असतील ). त्याप्रमाणे बहुजन इतिहास संशोधकांनी शोध घेतला, इतिहासात पूर्वी केलेल्या चुका यांच्या लक्षात आल्या. त्या आता दुरुस्त करायच्या म्हटले तर जातीवादाच्या नावाने शंख केलं जातो. भूतकालीन घटनांची सुसंगत माहिती म्हणजे इतिहास होय. त्यामुळे इतिहास सांगताना जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग, पंथ हे भेद इतिहासात येत काम नयेत. जसे घडले तसे सांगणे जरुरीचे असते. पण इतिहास लिहिणारे जर पक्षपाती असतील तर ते नक्कीच चुका करणार आणि त्यांनी अशा चुका केल्या आहे. त्यामुळेच आपल्या इतिहासात नेहमी वाद उत्पन्न होतात. त्यामुळे यात खरोखरच कोण दोषी असेल तर ते पक्षपाती इतिहास लिहिणारे तथाकथित इतिहासकार आहेत. वास्तविक पाहता, इतिहास हा प्रवाही असतो. नवनवीन साधने, पुरावे मिळतील तसा इतिहासात सुद्धा प्रामाणिक बदल करावा लागतो. हा प्रामाणिकपणा जर आपण दाखवू शकत नसलो तर माणूस म्हणून घेण्याची आपली योग्यता नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes